न्यायासाठी बोलणारा आवाज

मंगळवार, ३० डिसेंबर, २०२५

२४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून आर्वी येथे साजरा

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004

आर्वी ग्राहकांना हक्कांची जाणीव व्हावी आणि तो बाजारात खरेदीच्या हक्कांबाबत सक्षम व्हावा, यासाठी २४ डिसेंबर हा दिवस राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. आर्वी तहसील कार्यालयात सुद्धा राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन
बुधवारी साजरा करण्यात आला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, मुख्य अतिथी अखिल भारतीय ग्राहक संरक्षण मंचाचे अध्यक्ष दादासाहेब गाडगे तसेच अखिल भारतीय ग्राहक मंचातर्फे डॉ. प्रसन्न कुमार बंब व शोभाताई कानफाडे उपस्थित होते.

अखिल भारतीय मंचातर्फे दादासाहेब घाडगे यांनी ग्राहक दिनाचे महत्त्व व ग्राहकाचे अधिकार बाबत मार्गदर्शन करून ग्राहकांना तक्रार करण्याचा हक्क ग्राहक जागृतीचा हक्क वस्तू अथवा सेवा संबंधी माहिती इत्यादी सह ग्राहक संरक्षण कायदा बाबत विस्तृत माहिती दिली. उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट यांनी राष्ट्रीय ग्राहक दिन, ग्राहकाचे अधिकार इत्यादी बाबत माहिती देऊन मार्गदर्शन केले यावेळी समस्त तहसील कार्यालयातील व रास्तभाव दुकानदार उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन तहसीलदार हरीश काळे, पुरवठा निरीक्षक अधिकारी अनिता वानखडे, गोदाम व्यवस्थापक विजय दाईगडे तसेच कर्मचारी रणजीत देशमुख, हरीश वाघ, कृष्णा वानखडे, पायल निकम, अंकुश राठोड, हरिभाऊ मदनकर यांनी तहसील कार्यालय येथे केले संचालन रणजित देशमुख यांनी केले व आभार प्रदर्शन हरीश वाघ यांनी केले.


रविवार, २८ डिसेंबर, २०२५

विषय वीर भगतसिंग यांना भारतरत्न पुरस्कार मिळणेबाबत निवेदन सादर आष्टी केलअर्पित वाहाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी

महामहीम राष्ट्रपती महोदय भारत सरकार कार्यालय राष्ट्रपती भवनदिल्ली


आष्टी वीर भगतसिंग हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान क्रांतिकारक होते. त्यांनी अल्पवयातच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या देशभक्ती, त्याग, निर्भयता आणि क्रांतिकारी विचारांनी तरुण पिढीला प्रेरणा दिली आहे.
आजतागायत अनेक नामवंत स्वातंत्र्यसैनिकांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' देण्यात आला आहे. मात्र, देशासाठी हसत-हसत फासावर चढलेल्या वीर भगतसिंग यांना अद्याप हा सन्मान मिळालेला नाही, ही बाब अनेकांना खटकणारी आहे.
वीर भगतसिंग यांचे योगदान केवळ सशस्त्र क्रांतीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी सामाजिक अन्याय, गुलामगिरी व शोषणाविरोधात वैचारिक लढा दिला. त्यांचे लेखन, विचार आणि बलिदान आजही तितकेच प्रेरणादायी आहेत.म्हणूनच, वीर भगतसिंग यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणे हा त्यांच्या बलिदानाचा योग्य सन्मान ठरेल, तसेच भावी पिढ्यांना देशप्रेम त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे महत्त्व पटवून देणारा ठरेल यासाठी वीर भगतसिंग यांना भारतरत्न पुरस्कार देवून गौरव करावा अशी विंनती

वर्धा_जिल्ह्यात_सामाजिक_कार्यकर्त्यावर पोलिसांकडून_धमकी_मारहाण_व_खोटी गुन्हे नोंद – SC/ST अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गंभीर आरोप



अर्पित वाहाणे 
वर्धा जिल्हा प्रतिनिधी 
मो 8956647004

वर्धा : वर्धा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व “वीर अशोक समाज” या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्की महेंद्र सवाई यांनी वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे एक अत्यंत गंभीर स्वरूपाची तक्रार दाखल केली असून, त्यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालय व वर्धा शहर पोलिस ठाण्यातील काही पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर धमकी, मारहाण, खोटी तक्रार दाखल करणे, पुरावे नष्ट करणे तसेच अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर अत्याचार केल्याचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
दि. 18 फेब्रुवारी 2025 रोजी वर्धा शहरातच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय उभारण्यात यावे या मागणीसाठी नेहमीप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असता, कार्यालयीन शिपायांकडून दिशाभूल करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्या अंगरक्षक पोलिस शिपाई क्षितिज अशोकराव रोकडे यांनी सवाई यांना धमकी दिली की, “तू जर पुन्हा निवेदन देण्यासाठी आलास तर तुझ्यावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करू.”
यानंतर सवाई यांनी मोबाईलवर व्हिडीओ रेकॉर्डिंग सुरू केल्यावर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला, मोबाईल हिसकावून घेतला गेला, मारहाण झाली व सीसीटीव्ही फुटेज असतानाही पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या घटनेनंतर पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली असताना वर्धा शहर पोलिस ठाण्यात खोटी तक्रार दाखल करून जबरदस्ती वैद्यकीय तपासणी व लॉकअपमध्ये ठेवण्यात आले.
दि. 19 फेब्रुवारी 2025 रोजी तपास अधिकारी सिनुकुमार बानोठ यांनी चौकशीच्या नावाखाली अपमानास्पद भाषा वापरून शारीरिक अत्याचार केल्याचा देखील आरोप तक्रारीत नमूद आहे. यावेळी सवाई यांच्याकडील मोबाईलचा पासवर्ड मागून त्यातील रेकॉर्डिंग डिलीट करण्यात आल्याचेही तक्रारीत स्पष्ट केले आहे.
तक्रारदार विक्की सवाई हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असून, त्यांच्यावर जातीय द्वेषातून अपमानास्पद वर्तन करण्यात आल्याने ही घटना अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा अंतर्गत गंभीर स्वरूपाची ठरते.
या प्रकरणात खालील अधिकारी व कर्मचारी जबाबदार असल्याचे तक्रारीत नमूद आहे :
पोलिस शिपाई क्षितिज अशोकराव रोकडे
शिपाई आशिष लांडे
शिपाई राजू श्रीवास्तव
वर्धा शहर पोलिस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी
तत्कालीन ठाणेदार पराग पोते
तपास अधिकारी सिनुकुमार बानोठ
तसेच संबंधित अन्य अधिकारी व कर्मचारी
मुख्य मागण्या :
सर्व संबंधित अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा नोंदवून कठोर कारवाई करण्यात यावी.
या प्रकरणाचा तपास स्वतंत्र वरिष्ठ अधिकारी (DySP स्तरावरील) यांच्यामार्फत करावा.
जिल्हाधिकारी कार्यालय व पोलिस ठाण्यातील सर्व CCTV फुटेज सुरक्षित ठेवण्यात यावे.
तक्रारदारास झालेल्या मानसिक व शारीरिक त्रासाबद्दल योग्य भरपाई देण्यात यावी.
तक्रारदार व त्यांच्या कुटुंबीयांना पोलिसांकडून होणाऱ्या संभाव्य धोक्यापासून संरक्षण देण्यात यावे.
वर्धा जिल्ह्यात लोकशाही पद्धतीने निवेदन देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावरच पोलिसांकडून दडपशाही होत असेल, तर सामान्य नागरिकांचे काय? असा गंभीर प्रश्न या घटनेमुळे निर्माण झाला असून, या प्रकरणाकडे राज्य शासन व मानवी हक्क आयोगाने तात्काळ लक्ष देण्याची गरज आहे. 
वर्धा पोलीस - वर्धा पोलीस - Wardha Police नागपूर पोलीस कमिशनरते प्रेसिडेंट of इंडिया राहुल गांधी कमौमहाराष्ट्र

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

संविधान दिनानिमित्त संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम यशस्वी



अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

आर्वी संविधान दिनानिमित्त त्रिशरण बुध्द विहार, भिमसैनिक अशोक कुंभारे परिसर, स्टेशन वार्ड, देऊरवाडा रोड, आर्वी येथे संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.आदर्श एकता सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य व त्रिशरण बुध्द विहार आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय दिलीप पखाले (शासकीय विद्युत कत्राटदार) यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मा. उमेश म्हैसकर तर स्वागताध्यक्षपदी मा. ओमप्रकाश पाटील यांनी आपले महत्वाचे विचार मांडले. दीप प्रज्वलन मा.कमलेश कामडी आणि सुजित भिवगडे (सामाजिक कार्यकर्ते) व उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांनी केले. संविधान प्रास्ताविक वाचन मा. भीमरावजी मनवर आणि मा. प्रविण सातपुते यांनी केले.
कार्यक्रमाला सन्माननीय विशेष निमंत्रित पाहुणे म्हणून उपस्थित होते मा. चंद्रकांत ढोले (पोलीस उपअधीक्षक आर्वी), मा. सतिश डेहनकर (ठाणेदार पोलीस स्टेशन आर्वी), मा. अमित गायकी (उपकार्यकारी अभियंता आर्वी), मा. डॉ. राजपाल भगत (प्रदेशाध्यक्ष स्वराज्य आघाडी महाराष्ट्र राज्य), आणि 
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भन्ते धम्मज्योती (वर्धा), मा. ॲड. अरविंद काळे, मा. प्रा. डॉ. अनिल दहाट, मा. प्रा. पंकज वाघमारे, मा. प्रा. डॉ. प्रविण काळे, मा. प्रफुल्ल कांबळे, मा. बाबाराव सोमकुवर, मा. एम. के. चतुर साहेब, मा. प्रा. डॉ. विजयाताई मुळे, मा. मधुभाऊ सोमकुंवर, मा. प्रविण तंबाके, सौ. भारती बनसोड, मा. सचिन पाटील व प्रा.स्नेहल सोनोने यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा गौरव वाढवला.
या कार्यक्रमात विशेष सत्कारमुर्ती म्हणून आयुष्यमती उषाबाई हरिदासजी रंगारी (बुद्धमूर्ती दानदात्या) व संजय कळणे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य पुतडा उभारला त्या साठी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पार्वताबाई दहाट यांचा सततच्या प्रोत्साहन व धम्मदानाबद्दल गौरव करण्यात आला सुनील कांबळे यांनी संविधान वाटप केले.
कार्यक्रमात निशाताई धोंगडे (फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या राष्ट्रीय प्रबोधनकार, सुप्रसिद्ध गायिका, सिनेमा अभिनेत्री व नाट्यकलावंत) यांनी भीमगीत आणि संविधान जागराचे सुंदर सादरीकरण केले, ज्याने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श एकता सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष गौतम अशोकराव कुंभारे यांनी केले, तर कार्यक्रमाचे यशस्वी संचालन प्रा. अमर काशिनाथ भोगे (उपाध्यक्ष आदर्श एकता सामाजिक संघटना) यांनी केले. आणि आभार मा. विनोद कांबळे (सचिव आदर्श एकता सामाजिक संघटना) यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक समाज बांधवांनी परिश्रम घेतले, ज्यामध्ये महिंद्र घोडे, आकाश मुन, प्रमोद घोडीले, मंगेश सरोदे, विजय गजभिये, राजू डोंगरे, तेजस डोंगरे,अविनाश थोरात, भूषण इमाने, शुभांगी कुंभारे, सुलोचना कुंभारे, चंदा सरोदे, सीमा गोंडणे,मेघा सरोदे,चंदा डोंगरे, छकुली माहुरे, विजय कुंभारे, विनोद कांबळे, स्वाती थुल, राकेश वरठी, प्रदीप बनसोड, सोमेश्वर भगत, विलास बनसोड,दिनेश सिंगणापुरे,विनोद सरोदे,मंगेश सरोदे, हंसपाल भगत, सुरेंद्र पाखले यांचा सहभाग उल्लेखनीय होता.
हा कार्यक्रम संविधानाचे महत्त्व व सामाजिक एकतेचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मोलाचा ठरला. यावेळी आर्वी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील लोकसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यशवंत विद्यालय येथे महामानवास अभिवादन

