न्यायासाठी बोलणारा आवाज

बुधवार, २४ डिसेंबर, २०२५

संविधान दिनानिमित्त संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम यशस्वी



अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी

आर्वी संविधान दिनानिमित्त त्रिशरण बुध्द विहार, भिमसैनिक अशोक कुंभारे परिसर, स्टेशन वार्ड, देऊरवाडा रोड, आर्वी येथे संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.आदर्श एकता सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य व त्रिशरण बुध्द विहार आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय दिलीप पखाले (शासकीय विद्युत कत्राटदार) यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मा. उमेश म्हैसकर तर स्वागताध्यक्षपदी मा. ओमप्रकाश पाटील यांनी आपले महत्वाचे विचार मांडले. दीप प्रज्वलन मा.कमलेश कामडी आणि सुजित भिवगडे (सामाजिक कार्यकर्ते) व उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांनी केले. संविधान प्रास्ताविक वाचन मा. भीमरावजी मनवर आणि मा. प्रविण सातपुते यांनी केले.
कार्यक्रमाला सन्माननीय विशेष निमंत्रित पाहुणे म्हणून उपस्थित होते मा. चंद्रकांत ढोले (पोलीस उपअधीक्षक आर्वी), मा. सतिश डेहनकर (ठाणेदार पोलीस स्टेशन आर्वी), मा. अमित गायकी (उपकार्यकारी अभियंता आर्वी), मा. डॉ. राजपाल भगत (प्रदेशाध्यक्ष स्वराज्य आघाडी महाराष्ट्र राज्य), आणि 
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भन्ते धम्मज्योती (वर्धा), मा. ॲड. अरविंद काळे, मा. प्रा. डॉ. अनिल दहाट, मा. प्रा. पंकज वाघमारे, मा. प्रा. डॉ. प्रविण काळे, मा. प्रफुल्ल कांबळे, मा. बाबाराव सोमकुवर, मा. एम. के. चतुर साहेब, मा. प्रा. डॉ. विजयाताई मुळे, मा. मधुभाऊ सोमकुंवर, मा. प्रविण तंबाके, सौ. भारती बनसोड, मा. सचिन पाटील व प्रा.स्नेहल सोनोने यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा गौरव वाढवला.
या कार्यक्रमात विशेष सत्कारमुर्ती म्हणून आयुष्यमती उषाबाई हरिदासजी रंगारी (बुद्धमूर्ती दानदात्या) व संजय कळणे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य पुतडा उभारला त्या साठी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पार्वताबाई दहाट यांचा सततच्या प्रोत्साहन व धम्मदानाबद्दल गौरव करण्यात आला सुनील कांबळे यांनी संविधान वाटप केले.
कार्यक्रमात निशाताई धोंगडे (फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या राष्ट्रीय प्रबोधनकार, सुप्रसिद्ध गायिका, सिनेमा अभिनेत्री व नाट्यकलावंत) यांनी भीमगीत आणि संविधान जागराचे सुंदर सादरीकरण केले, ज्याने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श एकता सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष गौतम अशोकराव कुंभारे यांनी केले, तर कार्यक्रमाचे यशस्वी संचालन प्रा. अमर काशिनाथ भोगे (उपाध्यक्ष आदर्श एकता सामाजिक संघटना) यांनी केले. आणि आभार मा. विनोद कांबळे (सचिव आदर्श एकता सामाजिक संघटना) यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक समाज बांधवांनी परिश्रम घेतले, ज्यामध्ये महिंद्र घोडे, आकाश मुन, प्रमोद घोडीले, मंगेश सरोदे, विजय गजभिये, राजू डोंगरे, तेजस डोंगरे,अविनाश थोरात, भूषण इमाने, शुभांगी कुंभारे, सुलोचना कुंभारे, चंदा सरोदे, सीमा गोंडणे,मेघा सरोदे,चंदा डोंगरे, छकुली माहुरे, विजय कुंभारे, विनोद कांबळे, स्वाती थुल, राकेश वरठी, प्रदीप बनसोड, सोमेश्वर भगत, विलास बनसोड,दिनेश सिंगणापुरे,विनोद सरोदे,मंगेश सरोदे, हंसपाल भगत, सुरेंद्र पाखले यांचा सहभाग उल्लेखनीय होता.
हा कार्यक्रम संविधानाचे महत्त्व व सामाजिक एकतेचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मोलाचा ठरला. यावेळी आर्वी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील लोकसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

यशवंत विद्यालय येथे महामानवास अभिवादन

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004

वर्धा आगरगावःस्थानिक यशवंत विद्यालय आगरगाव येथे विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 69 व्या महापरिनिर्वाण दिना निमित्त अभिवादन करण्यात आले. सर्वप्रथम शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक शशिकांत सानप यांच्या हस्ते डॉ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी शाळेच्या ज्येष्ठ शिक्षक अभय कुंभारे व ज्येष्ठ शिक्षका सौ.कविता डेकाटे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.. याप्रसंगी विद्यार्थ्यांची स्वयस्फुर्त भाषणे झाली.यावेळी अभय कुंभारे यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपल्या भाषणातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली अर्पण केली.ते म्हणाले बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून जे मोलाचे कार्य केले त्यामुळे संपूर्ण भारतवर्ष त्यांच्या या अमर कृतीच्या रूणाखाली सदैव राहिल. या कार्यक्रमाच्या वेळी शाळेतील संपूर्ण शिक्षक- शिक्षिका शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संचालन कुमारी रूतीका नेहारे हिने केले तर उपस्थितांचे आभार आरुषी रोम हिने मानले.या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक शशिकांत सानप, अभय कुंभारे,सौ.कविता डेकाटे,व शिक्षकेत्तर कर्मचारी दिनेश नेहारे यांनी परिश्रम घेतले .
आगरगाव (तांडा)येथे समता सैनिक दलाच्या वतीने महिला व बालिका यांना कपडे व साड्याचे वितरण स्थानिकःदेवळी तालुक्यातील आगरगाव तांडा येथील सार्वजनिक वाचनालय येथे समता सैनिक दलाच्या वतीने छोट्या बालिकांना कपडे व महिलांना साड्यांचे वितरण करण्यात आले.गेल्या अनेक वर्षांपासून समता सैनिक दल पारधी तांड्यावरील वंचित विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी मोलाचे कार्य करीत आहे.त्यांच्या गरजा लक्षात घेऊन त्यांना दरवर्षी पुस्तके व नोटबुक वाटपाचा कार्यक्रम होत असतो.यावेळी मदतीचा हात म्हणून तेथील बालीका यांना कपडे व महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून समता सैनिक दलाचे वर्धा जिल्हा संघटक अभय कुंभारे तसेच आदिवासी फासे पारधी बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा समता सैनिक दल आगरगाव तांडा बौध्दिक प्रमुख अचिन पवार,समता सैनिक दल आगरगाव तांडा शाखा संघटक अजित पवार,आगरगाव शाखा संघटक आदर्श हाडके ,शाखा संरक्षक आकाश पवार हे प्रामुख्याने उपस्थित होते.समता सैनिक दल जिल्हा संघटक तथा विदर्भ विशेष प्रचारक यांच्या हस्ते कपडे व साड्या वितरीत करण्यात आले.यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले . या कार्यक्रमाचे संचालन आकाश पवार याने केले तर उपस्थितांचे आभार अचिन पवार यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी योगिता संदीप भोसले,प्रतिभा अजमान चव्हाण,मीना सचिन पवार,सावनी विशाल पवार,रजनी राहुल चव्हान,अमिषा संदीप भोसले,निर्जुना काळे आदिंनी परिश्रम घेतले.