रविवार, २ ऑगस्ट, २०२६
शुक्रवार, ३१ जुलै, २०२६
जाहिरात
जाहिरात जयंती निमित्तानं
गुरुवार, ३० जुलै, २०२६
शुक्रवार, १७ एप्रिल, २०२६
तथागत बुद्ध, राष्ट्रपिता फुले, छत्रपती शाहू, क्रांतिकारी बिरसा, ह. टिपू सुलतान, वि.डॉ.बाबासाहेब आंबेडकर"संयुक्त जयंती महोत्सव समिती" आर्वी विधानसभा बहुजन समाज पार्टीच्या वतीने आर्वी आष्टी कारंजा तीनही तालूक्यात उपक्रम रभवीला येणार
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
आर्वी कार्यकारणी गठीत करण्यात आली.
बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा. ऍड. सुनिलजी डोंगरे, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली दि. 15 /04/2026 ला तळेगाव येथे *B.F.S.B.T.A* संयुक्त जयंती महोत्सव समितीचे गठन करण्यात आले.सोबतच आर्वी तालुका समितीचे पण गठन करण्यात आले.
*विधानसभा कार्यकारिणी
आर्वी विधानसभा अध्यक्ष : भिमसैनिक. अक्षय भगत
विधानसभा उपाध्यक्ष
प्रशांत विघ्ने आष्टी
विधानसभा उपाध्यक्ष :
राहुल दुपारे आर्वी
विधानसभा उपाध्यक्ष :
प्रवीण रामटेके कारंजा
विधानसभा सचिव
अमोल रंगारी आर्वी
विधानसभा सचिव :
सागर मेंढे आष्टी
विधानसभा सचिव संदीप दहिवडे कारंजा विधानसभा कोष्याध्यक्ष :
मनोज माहुरे,विधानसभा व्यवस्थापक :
कवडूजी मेश्रामविधानसभा संघटिका :
ऍड. शारदाताई खोब्रागडे,
आर्वी तालुका कार्यकारिणी
तालुकाध्यक्ष विनोद पायले
ता.उपाध्यक्ष अंकुश पाटील
ता. सचिव प्रवीण मनवर
ता.संघटिका प्रतिभाताई डोंगरे,
ता. संघटक प्रमोद पखाले,
ता. व्यवस्थापक अजय दाभाडे
ता.B. V. F धीरज भगत,
तालुका सदस्य राजपाल अघम,
तालुका सदस्य बाल्याभाऊ डोंगरे
तालुका सदस्य अनिकेत भगत
तालुका सदस वसंतराव नगराळे
तालुका सदस्य पंकज नाखले
तालुका सदस्य गौतम मेश्राम
तालुका सदस्य शिंगाने
डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त एक पुस्तक ग्रंथालयासाठी या अभिनव उपक्रमाने सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
आर्वी ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांच्या पुढाकारातून सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचा अभिनव उपक्रम
एक वही एक पेन व भव्य ग्रंथ ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन
विविध मान्यवरांची ग्रंथ प्रदर्शनीला भेट
या अभिनव उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद
*आर्वी येथे सिद्धार्थ बुद्ध विहार येथे सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वीच्या वतीने एक पेन एक वही व एक पुस्तक ग्रंथालयासाठी व भव्य ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी हार व फुले यासोबतच महामानवाला अभिवादन करायला येताना एक पुस्तक जयंती निमित्त अर्पण करून अनोखे अभिवादन करावे असे आवाहन ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांच्या वतीने करण्यात आले होते.
ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथप्रेम या विषयावर उपस्थितांना समजावुन सांगीतले. की, डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी बॉम्बे क्रॉनिकल या वृत्तपत्रास एका पत्राद्वारे लिहलं होतं. समाजास बौध्दिक आणि सामाजिक उन्नती करीता ग्रंथालयांची अपरिहार्य आवश्यकता या पत्रातून त्यांनी मांडली होती. अमेरिकेत असतांना त्यांनी ग्रंथांचं प्रचंड वाचन केलं. या वाचनातून जो थोडा वेळ त्यांना मिळायचा त्या वेळात ते रस्त्यांवरुन फिरुन ग्रंथ गोळा करायचे. अशी सुमारे 2000 ग्रंथ त्यांनी अमेरिकेतून विकत आणले होते.बाबासाहेब आंबेडकरांचा हा वाचन व्य्यासंग आणि ग्रंथप्रेम सर्व जगाला माहित आहे.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आयोजित या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला.
जमा झालेली पुस्तके ग्रंथालयामार्फत वाचकांना उपलब्ध करुन देण्यात येतील तर वही व पेन गरजू व्यक्तींना दान स्वरूप देण्यात येतील.