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004

वर्धा आगरगावःस्थानिक यशवंत विद्यालय आगरगाव येथे विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत सानप यांच्या हस्ते डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षक अभय कुंभारे व ज्येष्ठ शिक्षका सौ.कविता डेकाटे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.. याप्रसंगी विद्यार्थ्यांची स्वयस्फुर्त भाषणे झाली.यावेळी अभय कुंभारे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली.ते म्हणाले बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून जे मोलाचे कार्य केले त्यामुळे संपूर्ण भारतवर्ष त्यांच्या या अमर कृतीच्या रूणाखाली सदैव राहिल. या कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील संपूर्ण शिक्षक- शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन कुमारी रूतीका नेहारे हिने केले तर उपस्थितांचे आभार आरुषी रोम हिने मानले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक शशिकांत सानप, अभय कुंभारे,सौ.कविता डेकाटे,व शिक्षकेत्तर कर्मचारी दिनेश नेहारे यांनी परिश्रम घेतले .
आगरगाव (तांडा)येथे समता सैनिक दलाच्या वतीने महिला व बालिका यांना कपडे व साड्याचे वितरण स्थानिकःदेवळी तालुक्यातील आगरगाव तांडा येथील सार्वजनिक वाचनालय येथे समता सैनिक दलाच्या वतीने छोट्या बालिकांना कपडे व महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले.गेल्या अनेक वर्षांपासून समता सैनिक दल पारधी तांड्यावरील वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी मोलाचे कार्य करीत आहे.त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना दरवर्षी पुस्तके व नोटबुक वाटपाचा कार्यक्रम होत असतो.यावेळी मदतीचा हात म्हणून तेथील बालीका यांना कपडे व महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समता सैनिक दलाचे वर्धा जिल्हा संघटक अभय कुंभारे तसेच आदिवासी फासे पारधी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा समता सैनिक दल आगरगाव तांडा बौध्दिक प्रमुख अचिन पवार,समता सैनिक दल आगरगाव तांडा शाखा संघटक अजित पवार,आगरगाव शाखा संघटक आदर्श हाडके ,शाखा संरक्षक आकाश पवार हे प्रामुख्याने उपस्थित होते.समता सैनिक दल जिल्हा संघटक तथा विदर्भ विशेष प्रचारक यांच्या हस्ते कपडे व साड्या वितरीत करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाचे संचालन आकाश पवार याने केले तर उपस्थितांचे आभार अचिन पवार यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी योगिता संदीप भोसले,प्रतिभा अजमान चव्हाण,मीना सचिन पवार,सावनी विशाल पवार,रजनी राहुल चव्हान,अमिषा संदीप भोसले,निर्जुना काळे आदिंनी परिश्रम घेतले.

शुक्रवार, १९ डिसेंबर, २०२५

सप्रेम जय भिमआपणांस 1 जानेवारी 2026 रोजी भिमा कोरेगाव शौर्य दीन वर्धा इथे साजरा

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

वर्धा करण्यात येत असून हा कार्यक्रम संगीतमय संध्या असणार असून या कार्यक्रमाचे मुख्य गायिका मां.मंजुषा शिंदे ( फेम लय बळ आलं माझ्या दुबळ्या पोरांत),आंबेडकरी कवयित्री (वंदना गौतम,उत्तरप्रदेश) 1 जानेवारी भिमा कोरेगाव शौर्य दीन विशेष गाथा समजवून सांगण्या साठी येत असलेले आंबेडकरी विचारवंत मां.प्रशिक आनंद सर व स्पर्धा परीक्षा चा अभ्यास करणाऱ्या तरुण तरुणींना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी प्रसिद्ध मां.विठ्ठल कांगणे सर यांचं मार्गदर्शन लाभणार असून आपण या कार्यक्रमाला आर्थिक सहयोग करीत असून आपल्या या समाज हितकारी कार्यक्रमात उपस्थिती सुद्धा प्रार्थनीय आहे तरी आपण आर्थिक सहयोग करीत असल्या मुळे आपले मनस्वी अभिनंदन* 
*धन्यवाद
*विनीत ऑल इंडिया समता सैनिक दल वर्धा जिल्हा*

रस्त्यावरचा झटणारा धडाडीचा कार्यकर्ता – सिद्धार्थ दामोधरे



अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

आर्वी _रक्तदात्यापासून चळवळीच्या अग्रभागी, आता नगरसेवक पदाच्या दिशेने वाटचाल_ 

 सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात सतत व सातत्याने समाजाच्या सेवेसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्याची खरी ओळख त्याच्या कार्यातूनच पटते. लोकांच्या डोळ्यांतला विश्वास, लोकांच्या जिभेवर उमटणारी प्रशंसा आणि लोकांच्या मनात तयार झालेली जागा – हेच त्याच्या आयुष्याचे भांडवल असते.

आज सिद्धार्थ दामोधरे यांच्याबाबत बोलायचं झालं, तर हा केवळ कार्यकर्ता नाही तर संघर्षाचा पर्याय आहे. चळवळीत आक्रमकता, संघर्षात कणखरता, रस्त्यावर उतरण्याची तयारी आणि समाजातील पीडित-शोषित माणसाच्या न्यायासाठी झटणारा एक ‘धडाडीचा कार्यकर्ता’ अशी त्यांची ठळक ओळख आहे.

रक्तदान चळवळीपासून सुरुवात करून त्यांनी शेकडो रुग्णांना जीवनदान दिले. अनेक रक्तदान शिबिरांचे आयोजन करून रक्ताची गरज भागवली. त्यामुळे त्यांचा चेहरा समाजात रक्तदात्याचा, जीवदान देणाऱ्याचा बनला.

लग्नात वधू-वरांची मिळवणी असो, पीडित नागरिकांची शासकीय कामे मार्गी लावणे असो किंवा अडचणीत सापडलेल्या गरजूंच्या मदतीला धावून जाणे असो – सिद्धार्थ दामोधरे हे प्रत्येक ठिकाणी आघाडीवर दिसतात. त्यांचं म्हणणं स्पष्ट आहे – “संघटनेचं वजन पाठीशी असेल तर फसलेलं काम पटापट मार्गी लागतं. आणि मी यासाठीच पक्षात काम करतो – समाजातील प्रत्येकाची समस्या सोडवण्यासाठी!”

काळ्या करणारे, अडथळे निर्माण करणारे कार्यकर्ते वाढल्याने त्यांनी वंचित आघाडी सोडून आता आझाद समाज पार्टीमध्ये काम सुरू केलं. तरीदेखील बाळासाहेब आंबेडकरांविषयी त्यांच्या मनात अपार आदर व निष्ठा आहे. पण ज्या ठिकाणी अडथळे निर्माण होतात तिथे थांबून बसणं त्यांच्या रक्तात नाही. म्हणूनच नवे मार्ग स्वीकारून त्यांनी कामाला नवी गती दिली.

त्यांची लोकप्रियता एवढी आहे की शहरात ते घरातून बाहेर पडले की शेकडो लोक “जय भीम”, “नमस्कार”, “आदाब” म्हणत त्यांचे स्वागत करतात. ही लोकप्रियता त्यांच्या कामाची खरी पावती आहे.

कुटुंबाकडेही तितकंच लक्ष देणाऱ्या या कार्यकर्त्याची मुलगी दहावीला 92% गुण मिळवते आणि तिचा सत्कार जिल्ह्याचे कलेक्टर, अधिकारी, राजकीय नेते, शिक्षक करतात – ही बाब सिद्धार्थ दामोदरे यांच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. धर्मकार्य असो, धम्मदान असो किंवा सामाजिक उठाव असो – ते सर्वत्र अविरत उपस्थित राहतात.
आता मात्र जनतेचा आग्रह, लोकांचा हट्ट स्पष्ट दिसतोय 
“आमच्या वार्डाचे नगरसेवक म्हणून यावेळेस सिद्धार्थ दामोदरेच हवेत!”

वर्धा लोकप्रियतेची, सामाजिक बांधिलकीची आणि धडाडीची पावती म्हणून या वेळेस सिद्धार्थ दामोधरे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. संघर्ष, आक्रमकता, समाजसेवा आणि नेतृत्वगुण यांची सांगड घालणारा हा कार्यकर्ता खऱ्या अर्थाने ‘रस्त्यावरचा प्रखर योद्धा’ आहे.

आगामी निवडणुकीत हा प्रखर कार्यकर्ता नगरसेवक झाला तर लोकांच्या आशा-आकांक्षा नक्कीच पूर्ण होतील, यात शंका नाही.

गुरुवार, १८ डिसेंबर, २०२५

आर्वी शहरातील फुले-शाहू- आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ कार्यकर्ते मा रामचंद्र कांबळे जनतानगर यांचे आर्वी वर्धा सांवंगी मेधे दवाखान्यात इथे निधन झाले

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

आर्वी वयाच्या ८२ व्या वर्षी अल्पशा आजारामुळे मंगळवार दिनांक १६/१२/२०२५ ला सावंगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्यावर अंत्यसंस्कार बुधवार दिनांक १७/१२ ला दुपारी १२:३० वाजता त्यांचे राहते घरी जनतानगर आर्वी येथून होणार आहे. स्मृतिशेष रामचंद्र कांबळे यांच्या स्मृतीस भावपूर्ण आदरांजली!

दिवंगत रामचंद्रजी कांबळे 
नागपूरच्या धम्मक्रांतीनंतर धम्म प्रबोधन व सामाजिक चळवळीसाठी गावोगावी जाऊन कार्यक्रम व प्रबोधन करणारा सच्चा भीमसैनिक.
हे आर्वी शहरातील 
जेष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते व आरपीआयचे ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख राहिलेली आहे तसेच पुढे कालांतराने बामसेफ कामही त्यांनी केले.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती आर्वीच्या माध्यमातून
माननीय वजीर भाई व गुणवंतराव हिवसे यांच्यासोबत त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. 
त्यांच्या कार्यकाळात 
आर्वी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती चा कार्यक्रम हा सात दिवस चालायचा.
सांस्कृतिक जनजागृती पथकाच्या माध्यमातून जनजागृती चे काम त्यांनी केले. 
रामदासजी काळे देविदासजी दहाट फुलाजी काळबांडे सुखदेवराव काळबांडे बाबुरावजी नाखले इत्यादींचा 
या मित्रमंडळी सोबत त्यांनी सामाजिक कार्य केले. समता सैनिक दल आर्वी 
यातही त्यांचा सहभाग राहिलेला आहे.
सोबतच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कार्यक्रमाची सुरुवात त्यांनी आर्वी शहरात 
मोठ्या प्रमाणात केली होती. 
समता वाचनालय स्थापनेत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. व सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले. 
फुले शाहू आंबेडकर सामाजिक संस्था आर्वीच्या माध्यमातून 
त्यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
मच्छीमार संस्था निर्माणातही त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग राहिला आहे. 
एक वाचनाची सवय असलेला अभ्यासू व्यक्तिमत्व आज आर्वी शहरातून निघून गेले 
नुकत्याच आर्वी मध्ये संपन्न झालेल्या आंबेडकरी साहित्य संमेलनात त्यांच्या कार्याचा गुणगौरव करत संमेलनाध्यक्ष 
कांबळे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला होता.
 सुरेश भिवगडे

रविवार, १४ डिसेंबर, २०२५

दिनांक डिसेंबर 2025स्थळ : नागपूर जन सुरक्षा कायद्याविरोधातील याचिका ‘वेळेआधी’ असल्याने फेटाळली

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

कायदा लागू होताच पुन्हा न्यायालयात जाणार : विक्की सवाई


वर्धा महाराष्ट्र शासनाने मंजूर केलेल्या महाराष्ट्र स्पेशल पब्लिक सिक्युरिटी बिल, 2025 (जन सुरक्षा कायदा) याला आव्हान देणारी जनहित याचिका (PIL) सामाजिक कार्यकर्ते विक्की महेंद्र सवाई यांनी बॉम्बे उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केली होती.

आज झालेल्या सुनावणीत माननीय उच्च न्यायालयाने ही याचिका कायद्याच्या मुद्द्यांवर चुकीची नसून, फक्त “वेळेआधी (premature)” असल्यामुळे फेटाळली आहे.
न्यायालयाने स्पष्टपणे नमूद केले की,
 सदर कायद्यावर अद्याप राज्यपाल/राष्ट्रपतींची मंजुरी (Assent) मिळालेली नसल्याने तो कायदा अद्याप अंमलात आलेला नाही,त्यामुळे या टप्प्यावर न्यायालय थेट हस्तक्षेप करू शकत नाही.

महत्वाचे म्हणजे, न्यायालयाने याचिकेतील मुद्द्यांवर कोणतीही प्रतिकूल टिप्पणी केलेली नाही.
न्यायालयाने हेही स्पष्ट केले की हा कायदा अंमलात आल्यानंतर याचिकाकर्त्यास पुन्हा न्यायालयात येण्याचा पूर्ण अधिकार आहे.

याचिकाकर्ते विक्की सवाई यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की “न्यायालयाने माझी याचिका चुकीची नाही असे स्पष्ट केले आहे.
फक्त कायदा अद्याप लागू न झाल्यामुळे ती या टप्प्यावर फेटाळण्यात आली आहे.
हा कायदा लागू होताच मी पुन्हा उच्च न्यायालयात जाऊन
भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 14, 19, 21, 22 आणि 32 च्या आधारे
या कायद्याला कडाडून विरोध करणार आहे.
ही लढाई वैयक्तिक नसून लोकशाही आणि संविधान वाचविण्याची आहे.”



जन सुरक्षा कायदा हा सामाजिक कार्यकर्ते, आंदोलक, विद्यार्थी आणि सामान्य नागरिकांचा आवाज दाबण्यासाठी वापरला जाऊ शकतो, अशी भीती अनेक संघटनांनी व्यक्त केली असून, यापूर्वी राज्यभरातून हजारो निवेदने शासनाला देण्यात आली होती. कायदा लागू होताच या विषयावर पुन्हा मोठी न्यायालयीन लढाई होणार असल्याचे संकेत याचिकाकर्त्यांनी दिले आहेत.संपर्क:विक्की महेंद्र सवाई
सामाजिक कार्यकर्तायाचिकाकर्ते जनहित याचिका

शनिवार, १३ डिसेंबर, २०२५

आर्वी शहरात सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंत आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

 वर्धा - आर्वी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक सुरेश भिवगडे व तालुकाध्यक्ष मधुकर सवाळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जयंती समारोह पार पडलामयंक विकास मेश्राम धम्म ज्ञान स्पर्धेत उत्कृष्ट गुणाने उत्तीर्ण झाल्यामुळे* मान्यवरांच्या हस्ते सत्कार*
भारतीय बौद्ध महासभा आर्वी शहर शाखा महिलांची कार्यकारणी गठीत. अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई बनसोड तर सरचिटणीस पदी प्रज्ञा विकास मेश्राम व कोषाध्यक्ष मीना बनसोड यांचसर्वानुमते निवडआर्वी :- सूर्यपुत्र भैय्यासाहेब तथा यशवंत आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिनांक १२ डिसेंबर २०२५ शुक्रवारला* 
*प्रियदर्शी राजा सम्राट अशोक बुद्ध विहार राणी लक्ष्मीबाई वार्ड आर्वी येथे जयंती समारोह कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता*
*या कार्यक्रमाला आर्वी शहरातील* 
*विविध मान्यवर व भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा आर्वीचे सर्व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित उपस्थित होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आर्वी तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा माननीय मधुकररावजी सवाळे हे होते. 
तर प्रमुख अतिथी भंतेजी धम्मरक्षित
भीम टेकडी कौडण्यपूर व मदनराव गायकवाड, विकास मेश्राम ज्ञानेश्वरराव पाटील हे होते. 
भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा संघटक सुरेश भिवगडे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली जयंती समारोह पार पडला. 
भारतीय बौद्ध महासभा वर्धा जिल्हा शाखेतर्फे घेण्यात आलेल्या धम्मज्ञान स्पर्धेत उत्तीर्ण झाल्यामुळे मयंक विकास मेश्राम याचा सत्कार करण्यात आला.
*या कार्यक्रमात आर्वी शहराची भारतीय बौद्ध महासभा महिला शाखा कार्यकारिणी निवडण्यात आली.
सामाजिक कार्यकर्त्या भारतीताई बनसोड अध्यक्षपदी तर सरचिटणीसपदी युवा उद्योजिका प्रज्ञा विकास मेश्राम व कोषाध्यक्ष मीना बनसोड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 
सोबतच ..ललिताबाई चहांदे सुमन मदन गायकवाड रुक्मा ज्ञानेश्वर राव पाटील संगीता सुरेश मेश्राम प्रीती प्रवीण अधव अमिता अमोल काळबांडे शालू भगवंत मात्रे सविता दिलीप दवाळे मनोरमा रमेश काळबांडे ललिता मेश्राम वंदना मारुती काळबांडे बेबीबाई काशिनाथ सवाई
देवकाबाई सौदागर वंदना सतीश पखाले, विना मंगेश काळबांडे सविता मनोज ढाणके 
सुप्रिया रामदास भोगे माया नरेंद्र डोंगरे , नीलिमा प्रमोद भगत, 
मयुरी राहुल काळबांडे विमल झाटे रंजना विनोद ढवळे 
निरूपमा भास्कर शिंगाडे सुशीला रामटेके , इत्यादी निवड करण्यात आली.
*आर्वी शहरातील सर्व धम्मप्रेमी उपासक उपासिकांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

शुक्रवार, १२ डिसेंबर, २०२५

हर जोर जुल्म के टक्कर में संघर्ष हमारा नारा हैजनहिताच्या विविध मागण्या घेऊन जोगेश्वरी ग्रामपंचायत कार्यासमोर अन्नत्याग आंदोलन

बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने आज ग्रामपंचायत जोगेश्वरी कार्यासमोर विविध मागण्या घेऊन अन्नत्याग आंदोलन करण्यात आले 

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

वर्धा - प्रमुख मागण्या न्यू आंबेडकर वसाहत नेमाकुल करून पी आर कार्ड घेण्यात यावे 
2) दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना घरकुल मिळावे
 जि प शाळा ते आंबेडकर नगर हा रस्ता तत्काळ चालू करावे 
 वार्ड क्रमांक दोन मध्ये फिल्टर पाण्याची पिण्याची व्यवस्था करावी 
 वार्ड क्रमांक दोन मध्ये ड्रेनेज लाईन तात्काळ टाकावी 
 वार्ड क्रमांक दोन मध्ये पक्के रस्ते बनवण्यात यावे 
 मशान भूमीमध्ये सुशोभीकरण व पाण्याची व्यवस्था करावी 
 जोगेश्वरी जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी शौचालयाचे बांधकाम व पिण्याचे पाण्याची व्यवस्था करावी 
तीन विशेष ग्राम सभेमध्ये 25/06/2025 व 26/6/2025आणि 17/9/2025 25-26 आराखडा प्रस्ताव
 देण्यात यावी तसेच ग्रामपंचायत अधिकारी स्वप्निल घरमोडे यांनी उपोषण कर्त्याचे भेट घेऊन न्यू आंबेडकर नगर वसाहतीमध्ये लवकरात लवकर सर्व मागण्या मान्य करून दिनांक 5/2/ 2026 पर्यंत सर्व कामे मार्गी लावून न्यू आंबेडकर नगर वस्तीचा विकास केला जाईल असे लेखी पत्र देऊन अन्नत्याग आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात मागे घेण्यात आले
यावेळी विजय शिनगारे जिल्हाध्यक्ष 
#काकासाहेब गायकवाड जिल्हाध्यक्ष, अरुण पठारे सामाजिक कार्यकर्ते , साहेबराव दादा दाभाडे जिल्हा उपाध्यक्ष, अक्षय बनकर, सुवर्णाताई पंडित,शुभम दुशिंग शहराध्यक्ष, अमोल त्रिभुवन , राजू मनोरे अखिल भारतीय आदिवासी जिल्हा अध्यक्ष, शाकीर शेख, विशाल खंडागळे, प्रदीप शिंदे, सुरेश सरदार, दत्तू गाडे रोहिदास बनसोडे, गौतम बनकर, समाधान सावंत अनिल तुपे इत्यादी नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
उपोषण करते मनोज साळवे तालुका प्रमुख
विजय शिनगारे जिल्हाध्यक्ष 
बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी

जागतिक एड्स दिनानिमित्त जनजागृती रॅली

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

वर्धा - आर्वी राज्य एड्स नियंत्रण संस्था, सामान्य उपजिल्हा रुग्णालय व इंडियन रेड क्रॉस संस्था शाखा आर्वी यांच्या वतीने जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून मॉडेल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,कन्नमवार विद्यालय,नगरपालिका हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,कला,वाणिज्य महाविद्यालय विद्यार्थ्यांनी एचआयव्हीबाबत जनजागृती व्हावी, या करीता विद्यार्थ्यांची एड्स जनजागरण संदेश रॅली शहरातील विविध मार्गाने काढून गांधी चौक पोहचली 
 गांधी चौक येथे एड्स निर्मूलन जनजागृती सप्ताहाचा समारोप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ वैभव अग्रवाल उपजिल्हा सामान्य रुग्णालय श्री राजाभाऊ तेलरांधे उपाध्यक्ष इंडियन रेड क्रॉस सोसायटी,सचिव डॉ अभिलाष धरमठोक, श्री रवी शहा कोषाध्यक्ष इंडियन रेडक्रॉस सोसायटी, श्री नंदकिशोर जी दीक्षित,डॉ अग्रवाल प्राचार्य डॉ रवींद्र सोनटक्के, प्राचार्य विश्वेश्वर पायले, आदि उपस्थित होते
प्रास्ताविक वैद्यकिय समुपदेशक श्री राहुल शेंडे यांनी केले. त्यांनी एच.आय.व्ही. चा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना सांगितल्या. तसेच आजारापासून सावध राहण्याचा सल्ला दिला. लग्न करतांना दोघांनीही एच.आय.व्ही. तपासणी करुनच लग्न करावे अन्यथा चांगल्या व्यक्तीचे भविष्य एच.आय.व्ही.बाधीत व्यक्तीच्या हाती जावू शकते व चांगला व्यक्ती हा एच.आय.व्ही. बाधीत होऊ शकेल हे नाकारता येत नाही असे सांगितले 
डॉ अभिलाष धरमठोक,सुनीता कदम आदी उपस्थित मान्यवर यांनी मार्गदर्शन केले
 डॉ अग्रवाल यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना एड्स आजारासंबंधी प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच कोणत्याही व्यक्तीला या आजाराची लागण झाल्यास उपाय संबंधीची माहिती दिली 
कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रा. अरुण मानकर यांनी केले . कार्यक्रमाला इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सदस्य , डॉ प्रकाश धांदे, प्रा.जवंजाळ सर, नवलकिशोर अग्रवाल, प्रा.सतिश ठाकरे,सुरेश केने, सुशील सिंह ठाकुर, साठे, सुशीलकुमार लाठिवाला,प्रा नितीन बोडखे,कपील ठाकूर , डॉ प्रविण काळे , डॉ दहाट सर ,प्रा.पेठे सर ,श्री भांडे सर, सदानी मॅडम, भार्गव मॅडम ( इनर व्हील क्लब ),
उपजिल्हा रुग्णालयातील कर्मचारी म्युनिसिपल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज तसेच एन. एन. सी. विभाग, मॉडेल हायस्कूल व ज्युनि. कॉलेज तसेच एम.सी.व्ही. सी. विभाग व कन्नमवार विद्यालय आर्वी इत्यादी शाळेतील शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. तसेच आर्वी शहरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.

मंगळवार, २५ नोव्हेंबर, २०२५

26 नोव्हेंबर संविधान दिन

 सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर मो 8888117975

 दि15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ज्या असंख्य स्वातंत्र्य सैनिकांनी, हुतात्म्यानी जीवाचे बलिदान केले त्या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांचा आपल्याला अभिमान आहे, त्या प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकाच्या त्यागाला, बलिदानाला न्याय देऊन सुरक्षित केले असेल तर ते भारतीय संविधानामुळे, 26 जानेवारी 1950 ला प्रजासत्ताक दिनामुळे भारत एक राष्ट्र म्हणून उभे राहिले ते भारतीय संविधानामुळे. संविधान हे राष्ट्र निर्मितीचा, देशाच्या संपन्नतेचा व समृद्धीचा राष्ट्रीय ग्रंथ आहे.
       26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद, पंडित जवाहरलाल नेहरू व इतर सन्माननीय नेत्याकडे भारताचे संविधान सुपूर्त केले व ते राष्ट्राला अर्पण करण्यात आले. त्याच दिवशी काही कलमांची अंमलबजावणी करण्यात आली आणि 26 जानेवारी 1950 रोजी 395 कलमे, 22 प्रकरणे आणि आठ परिशिष्टे असलेल्या धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व सर्व नागरिकास समता,स्वातंत्र्य, न्याय, बंधुतेची शिकवण देणाऱ्या भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाला आणि देश सर्व प्रजेची सत्ता असणारा सार्वभौम प्रजासत्ताक भारत बनला.
           भारताला मिळालेले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधान लिहिले गेले .संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद, संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधान सभेतील सर्व मान्यवर सदस्य यांच्या योगदानाबद्दल त्या सर्वांना अभिवादन करण्याचा दिवस म्हणून 26 नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.
           महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने24 नोव्हेंबर 2008 रोजी शासकीय आदेश काढून सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालय, जिल्हा परिषद , पंचायत समित्या, महानगरपालिका , नगरपालिका, ग्रामपंचायती, प्राथमिक व माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा , महाविद्यालय इत्यादी ठिकाणी सामुदायिक संविधान प्रास्ताविका वाचन संविधान जत्रा, कलमे, पोस्टर्स,सांस्कृतिक कार्यक्रम करण्यात यावेत असा आदेश पारित करण्यात आला.
             भारत सरकारने 2015 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीच्या निमित्ताने सर्व देशभर संविधान दिन साजरा करण्यास मंजुरी दिली, आणि 26 नोव्हेंबर 2015 रोजी पहिला अधिकृत संविधान दिन संपूर्ण देशभर साजरा करण्यात आला, तेव्हापासून संविधान दिन प्रत्येक सरकारी कार्यालयात साजरा करणे बंधनकारक आहे.
            संविधानाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार प्राप्त करून दिला. सामान्य माणूस संविधानापासून दूरच राहिला,स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरही मोजक्याच नागरिकांना आपल्या संविधानिक अधिकाराची माहिती आहे हे देशाचे दुर्दैव आहे. संविधानाचे महत्त्व, मूलभूत अधिकार पुढच्या पिढीकडे पोहोचवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे. 
           संविधान दिनी प्रास्ताविक वाचनाचा उद्देश नागरिक व विद्यार्थ्यांना संविधानाबद्दल माहिती व्हावी आपले मूलभूत अधिकार व कर्तव्य यांची जाणीव व्हावी असा आहे, त्याचबरोबर आपल्या देशाचा राज्यकारभार कसा केला जातो, कसा करावा, याची माहिती मिळते. कार्यपालिका,मंत्रिमंडळ, न्यायपालिका, निवडणूक आयोग, मार्गदर्शक तत्वे, केंद्र राज्य संबंध, घटनादुरुस्ती इत्यादीची माहिती मिळते, त्यातूनच जबाबदार नागरिक कसे होता येईल ते समजते. संविधान म्हणजे आपली आचारसंहिता आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेमध्ये सर्व संविधानाचे मूल्य आहे, तो संविधानाचा पाया आहे, म्हणूनच प्रास्ताविक वाचन करणे ही प्राथमिकता आहे. शाळेमध्ये तज्ञाची व्याख्याने आयोजित करावी व संविधानाचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टीने प्रयत्न करावा. शालेय जीवनापासून मुला मुलींना संविधानाची माहिती व्हावी, मुलामुलींची मने सुसंस्कारित व्हावीत. दररोजच्या वाचनामुळे प्रास्ताविकेचे पाठांतर होईल व शब्दांचा अर्थ हळूहळू समजू शकेल. संविधानाचा सन्मान म्हणजे देश सन्मान, राष्ट्रभक्ती होय.
         पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी न्याय,समानता, स्वातंत्र्य हे संंविधानाचे उद्देश असणारी उद्देश पत्रिका संविधान सभेला सादर केली. भारतीय संविधानाच्या ध्येय आणि उद्दिष्टासंबंधीच्या प्रस्तावावर दिनांक 13 डिसेंबर 1946 ते 17 डिसेंबर 1946 या कालावधीत सविस्तर चर्चा झाली. त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १७ डिसेंबर 1946 रोजी ऐतिहासिक भाषण केले त्यात ते म्हणतात" पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेल्या प्रस्तावात न्याय, समानता, स्वातंत्र्य ही मूल्य आहेत, यामध्ये बंधुता हे मूल्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची खास देण आहे.( द गॅझेट ऑफ इंडिया 26 फेब्रुवारी 1948 प्रास्ताविकात बंधुता याविषयी एक विधान जोडले , पण हे विधान उद्देश पत्रिकेच्या प्रस्तावात नव्हते, समितीला असे वाटले की सध्या भारतात सद्भाव आणि बंधू भावाच्या भावनांची जेवढी आवश्यकता आहे तेवढी पूर्वी कधीही नव्हती म्हणून नवीन संविधानात हे विशेष ध्येय प्रास्ताविकात विशेष उल्लेख करून प्रकर्षाने मांडणे आवश्यक वाटले) डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात भारतात राजकीय समता आणता येईल मात्र बंधुतेचे काय ? भारतात बंधुता जोपर्यंत प्रस्थापित होत नाही तोपर्यंत संविधानातील मूल्यांना स्वीकारले असे म्हणता येत नाही."
             मसुदा समितीचे सदस्य अल्लादी कृष्णस्वामी अय्यर म्हणतात"संविधानाच्या प्रास्ताविकेत भारतात भविष्यकाळात शासन कशा पद्धतीचे असेल याचा विचार केला आहे .भारताची जडणघडण उभारणी सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य या उद्देशावर करून भारतातील सर्व नागरिकांना सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, स्वातंत्र्य, समानता बंधुता प्रस्थापित करण्याचा संकल्प केलेला आहे. 
               उद्याच्या भारताचे भविष्य शाळेतील वर्ग खोल्यांमधून घडत आहे शिक्षण व्यवस्थेचे ध्येय आणि उद्दिष्ट याबाबत शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी म्हणतात' राज्य व्यवस्थेने जी मूल्य अंगीकारली आहेत त्या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार करणे हे शिक्षण व्यवस्थेचे उद्दिष्ट असावे'. 
               विद्यार्थ्यांमध्ये संविधानातील मूल्ये व उद्दिष्टे रुजवणे विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा, भाषा संस्कृती याविषयी आदर निर्माण व्हावा स्वच्छता, नियमितपणा, शिस्त यांचे महत्त्व त्यांना कळावे तसेच महिला, दिव्यांग व इतर समाजातील विशेष घटकाबद्दल त्यांची वागणूक योग्य असावी असे विविध पैलू विद्यार्थ्यांमध्ये रुजवणे संविधानातील आदर्श प्रत्यक्ष जीवनात उतरविणे.
             शालेय शिक्षणात मूलभूत हक्क आणि कर्तव्य यांचा सर्वाधिक प्रभाव आहे. अभ्यासक्रमाची मूळ प्रेरणा भारताचे संविधान आहे. इयत्ता तिसरीपासून नागरिकशास्त्र या विषयासंबंधी निगडित अभ्यास आहे, इयत्ता नववी पासून राज्यशास्त्र विषयाचा अभ्यास आहे.
             शालेय पाठ्यपुस्तकात संविधानाची प्रास्ताविका सुरुवातीला छापलेली आहे. शाळेत परिपाठाच्या वेळी तिचे वाचन केले जाते. पाठ्यपुस्तकात उद्देशिकेच्यावर भारताचे संविधान असे लिहिले आहे त्यामुळे ही उद्देशिका किंवा प्रास्ताविका म्हणजेच भारताचे संविधान आहे, असाही मुलांचा आणि बऱ्याचदा थोरांचाही समज होतो तो बरोबर नाही . प्रास्ताविका ही भारतीय संविधानाची संक्षिप्त ओळख आहे. प्रास्ताविका म्हणजे संविधानाचे सारतत्व, सार, संविधानाचा चबुतरा, संविधानाचे तत्वज्ञान अशा अनेक विशेषणांनी तिचा गौरव संविधान सभेतील सदस्यांनी तसेच कायदे तज्ञांनी केला आहे.

            भारतीय संविधान म्हणजे केवळ मागासवर्गीयांसाठी राखीव जागा किंवा फक्त मागासवर्गीयांसाठी सामाजिक न्याय असे जे काही जणांना वाटते ते खरे नाही. भारतीय संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा आहे, भारतातील सर्व कायदे हे संविधानावर आधारित आहेत. नागरिकांचे मूल्य जीवन हे संविधानावर आधारित आहे. भारतीय संविधानाने भारतासारख्या विशाल देशात कायद्याचे राज्य स्थापन केले. शंभर कोटीपेक्षा जास्त जनतेला राजकीय स्थैर्य दिले. अनेक भेदभाव व विषमता असलेल्या देशाला एकता व अखंडतेचा मूलमंत्र दिला राजेशाही, साम्राज्यशाही, सरंजामशाही, पुरोहित शाही आणि चातुर्वर्ण्य यांच्या चक्कीत भरङल्या जाणा-या सर्वसामान्य जनतेला मूलभूत मानवी अधिकार यांची ओळख करुन दिली. निवडणुकीतील सहभाग व प्रौढ मतदानाचा अधिकार यांच्या योगाने सर्वसामान्य माणसांना राजकीय शक्ती प्रदान केली. राजकीय सामाजिक व धार्मिक सत्तेच्या गुलामांना नागरिकत्व बहाल केले. भारतीय संविधानाने सर्वसामान्य जनतेला निर्णयाचा सर्व अधिकार बहाल केला. शोषण करणाऱ्या मुठभर अत्याचारी जाती किंवा स्वतःला अभिताज्य मानणारा वर्ग यांचा निर्णय प्रक्रियेवरील एकाधिकार नष्ट केला. नागरिकांचे मूलभूत अधिकार, नागरिकांची कर्तव्य, मार्गदर्शक तत्वे, केंद्र सरकारचे अधिकार, राज्य सरकारचे अधिकार, राष्ट्रपतीचे स्थान अधिकार, राज्यपालाचे स्थान अधिकार, न्यायालयाच्या स्वतंत्र अस्तित्वाच्या तरतुदी, केंद्रीय लोकसेवा आयोग, जल आयोग उर्जा आयोग त्यांची रचना, स्वरूप, कार्य. राज्याची राजभाषा, अल्पसंख्यांक जमातीचे संरक्षण, इतर मागासवर्गीय, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती . यांच्यासाठी विशेष तरतुदी केल्या. या विशेष तरतुदी करताना त्या पाठीमागील भूमिकेचा .. तत्त्वज्ञानाचा सखोल अभ्यास करावा लागेल. या तरतुदी करताना या देशाच्या एकसंघतेचा विचार सतत मनात ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली.
               शेकडो जाती, पोट जाती ,उपजाती, जगाच्या पाठीवरचे सर्व धर्म, विविध पंथ,भाषा, संस्कृती, अनेक संस्थाने असलेला भारत देश एक राष्ट्र म्हणून उभा राहू शकत नाही असे विस्टन चर्चिलने म्हटले होते. अर्थात ही परिस्थिती कोणीही मान्य केली असती. 4 नोव्हेंबर 1948 रोजी भारतीय संविधानाच्या आधारभूत सिद्धांताचे विवेचन करताना ब्रिटिश नोकरशहा मेटकॉफ चे उदाहरण देताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात' मेटकॉफ यांनी खेड्याच्या लोकसत्ताकाची स्तुती केली असली तरी शेवटी भारताच्या विनाशास खेडीच कारणीभूत आहेत. असा सल्लाही ते देतात, ग्राम, खेडे म्हणजे काय तर टोकाच्या स्थानीय वादाचे, जातीयवादाचे डबके आहे. संविधानाच्या मूळ मसुद्यात ग्राम या एककाला तिलांजली देण्यात आली असून व्यक्तीला एकक मानण्यात आले आहे. व्यक्तीला केंद्र मानण्यात आले आहे. आम्ही भारताचे लोक, आम्ही सर्व भारतीय ही भारतीयत्वाची भावना संविधानाने जनतेत रुजवली म्हणून भारत हे राष्ट्र म्हणून उभे राहिले आहे . अनेकतेत एकता ही किमया संविधानाने केली आहे.
                         भिमराव जयवंत गाडे 
                             9273574431

रविवार, ५ ऑक्टोबर, २०२५

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ यांच्या कळून बाळूमामांची जयंती व गजानन महाराज विजय ग्रंथ पारायणचे आयोजिन

सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर मो.8888117975

आज दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मृती समिती सौभाग्य नगर येथे आज महिला मंडळाची भिशी तसेच श्री गजानन महाराज विजयग्रंथाचे साखळी पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता. सोबतच बाळू मामांचा जन्मोत्सव साजरा करण्यात आला.या कार्यक्रमाला मा.महादेवराव पातोंड सचिव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंडळ,सौ वंदना विनोद बरडे सामाजिक कार्यकर्त्या व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ अध्यक्ष, अश्विनी ऊरकुडे सचिव, संजीवनी घूरडे कोषाध्यक्ष,अनिता त्रीकुट,निशा त्रिकुट,रोहीनी अवजे,सुप्रिया गांजरे,सिमा लोंढे,सारीका घूरडे,अर्चना घुरडे, ईत्यादी सभासदांच्या उपस्थितीत बाळु मामा जयंती कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला.

बुधवार, १ ऑक्टोबर, २०२५

सेवानिवृत्त शिक्षक श्नी.नरेन्द्र पखाले यांचा सत्कार

वर्धा जिल्हा प्रतिनिधी अर्पित वाहाणे

आर्वी :-पंचायत समिती अंतर्गत जि.प.प्राथमिक शाळा, खानवाडी शाळेचे माजी मुख्याध्यापक यांचा सेवानिवृत्तपर सत्कार थायलंड येथील पूज्य भदन्त दाओदीन महास्थवीर यांचे हस्ते रोशन सिलेब्रेशन हाॅल आर्वी येथे दिनांक -२८/९/२०२५ रोजी करण्यात आला वर्षावासानिमित्य एक दिवसीय धम्म प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित केला होता.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक थायलंड येथील पूज्य भदन्त दाओदीन महास्थवीर होते.तसेच टाकरखेडा येथील पूज्य भन्ते धम्मरत्न उपस्थित होते.या कार्यक्रमाचे आयोजन धम्मसेवक सुरेश किसनराव भिवगडे यांनी केले होते.कार्यक्रमाला आर्वी,आष्टी व कारंजा येथील धम्म उपासक व उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

मध्य रेल्वेच्या गणेशोत्सवानिमित्त सुरु करण्यात आलेली विशेष रेल्वेगाडी क्र.०११३९/४० नागपूर मडगांव द्वितीय साप्ताहिक रेल्वेगाडीला बल्हारशाह-गोंदिया येथुन तृतीय साप्ताहिक कायमस्वरूपी व चांदुर,मूर्तीजापूर,नांदुरा,बोदवड,पाचोरा,चाळीसगाव,मनमाड,पेण अतिरिक्त थांबा सुरु करण्याची विदर्भ खान्देश येथील खासदार केंद्रीयमंत्री रेल्वे विभागाला निवेदन

सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर 8888117975

विदर्भ -: खान्देश प्रांत ते कोकण प्रांतातून येणारा फळ,फुल,शेतीमालाला या नागपूर मडगांव रेल्वेमुळे प्राधान्य मिळेल-श्री.वैभव बहुतूले

विदर्भ-खान्देश-कोकण प्रतिनीधी:- विदर्भ खान्देशातील नागरिकांना कोकण प्रांतात जाण्यासाठी भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूर कडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेली विशेष रेल्वेगाडी क्र.०११३९/४० नागपूर मडगांव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेसला तृतीय साप्ताहिक कायमस्वरूपी व चांदुर,मूर्तीजापूर,नांदुरा,बोदवड,पाचोरा,चाळीसगाव,मनमाड,पेण अतिरिक्त थांबा सुरु करण्याची मागणी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी(रजि.) संस्थेचे मध्य कोकण रेल्वे अभ्यासक तथा विदर्भ खान्देश मराठवाडा संपर्कप्रमुख प्रांतप्रमुख श्री.वैभव बहुतूले यांनी विदर्भ-खान्देश-कोकणातील माननीय केंद्रीयमंत्री,विदर्भ खान्देश खासदार महोदयांकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.
                        माननीय केंद्रीयमंत्री, खासदार महोदयांना पाठवलेल्य पत्रात नमूद केले आहे की,चंद्रपूर येथील महाकाली मंदिर,वर्धा सेवाग्राम येथील महात्मा गांधी यांचे आश्रम,नागपूर येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची दिक्षाभुमी,अमरावती येथील मोझरी संत तुकडोजी व गाडगेबाबा यांचे स्मारक,मूर्तीजापूर जवळील कारंजा(ला)येथील दत्त मंदिर,नागझरी येथील गोमाजी महाराज मठ,शेगांव येथील विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणाऱ्या श्री गजानन महाराज मंदिर शितला माता मंदिर बंकटलाल सदन कृष्णाजींचा मळा महालक्ष्मी मंदिर,सिंधखेडराजा येथील माँ जिजाऊ यांचे जन्मगाव,नांदुरा येथील १०५ फुटी उभी हनुमानाची मुर्ती,अहमदनगर जिल्ह्यातील मनमाड जंक्शन जवळील श्री.साई बाबा संस्थान शिर्डी,नाशिक येथील त्र्यंबकेश्वर,कोकणातील दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या कुणकेश्वर मंदिर,कणकवली येथील भालचंद्र महाराज,मालवण येथील भराडी मंदिर,वेंगुर्ले येथील सातेरी मंदिर,सावंतवाडी येथील लाकडी खेळण्यांचे बाजारपेठ अनेक भाविक भक्त कोकणातून खान्देश विदर्भात व विदर्भ खान्देशातून कोकण प्रांतात धार्मिक स्थळांना दर्शनाकरीता ये-जा करीत असतात.गोंदिया-बल्हारशाह कोकण रेल्वेमार्गे मडगांव तृतीय साप्ताहिक कायमस्वरूपी रेल्वेसेवा सुरु करण्याची मागणी रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी(रजि.) संस्थेकडून वारंवार केली जात आहे.
                              भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नागपूर कडून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरु करण्यात आलेली विशेष रेल्वेगाडी क्र.०११३९/४० नागपूर मडगांव प्रतिक्षा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेस तृतीय साप्ताहिक कायमस्वरूपी व चांदुर,मूर्तीजापूर,नांदुरा,बोदवड,पाचोरा,चाळीसगाव,मनमाड,पेण अतिरिक्त थांबा सुरु करण्याची मागणीची दखल घेऊन स्पेशल दर्जा काढून तृतीय साप्ताहिक कायमस्वरूपीचा दर्जा प्राप्त करून देण्यात आल्यास विदर्भातील नागपूर अमरावती वर्धा येथील संत्री,मूर्तीजापूर येथील सीताफळ,शेगांव येथील प्रसिद्ध कचोरी,जळगाव येथील केळी लाल मिरची,नाशिक येथील द्राक्ष,संगमनेर येथील डाळिंब,रायगड जिल्ह्यातील पांढरा कांदा,पापड लोणची, रत्नागिरी सिंधुदुर्ग येथील हापूस आंबा आंबा पोळी आमरस फणसपोळी काजूगर कडक बुंदी लाडू मालवणी खाजा इत्यादींचा स्वाद रेल्वेसेवेमुळे कोकण खान्देश विदर्भातील नागरिकांना घेता येईल.गोंदिया-बल्हारशाह कोकण रेल्वेमार्गे मडगांव तृतीय साप्ताहिक रेल्वेसेवा व चांदुर,मूर्तीजापूर,नांदुरा,बोदवड,पाचोरा,चाळीसगाव,मनमाड,पेण अतिरिक्त थांबा सुरु केल्याने शेतमालाची आयात निर्यातीमुळे बाजाराला उद्योग क्षेत्राला चालना मिळणार आहे.कोकण खान्देश विदर्भातील आयात निर्यात झाल्याने बेरोजगार तरुण युवक-युवतींना रोजगाराची संधी प्राप्त होणार आहे.गोंदिया-बल्हारशाह मडगांव या रेल्वेसेवेमुळे मध्य रेल्वे प्रशासनाला मोठ्य प्रमाणात राजस्व प्राप्त होऊ शकेल.रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण-सावंतवाडी(रजि)संस्थेचे रेल्वे अभ्यासक तथा विदर्भ खान्देश संपर्क-प्रांतप्रमुख श्री.वैभव बहुतूले यांनी केलेल्या मागणीनुसार निवेदनाच्या प्रति मा.श्री.नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत सरकार,अश्विनी वैष्णव केंद्रीय रेल्वेमंत्री भारत सरकार, व्ही सोमण्णा, रवनीत सिंग केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री भारत सरकार,नितीन गडकरी केंद्रीय परिवहनमंत्री तथा नागपूर खासदार,मा अध्यक्ष रेल्वे बोर्ड नवी दिल्ली,महाप्रबंधक-विभागीय रेल्वे व्यवस्थापक मध्य रेल्वे विभागाला तसेच विदर्भ खान्देश खासदार महोदयांना पाठवण्यात आलेल्या आहे

रविवार, २१ सप्टेंबर, २०२५

🟥 ब्रेकिंग न्यूज 🟥 पिंपळगावचे ज्येष्ठ नागरिक संभाजी नागोराव जगजेकर यांचे निधन


सविस्तर बातमी

नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यातील पिंपळगाव येथील ज्येष्ठ नागरिक संभाजी नागोराव जगजेकर यांचे आज रोजी दुःखद निधन झाले.

त्यांच्या पश्चात तीन मुले आहेत –

साहेबराव संभाजी जगजेकर

दिंगबर संभाजी जगजेकर

बाबुशाई संभाजी जगजेकर


तसेच ते मोहन जगजेकर यांचे आजोबा होत.

 अंत्यसंस्कार आज 5:00 वाजता त्याच्या राहत्या घरी पिंपळगाव येथे पार पडला नातेवाईक, मित्रपरिवार व ग्रामस्थ उपस्थित होते 

त्यांच्या निधनाने संपूर्ण गावात शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

समतानगरवाशी यांच्या वतीने राबविले दीक्षाभूमी मध्ये स्वच्छता अभियान

प्रतिनिधी अर्पित वाहाणे

 वर्धा -  समता नगर येथील रहिवासी असलेले समाज भूषण पुरस्कार प्राप्त राजू थुल मा.सुभाष गायकवाड गोकुळ कांबळे  रत्नाकर  गावंडे बंडूजी नाखले यांनी दिक्षाभूमी स्वच्छता करण्यासाठी संकल्प केला होता व आज तो पूर्णत्वास नेला वर्धा येथून सकाळी 6 वाजता नागपूरकडे प्रस्थान करून 7.20ला पोहचलो व स्वच्छता अभियानास सुरुवात झाली कशाचीही तमा न बाळगता पाच लोक कामाला लागले तब्बल 3 तासाच्या परिश्रमानी दिक्षाभूमी oवरील मैदान, संडास बाथरूम स्वच्छ केले. त्यानंतर अनेक बौद्ध बांधवाची उपस्थिती होती. या स्वच्छता अभियाणानंतर  समाधान व्यक्त केले.

गुरुवार, १८ सप्टेंबर, २०२५

स्वस्त नारी सशक्त परिवार या अभियानाची बळेगाव‌ उपकेंद्र येथुन सुरुवात.

उमरी प्रतिनिधी सुरेश वाघमारे 

आज दिनांक 18/09/25 रोजी उमरी तालुक्यातील बळेगाव उपकेंद्रे येथे.स्वस्त नारी सशक्त परीवार.. व आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत ‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ या विशेष राष्ट्रीय अभियानाला आज बळेगाव उपकेंद्र आरोग्य मंदिरा पासून बळेगाव येथील उपसरपंच सुरेश विठ्ठलराव गाडे यांच्या हस्ते पहिले प्रथम माता सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरूवात झाली आहे. समुदाय आरोग्य अधिकारी दिपाली पारटकर मॅडम यांनी नागरिकांना.. स्वस्त नारी सशक्त परिवार ..याविषयी थोडक्यात मनोगत व्यक्त केले, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदूर येथे या अभियानाची सुरूवात झाली असुन. या अभियानांतर्गत उमरी तालुक्यातील प्रत्येक उपकेंद्र स्तरावर महिला आणि बालकांसाठी विशेष आरोग्य शिबिरांचं आयोजन करण्यात आले, असून, यावेळी सिकलसेल आजार, सोल्युबिलिटी तपासणी , क्षयरोग तपासणी, कुष्ठरोग तपासणी, शुगर, बीपी, गरोदर माता व बालकांची तपासणी, वयोवृद्ध व्यक्तीची तपासणी, करून शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली आणि बळेगाव उपकेंद्र येथील सोनकांबळे मॅडम यांच्यातर्फे टीबी पेशंटला कीट वाटप करण्यात आले व लाभ देण्यात आला. हे अभियान 02 ऑक्टोंबर 2025 पर्यंत चालणार असून, सर्व महिला आणि बालकांचा अभियानात मोठ्या प्रमाणात सक्रीय भाग होता. यावेळी या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बळेगाव येथील उपसरपंच सुरेश विठ्ठलराव गाढे, होते बळेगाव उपकेंद्रे येथील समुदाय आरोग्य अधिकारी दिपाली पारटकर, ए एन एम सोनकांबळे मॅडम, ए एन एम मयुरी पाटील मॅडम एम पी डब्ल्यू व्यंकट जाधव,तसेच समुदाय आरोग्य अधिकारी हेमा आवरगंध बोरजुनी, तालुका सिकलसेल सहाय्यक राजू गायकवाड,आरोग्य सहाय्यक अजय गुंटुरकर शिधि ,आशा तालुका समूह संघटक मिलिंद तेले,डाटा एन्ट्री ऑपरेटर नागसेन क्षीरसागर, सुनील जगदंबे आरोग्य सेवक गोळेगाव गंगाधर ढगे ईजतगाव पटी आशाताई सुरेश वाघमारे, ईजतगाव आबादी आशा भिमाबाई गायकवाड, शोभा गायकवाड, अनिताबाई जाधव बळेगाव आशा, रेखा टर्के इज्जतगाव पट्टी आशा तसेच पत्रकार सुरेश वाघमारे ईजतगाव आबादी तालुका 
  कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. तसेच बळेगाव गावातील नागरिक ,गरोदर माता ,महिला बचत गटातील महिला, विलास गाढे ,प्रकाश गाढे, गोविंद गाढे, केशव पाटील गाढे, शिवराम गाढे, रावसाहेब गाढे अशा पद्धतीने स्वस्त नारी सशक्त परिवार हा कार्यक्रम संपन्न झाला...

ऊप जिल्हा रुग्णालय वरोरा जिल्हा" चंद्रपूर येथे स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान" मध्ये सक्रिय सहभागासाठी आवाहन.

सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर मो.8888117975

चंद्रपूर -: आपल्या सर्वांना माहीतच आहे की, भारत सरकारचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत “स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान” संपूर्ण देशभर राबवत आहे.

या अभियानाचा उद्देश महिलांचे आरोग्य सुधारणे, रोगांचे लवकर निदान करणे तसेच प्रतिबंधात्मक व आरोग्यदायी जीवनशैलीबाबत जनजागृती करणे हा आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये Care Companion Program (CCP) ची साधने फ्लिपचार्ट, पोस्टर्स, थाळी मॉडेल, बाहुली मॉडेल, स्तन मॉडेल तसेच माहितीपर साहित्य यांचा प्रभावी वापर करण्यात येणार आहेत.
समुपदेशन व जनजागृतीसाठी प्रमुख क्रियाकलाप

१. मातृत्व आरोग्य सेवा
 गर्भवती महिलांना सुरक्षित गर्भधारणेबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे 
 उच्च जोखीम गटातील गर्भवतींची वेळेत ओळख करून देण्यात येणार आहे.
 सरकारी योजना (JSY, JSSK, PMSMA) याबाबत महिलांना सविस्तर माहिती देण्यात येणार आहे.

२. लसीकरण व बाल आरोग्य सेवा
 गर्भवती व मुलांचे लसीकरण का आवश्यक आहे हे समजावून सांगण्यात येणारं आहे.
 लसीकरणामुळे टाळता येणारे आजार व त्यांचे धोके याबाबत जनजागृती करण्यांत येणार आहे.
 MCP कार्ड व त्याचा उपयोग कसा करावा हे समजावून सांगितले जाणार आहे.

३. पोषण (POSHAN)
 संतुलित आहाराचे प्रत्यक्ष प्रात्यक्षिक (थाळी मॉडेल वापरून) समजाविण्यात येणार आहे.
 हिरव्या भाज्या, फळे, डाळी, दूध, कडधान्य यांचा आहारात समावेश करण्याचे काय फायदे आहेत हे समजाविले जाणार आहे.
 जास्त तेलकट, गोड पदार्थ व जंक फूड न वापरण्याचे महत्त्व पटवून दिले जाणार आहे.त्याचे शरीरावर काय वाईट परिणाम होऊन रोगाला बळी पडतात हे समजावून सांगितले जाणार आहे.

४. किशोरवयीन आरोग्य
 अॅनिमिया प्रतिबंधासाठी लोहयुक्त आहाराचे महत्त्व स्पष्ट करणे.
 IFA गोळ्या घेण्याबाबत व त्याचा फायदा समजावणे.
 मासिक पाळी स्वच्छतेबाबत योग्य पद्धती व सुरक्षित साधनांचा वापर कसा करायचा त्यांचे फायदे समजाविले जाणार आहे.

५. असंसर्गजन्य आजार (NCDs) व वेलनेस
 मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारख्या आजारांचे धोके व लक्षणे सांगुन 
 आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारण्याचे मार्गदर्शन केले जाणार आहे (व्यायाम, पुरेशी झोप, योग्य आहार).
 तंबाखू, मद्य व गुटखा सेवनाचे दुष्परिणाम स्पष्ट समजावून सांगितले जाणार आहे.

६. कॅन्सर जनजागृती
 गर्भाशयमुख, स्तन व तोंडाचा कॅन्सर यांचे प्रतिबंध, लक्षणे व तपासणीबाबत माहिती दिली जाणार आहे.
 लवकर निदान केल्यास उपचार शक्य आहेत हे समजाविले जाणार आहे.
 Self-Breast Examination (स्तन मॉडेल वापरून) प्रत्यक्ष दाखविले जाणार आहे.
 
अजेंडा – समुपदेशन व जनजागृती सत्रे
(१७ सप्टेंबर – २ ऑक्टोबर २०२५ दरम्यान)
 
दिवस १ – मातृत्व आरोग्य सेवा
 सुरक्षित गर्भधारणा व उच्च-जोखीम गटाची ओळख
 ANC तपासणीचे महत्त्व
 सरकारी योजना: JSY, JSSK, PMSMA यांची माहिती
 प्रात्यक्षिक: फ्लिपचार्ट व पोस्टर वापरून समुपदेशन
 
दिवस २ – बाल आरोग्य व लसीकरण
 लसीकरणाचे महत्त्व व वेळापत्रक समुपदेशन
 बाल संगोपन व स्वच्छतेचे महत्त्व
 MCP कार्ड माहिती
 प्रात्यक्षिक: बाहुली मॉडेल वापरून बाल संगोपन तंत्र, कांगारू मदार केअर दाखवणे
 
दिवस ३ – पोषण (POSHAN)
 संतुलित आहाराचे घटक
 लोहयुक्त व प्रथिनेयुक्त अन्नाचे महत्त्व
 तेलकट व जंक फूड कमी करण्याबाबत जनजागृती
 प्रात्यक्षिक: थाळी मॉडेल वापरून आहाराचे प्रात्यक्षिक
 
दिवस ४ – किशोरवयीन आरोग्य
 अॅनिमिया प्रतिबंधासाठी योग्य आहार व IFA गोळ्यांचे सेवन
 मासिक पाळी स्वच्छतेचे नियम
 किशोरवयीन मुलींसाठी जागरूकता उपक्रम
 प्रात्यक्षिक: फ्लिपचार्ट/पोस्टर वापरून चर्चा
 
दिवस ५ – असंसर्गजन्य आजार (NCDs) व वेलनेस
 मधुमेह, उच्च रक्तदाब यांचे धोके व प्रतिबंध
 जीवनशैलीतील बदल (व्यायाम, आहार, झोप)
 तंबाखू व मद्य सेवनाचे दुष्परिणाम
 प्रात्यक्षिक: गटचर्चा व अनुभव कथन

दिवस ६ – कॅन्सर जनजागृती
 गर्भाशयमुख, स्तन व तोंडाचा कॅन्सर तपासणीचे महत्त्व
 लवकर निदानाचे फायदे
 स्वतःची व वैद्यकीय तपासणीची गरज
 प्रात्यक्षिक: स्तन मॉडेल वापरून Self Breast Examination दाखवणे
 
दिवस ७ – एकत्रित सत्र व समुदाय सहभाग
 मागील सर्व विषयांचा आढावा
 आरोग्यदायी जीवनशैलीबाबत सामूहिक शपथ (pledge)
 प्रात्यक्षिक: पोस्टर/फ्लिपचार्ट प्रदर्शन व प्रश्नोत्तर सत्र

ही एक सुवर्णसंधी आहे की ज्यामध्ये आपण सर्वांनी आपल्या कौशल्य, ज्ञान व समुपदेशन क्षमता यांचा उपयोग करून महिलांना व कुटुंबांना आरोग्यदायी जीवनशैलीकडे प्रेरित करायचे आहे. म्हणूनच सर्व कर्मचारी व मास्टर ट्रेनर्स यांनी आपल्या संबंधित संस्थांमध्ये या कालावधीत (१७ सप्टेंबर – २ ऑक्टोबर २०२५) Care Companion Program (CCP) ची जास्तीत जास्त सत्रे घेऊन योगदान देण्यात येणार आहे.

आपला सक्रिय सहभाग व प्रयत्न हे निश्चितच या अभियानाला अधिक परिणामकारक बनवतील आणि महाराष्ट्र राज्यातील महिलांच्या आरोग्यवर्धनासाठी मोलाचे ठरतील.म्हणुन जास्तीत जास्त महीलांनि या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

सोमवार, १५ सप्टेंबर, २०२५

यशाचा स्ट्राईक निर्मल इंग्लिश स्कूल चा चेतन मेश्राम विभागीय स्पर्धेसाठी सज्ज

वर्धा अर्पित वाहाणे

आर्वी : निर्मल इंग्लिश स्कूल, आर्वीचा विद्यार्थी चेतन मेश्राम याने १७ वर्ष वयोगटातील जिल्हास्तरीय कॅरम स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करत विभागीय स्तरावर आपली निवड सुनिश्चित केली आहे. त्याच्या कौशल्यपूर्ण खेळाने शाळेचे नाव उज्ज्वल केले असून, संपूर्ण परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

चेतनच्या या यशाबद्दल शाळेचे सचिव अविनाशजी गोहाड, मुख्याध्यापिका सोनल भेंडे, उपमुख्याध्यापक प्रफुल क्षिरसागर, प्रशिक्षक अभिजित राऊत, शिक्षकवृंद तसेच पालकांनी त्याचे मनःपूर्वक अभिनंदन केले. शाळेच्या वतीने त्याला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या असून, त्याच्या यशाचा गौरव करत विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उदाहरण म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे.

शाळेच्या क्रीडा विभागाने चेतनच्या सातत्यपूर्ण सराव, आत्मविश्वास आणि चिकाटीचे कौतुक केले असून, विभागीय स्तरावरही तो आपल्या खेळाने नक्कीच चमक दाखवेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.

शुक्रवार, १२ सप्टेंबर, २०२५

दादासाहेब फाळके चित्रपट युनियन मीडिया विभागाच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी संतोष शिवदास आमले यांची निवड

पनवेल प्रतिनिधी

मुंबई दादासाहेब फाळके चित्रपट युनियनचे अध्यक्ष अजित म्हामुणकर यांनी मीडिया क्षेत्रातील केलेल्या कामाची दखल घेऊन मीडिया विभागाच्या महाराष्ट्र राज्याध्यक्षपदी पनवेलचे रहिवासी व दैनिक युवक आधारचे संपादक श्री. संतोष शिवदास आमले यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीचे सिनेसृष्टीत तसेच सामाजिक क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर स्वागत होत आहे. कलाकार दिग्दर्शक यांच्याशी चांगला संपर्क असून सामाजिक क्षेत्र व पत्रकार क्षेत्रामध्ये दैनिक युवक आधार च्या माध्यमातून आमले यांची वेगळी ओळख निर्माण झाली असून मीडिया क्षेत्रात संघटनेच काम वाढवण्यास मदत होईल.

युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, “मीडिया विभाग हा चित्रपटसृष्टीतील कलाकार, तंत्रज्ञ आणि पत्रकार यांच्यातील दुवा मानला जातो. श्री. आमले यांच्या नेतृत्वाखाली हा विभाग अधिक सक्षम होईल आणि महाराष्ट्रभरातील माध्यम प्रतिनिधींना योग्य व्यासपीठ उपलब्ध होईल, असा आम्हाला विश्वास आहे.

कोट
सामाजिक व सांस्कृतिक कार्यात सक्रिय
संतोष आमले हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक उपक्रम, कला व सांस्कृतिक चळवळींमध्ये अग्रेसर आहेत. विविध संस्थांमार्फत त्यांनी युवकांना प्रोत्साहन दिले असून पत्रकारिता आणि समाजकारण क्षेत्रात त्यांचे वेगळे स्थान निर्माण झाले आहे.दिग्दर्शक व अभिनेता विकास वायाळ

आमले यांची भूमिका
आपल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. आमले म्हणाले,
दादासाहेब फाळके चित्रपट युनियनच्या मीडिया विभागाचे महाराष्ट्र राज्याध्यक्षपद मिळणे ही माझ्यासाठी मोठी जबाबदारी आहे. चित्रपटसृष्टीतील कामगार, कलाकार, तंत्रज्ञ तसेच पत्रकार यांना न्याय, सुविधा आणि योग्य मान-सन्मान मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे. महाराष्ट्रातील सिनेसृष्टीचा गौरव वाढवणे हेच माझे ध्येय असेल.कोट

या नियुक्तीबद्दल श्री. आमले यांचे विविध मान्यवर, पत्रकार, कलाकार व सामाजिक कार्यकर्त्यांकडून हार्दिक अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या कार्यकाळात मीडिया विभाग अधिक गतिमान होईल आणि दादासाहेब फाळके यांचे नाव उज्ज्वल ठेवणाऱ्या चित्रपटसृष्टीच्या वाटचालीत मोलाची भर पडेल, असा विश्वास आहे 
-अजित म्हामुणकर अध्यक्ष दादासाहेब फाळके चित्रपट युनियन

गुरुवार, ११ सप्टेंबर, २०२५

नागपूर हायकोर्ट, नागपूर संघर्षरत विक्की सवाई यानी संस्थापक अध्यक्ष वीर अशोक सम्रासंघटना यांनीजाणाहीत याचिका दाखल केली

वर्धा अर्पित वाहाणे

वर्धा शहरात शासनाचा मेडिकल कॉलेज व रुग्णालय पुन्हा सुरू करण्याबाबत दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिका वर आज बॉम्बे हायकोर्ट, नागपूर खंडपीठात सुनावणी घेण्यात आली.

याचिकाकर्ता वीर अशोक सम्राट संघटना, वर्धा तर्फे संस्थापक अध्यक्ष विक्की महेंद्र सवाई यांनी स्वतः (in-person) न्यायालयात बाजू मांडली.

माननीय न्यायमूर्ती श्री. अनिल एस. किलोऱ आणि माननीय न्यायमूर्ती श्री. रजनीश आर. व्यास यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली.
प्रतिवादी (Union of India, Ministry of Health & State of Maharashtra) तर्फे उपस्थित AGP/सरकारी वकिलांच्या विनंतीवरून न्यायालयाने पुढील सुनावणीची तारीख 19 सप्टेंबर 2025 निश्चित केली आहे.

ही जनहित याचिका संपूर्ण वर्धा शहर व जिल्ह्याच्या आरोग्य, शिक्षण आणि भविष्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे.
याचिकाकर्त्याने न्यायालयास विनंती केली आहे की वर्धा शहरात पूर्वी प्रस्तावित शासकीय मेडिकल कॉलेज व रुग्णालय तातडीने पुन्हा स्थापन करण्यात यावे.

या संघर्षामुळे वर्धा जिल्ह्यातील जनतेला नवी आशा मिळाली असून आता सर्वांचे लक्ष 19 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे लागलेले आहे.संघर्षरत

गुरुनानक महाविद्यालयात 'लोकशाही सप्ताह'निमित्त पोस्टर स्पर्धा मुंबई सायनपार पडली

वर्धा अर्पित वाहाणे

वर्धा मुंबई सायन येथील गुरुनानक महाविद्यालयात दिनांक ९ सप्टेंबर २०२५ रोजी 'लोकशाही सप्ताह' (९ सप्टेंबर ते १५ सप्टेंबर) निमित्ताने "लोकशाही मूल्ये आणि घटनादर्शनी तत्त्वज्ञान" या विषयावर भव्य पोस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. ह्या स्पर्धेचे आयोजन राज्यशास्त्र विभाग, 'इलेक्टोरल लिटरेसी क्लब' व संविधान क्लब' यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.  

या स्पर्धेत महाविद्यालयातील विविध विभागांमधून ७० हून अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी लोकशाहीचे तत्त्वज्ञान, घटनात्मक मूल्ये आणि समाजातील लोकशाहीचा प्रभाव विविध चित्ररचनांद्वारे प्रभावीपणे मांडला. लोकशाहीच्या सशक्तीकरणासाठी तरुण पिढीच्या दृष्टिकोनाचे अनोखे दर्शन या स्पर्धेतून घडले.  

कार्यक्रमाचे सुयोग्य नियोजन आणि मार्गदर्शन राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा. सुमित खरात तसेच संविधान क्लबचे समन्वयक प्रा. अनिकेत उबाळे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. यात संविधान क्लबचे विद्यार्थी अध्यक्ष रोहन उघाडे, उपाध्यक्ष सायमा खान, सचिव शैफ खान, खजिनदार प्रिया शेट्टियार, तृतीय वर्षाची वर्गप्रतिनिधी नूरिन सोलकर, उपवर्गप्रतिनिधी रोहिणी देवेंद्र तसेच एहसान शेख, तौफिक शेख, गायत्री, जयशुदा, भूमिका शर्मा, शबनम, सनम, जफिरा, रितिका, महक तसेच तृतीय वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.  

लोकशाही मूल्ये आणि जागरुकतेचा प्रसार करण्यासाठी अशा स्पर्धा प्रभावी ठरत असल्याचे मत सहभागी व प्राध्यापकांनी व्यक्त केले.

समतानगरवासीयांच्या वतीने गटविकास अधिकारी पदावर नवनियुक्त रुजू झाले साळवे साहेब यांचे स्वागत केले



वर्धा अर्पित वाहाणे

वर्धा पंचायत समितीमध्ये नव्याने रुजू झालेले गटविकास अधिकारी . साळवे साहेब यांचे स्वागत समता नगरवासी यांच्या वतीने करण्यात आले. स्वागत आटोपल्यानंतर समता नगर मधील वाशी यांच्या समस्यांचे निवेदन सुद्धा त्यांना देण्यात आले त्यावेळी त्यांनी तात्काळ निवेदनावरती शेरा मारून संबंधितांना ते निवेदन पाठविले यावरून त्यांची कार्य तत्परता पाहायला मिळाली असे कर्तव्यदक्ष अधिकारी वर्धा पंचायत समितीला लाभल्यामुळे भविष्यामध्ये वर्धा पंचायत समितीच्या कामाला गती मिळेल अशी आशा सर्वांनी व्यक्त केली. यावेळी सम्यकदृष्टी सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष मनोज डोंगरे सचिव राजु थुल उपाध्यक्ष सुरेश वैद्य,सुभाष गायकवाड, बंडुजी नाखले, भाकेकर व समता नगर मधील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते

वर्धा. प्रवासादरम्यान काल ला सोनल वाणी यांची बॅग खडगी नागपूर रोडवर पडलेली होती ती बॅग यवतमाळ येथील



अर्पित वाहाणे

वर्धा नारायनराव थुल शाळा संस्थापक यांना सापडली त्यांनी लगेच राजू थुल यांना फोन केला त्यांनी निखिल गजभिये नागपूर यांना ही गोष्ट सांगितली ज्या प्रमाणे पोलीस विभागाचे चक्र फिरते अगदी त्याप्रमाणे चक्र फिरले व अगदी 2 तासामध्ये ती बॅग सोनाली वाणी यांना परत केली. नारायनराव थुल यांच्या प्रामाणिकपणामुळे ती बॅग परत मिळाल्याचे सोनाली वाणी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नारायनराव थुल यांचे सर्वत्र कौतुक होतं आहे. समाजात नारायनराव थुल सारखे व्यक्ती असल्यामुळे प्रामाणिकपणा जिवंत आहे
राजू भाऊ थूल. समाज भूषण पुरस्कार प्राप्त, विशेष कार्यकारी अधिकारी यांच्या सतर्कतेमुळे बॅग परत करण्यास खूप मदत झाली.असेही नारायनरावं थुल म्हनाले

बुधवार, १० सप्टेंबर, २०२५

विष्णुप्रसाद भारती द्वारा प्रथम आर्वी शहरातआयोजित गणपती बाप्पा सजावट स्पर्धाआर्वी बक्षीस वितरण कार्यक्रम शप्पणन झाला

वर्धा अर्पित वाहाणे
मो 8956647004

आर्वी आमदार सुमितदादा वानखेडे आर्वी विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले या मध्ये स्पर्धेचे प्रथम बक्षीस जगदीश तेजमल भूतडा रा. आर्वी द्वितीय बक्षीस सोहम रा. अनिल वाघ रा. जळगाव,तृतीय बक्षीस दिक्षा प्रविण विंचूरकर रा. आर्वी, चतुर्थ बक्षीस सर्वज्ञ गणेश देऊळकर रा. आर्वी सर्वं विजेत्यांचे आमदार सुमितदादा वानखेडे यांनी व या स्पर्धेचे आयोजक विष्णुप्रसाद भारती यांनी सर्वं विजेत्यांचे अभिनंदन केले.

,यावेळी उपस्थित विजयजी गिरी, अविनाशजी टाके, बाळासाहेबजी गुजरकरराधिकाताई भारती, वैष्णवीताई विठोले नितेश वानखेडे, प्रामुख्याने उपस्तित होते.

स्मृतीशेष इंजि. राजेश पाटील यांचे बुद्धा टेकडीवर पर्यावरण पूरक अस्थि विसर्जन

 
वर्धा अर्पित वाहाणे

रूढी आणि परंपरेला फाटा देत भर पावसात पाटील परिवाराने पार पडला अंत्यसंस्कार .

 वर्धा :- भारतीय रेल्वे विभागात कार्यरत इंजिनीयर राजेश देविदास पाटील यांचे कर्तव्यावर असताना वयाच्या 52व्या वर्षी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात आई कौशल्या पाटील, पत्नी मनीषा रा .पाटील,मुले अरिहंती व अर्हत पाटील,भाऊ प्रमोद,विनोद व प्रफुल पाटील,आणि माजी नायब तहसीलदार भगवान वनकर आणि कुटुंबातील सदस्यांच्या वतीने कोणतेही कर्मकांड ,रुढी, परंपरेला फाटा देत अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार त्यांच्या अस्थी वाहत्या पाण्यात विसर्जित न करता त्या अस्थी स्थानिक बुद्ध टेकडीवर दोन खड्डे करून त्यामध्ये अस्थी आणि राख पुरून बोधी वृक्ष व बकुळ वृक्षाचे रोपण करून पर्यावरणपूरक कृतिशील आदरांजली अर्पण करण्यात आली.याप्रसंगी माजी नायब तहसीलदार भगवान वनकर यांचे अध्यक्षतेखाली आदरांजली सभा घेण्यात आली. प्रारंभी वंदना विशेष कार्यकारी अधिकारी राजूभाऊ थुल यांनी घेतली. विविध मान्यवरांनी व कुटुंबीयांनी आपले आदरांजलीपर मनोगत व्यक्त केले. या सभेचे सूत्रसंचालन सुनील ढाले यांनी केले.यावेळी शाक्य संघ बहुउद्देशीय विकास संस्थेचे अध्यक्ष प्रवीण कांबळे, बुद्ध टेकडीचे सदस्य प्रणोज बनकर , दिनेश वाणी, सचिन धोंगडे कुटुंबातील पुष्पा पाटील, मीनाक्षी पाटील,सीमा पाटील,कुमुद वनकर,मोहनीश पाटील,विभा पाटील ,आकांक्षा वनकर,साहस वनकर ,अनिल कांबळे, विजय नगराळे,अभय बागडे,दीपचंद कांबळे,जयंत फुलझेले,किरण कांबळे, सचिन कांबळे,योगीराज फुलझेले,रजत भगत,विकास आटे, राजकुमार पाटील इ कुटुंबीय , आप्तसकीय मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. . या प्रसंगी पाटील परिवाराच्या वतीने बुद्धा टेकडी विकासासाठी नऊ हजार चे धम्मदान प्राप्त झाले.

दैनिक युवक आधारचा दुसरा वर्धापन दिन सोहळा भव्य दिव्य साजरा . मार्गदर्शन व गुणवंत व्यक्तिमत्त्वांचा सन्मान

मुंबई -: पनवेल व महाराष्ट्रात पत्रकारितेत वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या दैनिक युवक आधार या वृत्तपत्राचा दुसरा वर्धापन दिन उद्घाटक सुधीर कटेकर, न्यूज १८लोकमत चे सहसंपादक विलास बडे व साम टीव्हीचे मुख्य संपादक निलेश खरे यांच्या मार्गदर्शन पत्रकारांना लाभले तसेच उद्योगपती सुधीर कटेकर , प्रसिद्ध अभिनेत्री माधवी जुवेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध क्षेत्रात गुणवंत कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करत दै.युवक आधार पत्रकार टीमच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत असेल असा निर्धार संपादक संतोष शिवदास आमले यांनी करत दैनिक युवक आधारचा दुसरा 
वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात व थाटामाटात पार पडला.

 या सोहळ्यास विविध मान्यवर, पत्रकार बांधव,वाचक तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती.

या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज 18 लोकमतचे सहसंपादक व प्रसिध्द अँकर विलास बडे, साम टीव्ही चे संपादक निलेश खरे, तसेच मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री माधवी जुवेकर , बाल कलाकार अर्जुनी सस्ते , उपस्थित होत्या. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून वर्धापन दिन सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.

आपल्या मनोगतात विलास बडे यांनी “पत्रकारिता पाठीच्या कणाप्रमाणे भूमिका बजावत ताट पणे समाजाचे प्रश्न मांडून न्याय दिला पाहिजे विविध आणखी मार्मिक मार्गदर्शन पत्रकारांना त्यांनी केले असून ‘दैनिक युवक आधार’ने अल्पावधीतच सत्य व समाजहिताला प्राधान्य देणारे काम केले आहे.

साम टीव्हीचे संपादक निलेश खरे म्हणाले, “स्थानिक प्रश्नांना न्याय देणे, सर्वसामान्यांच्या अडचणी मांडणे आणि सकारात्मक घटनांना वाचा फोडणे हेच पत्रकारितेचे खरे ध्येय आहे. ‘दैनिक युवक आधार’ हे काम प्रभावीपणे करत असून वाचकांचा विश्वास संपादन करत आहे,” असे मत व्यक्त केले.

अभिनेत्री माधवी जुवेकर यांनी “पत्रकारिता आणि कलाक्षेत्र या दोन्हींचा समाजावर दूरगामी परिणाम होतो. ‘दैनिक युवक आधार’ने सत्याचा मार्ग स्वीकारत सामाजिक बदल घडविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, सर्वांनी नागरिकशास्त्र अभ्यास करत ते जपले पाहिजे व त्याप्रमाणे वागले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त करत पुढील वाटचालीसाठी दैनिक युवक आधारला शुभेच्छा दिल्या 

या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. शिक्षण, कला-संस्कृती, सामाजिक कार्य, आरोग्य व उद्योजकता अशा अनेक क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या शेवटी दैनिक युवक आधारच्या दोन वर्षांच्या यशस्वी प्रवासाचा आढावा घेण्यात आला व आगामी काळात आणखी सामाजिक आणि पत्रकारितेच्या उपक्रमांना गती देण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

दुसऱ्या वर्धापन दिनाच्या या सोहळ्यामुळे दैनिक युवक आधारची वाटचाल अधिक प्रेरणादायी व प्रभावी ठरणार आहे, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाराष्ट्र संपादक अजय कापरे, सहसंपादक मुकुंद कांबळे, कार्यकारी संपादक जगन्नाथ रासवे, उपसंपादक विलास गायकवाड, महाराष्ट्र प्रतिनिधी प्रमुख प्रदीप पाटील, कोकण विभाग विजय दुंद्रेकर,रायगड प्रतिनिधी प्रमुख एम डी भोईर, महाराष्ट्र उपसंपादक राजू शिंदे, पनवेल तालुका प्रतिनिधी प्रमुख मच्छिंद्र पाटील, बीड जिल्हा प्रतिनिधी मारुती सत्रे पनवेल महानगर प्रतिनिधी प्रमुख जगदीश क्षीरसागर, मीडिया प्रमुख अनुराग आमले, शंतनु भालेराव, आदित्य शेटे, आर्यन शेटे, राहुल माने, कैलास नेमाडे, प्रसाद हनुमंते, कैलास रक्ताटे, अण्णासाहेब आहेर कार्यक्रम नियोजक विशाल सावंत नियोजन समिती अध्यक्ष बाळा झोडगे इत्यादी लोकांनी परिश्रम घेतले .

रविवार, ७ सप्टेंबर, २०२५

तळेगाव येथे ईद-ए-मिलाद उन नबी जल्लोषात आणि शांततेच्या वातावरणात साजरी करण्यात आली.

वर्धा प्रतिनिधी अर्पित वाहाणे

तळेगाव जामा मस्जिद येथून सकाळी ८ वाजता
मिरवणुकीची सुरुवात झाली.संपूर्ण शहरातून ही मिरवणूक फिरली,ज्यामध्ये मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग राहिला.मिरवणुकीदरम्यान नात पठण, सलाम पठणआणि अमन, प्रेम आणि भाईचाऱ्याचा संदेश देण्यात आला.शहरातील गल्लीबोळ सजवण्यात आले होतेआणि नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या प्रसंगी थानेदार साहेब व PSI साहेब यांचेस्वागत व सत्कार असद खान व बाबा भाई यांनी केला,तसेच AIMIM शहराध्यक्ष फ़ाज़िल खान यांनीपत्रकार बांधवांचा सन्मान करूनकार्यक्रमात सहभागी झालेल्या सर्वांचे आभार मानले.संपूर्ण कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडला नाहीआणि पोलिस प्रशासनाने उत्तम बंदोबस्त ठेवन्यात आला होता.

गुरुनानक महाविद्यालयाचा मुंबई उच्च न्यायालय अभ्यास दौरा

वर्धा अर्पित वाहाणे

वर्धा सायन येथील गुरुनानक महाविद्यालयाच्या राज्यशास्त्र विभाग व संविधान क्लबच्या संयुक्त विद्यमाने प्रथम, द्वितीय व तृतीय वर्षातील राज्यशास्त्राच्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईतील ऐतिहासिक मुंबई उच्च न्यायालयाचा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला.

या दौर्‍यात विद्यार्थ्यांनी न्यायालय कसे कार्य करते, वकील कशाप्रकारे युक्तिवाद करतात याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. तसेच उच्च न्यायालयाचे ऐतिहासिक महत्त्व आणि न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा यांचा थेट परिचय झाला.

भ्रमंतीदरम्यान विद्यार्थ्यांनी विविध न्यायालयीन कक्ष कोर्ट रूम्स पाहिले व चालू न्यायप्रक्रिया जवळून समजून घेतल्या. याशिवाय माननीय न्यायमूर्तींच्या वाचनालयाला (Hounerable Judges’ Library) तसेच हायकोर्ट संग्रहालयालाही भेट देण्याची संधी मिळाली.

या शैक्षणिक उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना माननीय न्यायमूर्ती व अधिवक्त्यांशी प्रत्यक्ष संवाद साधता आला. या संवादातून त्यांना न्यायप्रक्रिया, घटनात्मक जबाबदाऱ्या व विधिक परंपरा यांचे सखोल ज्ञान मिळाले.

या दौऱ्याच्या यशस्वी आयोजनात राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. सुमित खरात यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर संविधान क्लबचे समन्वयक प्रा. अनिकेत रविंद्र उबाळे यांनीही सक्रिय भूमिका बजावली.

महाविद्यालय व्यवस्थापन व प्राध्यापकांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की शिक्षणाबरोबरच अशा प्रकारचा प्रत्यक्ष अनुभवविद्यार्थ्यांसाठीआयुष्यभरउपयोगीठरेल आणि घटनात्मक मुल्यांबद्दलची त्यांची निष्ठा अधिक दृढ करेल.”

शुक्रवार, ५ सप्टेंबर, २०२५

अकोला बाजार येथील सिद्धार्थ बुद्ध विहारात पाण्याची गळती.

वर्धाअर्पित वाहाणे

वर्धा यवतमाळ जिल्ह्यातील अकोला बाजार या गावी असलेल्या सिद्धार्थ बुद्ध विहारात गेल्या काही दिवसांपासून स्लॅबच्या पाण्याची गळती होत आहे. सोबतच विहाराच्या बाजूला असलेल्या नालीचे संपूर्ण पाणी विहारात येत असल्याने विहारात बसायला सुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही. सदर विहाराच्या इमारतीचे बांधकाम 2006 साली झाली असून, या इमारतीला आता जवळपास 20 वर्षे होत आहे. वरून स्लॅप पूर्णपणे गळती धरत आहे. व ही इमारत कधीही कोसळू शकते. याबाबत ग्रामपंचायतकडे मागणी केली असता, अकोला बाजार येथील सरपंच श्री. योगेश राजूरकर यांनी विहाराची पाहणी केली व सध्याचा पर्याय म्हणून स्लॅब ची दुरुस्ती करून देण्याचे आश्वासन दिले. सर्व बौद्ध समाज बांधवांची एकच मागणी आहे की विहाराच्या इमारतीची नवीन बांधणी करून द्यावी व इमारतीच्या बाजूला असलेले नालीचे बांधकाम करावे, जेणेकरून पुन्हा कधीही नाल्याचे पाणी विहारात व परिसरात जाणार नाही. तसेच समाज बांधवांना प्रवचन देण्यासाठी बौद्ध भिक्खू तिथे निवासी राहत असून त्यांच्या जीवाला धोका उद्भवू शकतो करिता सर्व समाज बांधवांकडून बौद्ध विहाराचे दुरुस्ती व नवीन बांधकामाची मागणी होत आहे

मुस्लिम सोशल फोरम तर्फे ईद ए मिलादुन्नबीच्या शुभेच्छा मंडपास वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री मा. डॉ. पंकज भोयर यांनी भेट दिली.

वर्धा अर्पित वाहाणे

वर्धा – मुस्लिम सोशल फोरम तर्फे ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने भव्य शुभेच्छा मंडप बाजार चौक, वर्धा येथे उभारण्यात आला होता. या मंडपाला आज वर्धा जिल्ह्याचे पालक मंत्री मा. डॉ. पंकज भोयर यांनी भेट देऊन मुस्लिम बांधवांना ईद ए मिलादुन्नबीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

शुभेच्छा मंडपाच्या भेटीदरम्यान मुस्लिम सोशल फोरमचे पदाधिकारी एस .के. सलीम उर्फ सल्लू भाई, रिझवान पठाण, आसिफ खान, अकरम शेख, इद्दू भाई व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांचे स्वागत केले. 
मुस्लिम बांधवांनी दिलेल्या आत्मीय सत्कारास मंत्री डॉ. पंकज भोयर यांनी प्रतिसाद देत सर्वांना सद्भावनेचा व समाजकल्याणाचा मार्ग अंगीकारण्याचे आवाहन केले.

मुस्लिम सोशल फोरमच्या वतीने उपस्थित मान्यवरांनी मंत्री महोदयांचे आभार मानले व पुढेही समाजहितासाठी असे कार्यक्रम राबविण्याचा निर्धार व्यक्त केला.

मुस्लिम सोशल फोरमच्या वतीने सर्वांना ईद ए मिलादुन्नबीच्या हार्दिक शुभेच्छा

बुधवार, ३ सप्टेंबर, २०२५

महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनासाठी मुंबईत ऐतिहासिक संयुक्त सभा

वर्धा अर्पित वाहाणे

वर्धा महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पुढील दिशेबाबत चर्चा करण्यासाठी आयोजित ऐतिहासिक संयुक्त सभा दादर (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे ३ सप्टेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.  
या सभेला समता सैनिक दलाचे केंद्रीय संघटक आद. मार्शल सुनील सारीपुत्त राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख आद. ॲड. मार्शल प्रकाश दार्शनिक, यांनी प्रमुख उपस्थिती लावली. तसेच केंद्रीय कमिटी सदस्य आद. मार्शल सुरेश जाधव (मुंबई), महाराष्ट्र राज्य संघटक प्रा. मार्शल अनिकेत उबाळे* यांच्यासह मुंबई विभागातील समता सैनिक दल व इतर संस्था, संघटना यांचे प्रांतीय पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे, समता सैनिक दलाचे राज्य कमिटीचे वरिष्ठ सदस्य मार्शल विजय वासनिक (यवतमाळ), महाराष्ट्राचे राज्य कार्यकारी मंडळ सदस्य मार्शल हिवराज टेंभूर्णे, विदर्भ प्रांत संघटक मार्शल निवारण कांबळे (चंद्रपूर) तसेच भंते सायरन प्रियदर्शी (बिजनौर) यांनीही या सभेत सहभाग घेतला.  

सभेदरम्यान ऑल इंडिया बुद्धिष्ट फोरमचे महासचिव आकाश लामा आणि भंते विनाचार्य यांच्यासोबत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाची रणनीती आखण्यात आली. आंदोलनाच्या माध्यमातून बौद्ध समाजाच्या हक्कासाठी न्याय्य मार्गाने लढा देण्याचा निर्धार व्यक्त झाला.  

दरम्यान, समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक आद. सुनील सारीपुत्त सर व राष्ट्रीय बौद्धिक प्रमुख आद. मार्शल ॲड. प्रकाश दार्शनिक सर यांनी मुंबईतील चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आदरांजली वाहिली. या सर्व पदाधिकाऱ्यांचा दोन दिवसीय मुंबई दौरा असून त्यांनी मुंबई विभागाच्या समता सैनिक दलाच्या टिटवाळा स्थित कार्यालयास ही सदिच्छा भेट दिली.  

कार्यक्रमाच्या शेवटी, समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी "महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला" पुढील पिढीची बांधिलकी म्हणून आणि आपला ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचा संकल्प करावा असे आवाहन समता सैनिक दलाचे महाराष्ट्र राज्याचे संघटक प्राध्यापक मार्शल अनिकेत उबाळे यांनी केले.

अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांगांना 100 टक्के अनुदानावर स्कुटी

वर्धा अर्पित वाहाणे

वर्धा जिमाका जिल्हा परिषद समाज कल्याण विभागाच्यावतीने दिव्यांगासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. योजनेंतर्गत 5 टक्के दिव्यांग निधीतून या वर्षात वैयक्तिक लाभाच्या योजनेंतर्गत अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग लाभार्थ्यांना स्कुटी पुरविण्यात येणार आहे. या योजनेचा दिव्यांग लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वैशाली रसाळ यांनी केले आहे.
सदर योजना 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येणार असून यासाठी इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी संबंधित पंचायत समितीस्तरावर संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांसह दि.30 सप्टेंबर पर्यंत अर्ज सादर करावा. अर्जसोबत वैश्विक ओळखपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, आधारकार्ड, बँक पासबुक, पासपोर्ट आकाराचे छायाचित्र इत्यांदी कागपत्राची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे, असे जिल्हा समाज कल्याण अधिकारी प्रतिभा भागवतकर यांनी कळविले आहे.

रविवार, ३१ ऑगस्ट, २०२५

सुनील डोंगर याची महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदी निवड झाली



वर्धा अर्पित वाहाणे

आर्वी महात्मा ज्योतिराव फुले,शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व कांशीराम साहेब यांची चळवळ महाराष्ट्रा मध्ये प्रखर तळमळीने एक कार्यकर्ता म्हणुन बहुजन समाजाला एकत्र करून चळवळीला एक नविन नेतृत्व*म्हणुन आम्ही त्यांना बघतो असे निस्वार्थी, निष्ठावान, प्रामाणिक पायाला भिंगरी बाधुन न थकता फिरनारे, मिशन वाढविणारे महराष्ट्राचे स्वतः एक कार्यकर्ता म्हणून बघणारे आमचे मार्गदर्शक अँड . सुनिलजी डोंगरे साहेब यांची आदरणीय बहन कुमारी मायावतीजी यानीं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष या पदावर फेरनिवड केल्याबद्ल मा. अँड. सुनिलजी डोंगरे साहेब यांचे बहुजन समाज पार्टी 
नंदुरबार जिल्हाध्यक्ष मा.बाळासाहेब ब्राम्हणे, जिल्हा प्रभारी मा .जितेंद्र भाऊ तायडे व सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतक यांचे कडून खुप खुप अभिनंदन
BSP जिन्दाबाद, BSP जिन्दाबाद