या उपक्रमाला
वर्धा लोकसभा क्षेत्राचे खासदार अमरभाऊ काळे , आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुमित वानखेडे आर्वी नगरपालिका नगराध्यक्ष स्वाती प्रकाश गुल्हाने तसेच नगरसेवक गुड्डू गावंडे नगरसेविका शुभांगी गाठे व प्रहार सोशल फोरमचे बाळाभाऊ जगताप, मंडळ अधिकारी प्रशांत एकापुरे, आदिवासी समाजसेविका यशोदाताई आत्राम, प्रा डॉ अनिल दहाट, शारदा मून वन विभाग आर्वी अभिलाष तागडे , उषा तायवाडे मॅडम, अरविंद वावरे राहुल हिरेखन अनेक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायांनी मान्यवरांनी स्टॉलला भेट दिली.
महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समारोह
कठोरा नाका, मानवता मैदान, कृष्णार्पण विहार,स्वावलंबी नगर रोड अमरावती येथे
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो 8956647004
वर्धा स्थानिक अमरावती उपस्थित राहून जयंती पर्वावर विचार व्यक्त करून महात्मा ज्योतिबा फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांना अभिवादन केले व सर्व जनतेला जयंती पर्वावर शुभेच्छा दिल्या. या जयंती सोहळ्याला आमचे मित्र नगरसेवक मा. चंदुभाऊ खेडकर,या जयंती समारोहाचे अध्यक्ष मा. प्रा.डॉ. सुरेशजी गाडे सर,मा. प्रा. अनिलजी तायडे सर, मा.चंद्रशेखरजी बायस्कर सर,मा.प्रा. अरुणराव इंगळे सर,मा.चरणदासजी निकोसे सर,मा.विनोदजी ढवळे सर,मा. रजनीताई तेलगोटे, प्रा. अमनजी देवपारे, मा.विजयजी गजभिये सर,मा,कुमुदताई रायबोले,मा. मंदाताई वानखडे,मा. इंजि. तेलगोटे साहेब उपस्थित होते.
बुधवार, १५ एप्रिल, २०२६
आजाद समाज पार्टी कांशीरामवाळूज महानगर, ता. गंगापूरविश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 वी जयंती सादरी करण्यात आली
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
गंगापूर विश्वरत्न महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा व अन्नदान कार्यक्रम उत्साहात संपन्न
दि. 14 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता, शक्ती नगर, अंबर हॉटेल समोर, वाळूज (ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर) येथे आजाद समाज पार्टी (कांशीराम) यांच्या वतीने अभिवादन सभा व अन्नदान कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अन्नदान कार्यक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष
मा. अरविंद कांबळे (प्रदेश महासचिव, महाराष्ट्र राज्य)
प्रमुख उपस्थिती
कैलास गायकवाड (मराठवाडा उपाध्यक्ष)
साहेबराव दाभाडे ( जिल्हा उपाध्यक्ष)
राजू निकाळजे (जिल्हा उपाध्यक्ष)
नवाब पटेल (अल्पसंख्यांक शहराध्यक्ष)
राहुल जाधव (शहर उपाध्यक्ष)
रेखाताई राजभोज (महिला आघाडी शहराध्यक्ष)
संजय वाहूळ, अनिल तुपे, साहेबराव खरात
राजभर साहेब, मनोज साळवे, लक्ष्मण पिटले
डॉ. चव्हाण व विक्रम ढेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
अध्यक्षीय भाषण मा. अरविंद कांबळे (प्रदेश महासचिव महाराष्ट्र राज्य) यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय शिनगारे (जिल्हाध्यक्ष, छ. संभाजीनगर) यांनी केले.
बौद्धाचार्य अर्जुन पठारे यांनी त्रिशरण पंचशील गाथा सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.
या वेळी मोठ्या प्रमाणात उपासक, उपासिका, बालिका व धम्म बांधव उपस्थित होते.
आयोजक
शिवाजी वीर (मराठवाडा अध्यक्ष)
विजय शिनगारे (जिल्हाध्यक्ष, छ. संभाजीनगर - ASP)
साळवे साहेब ,सुराशे साहेब ,भालेराव साहेब
*विजय देवराव शिनगारे जिल्हाध्यक्ष*
*आजाद समाज पार्टी (का) छ संभाजीनगर*
सोमवार, १३ एप्रिल, २०२६
आग्रहाचे निमंत्रणASP आजाद समाज पार्टी कांशीराम*वाळूज महानगर, ता. गंगापूर
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
*गंगापूर विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त अभिवादन सभा व अन्नदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे*
*प्रमुख मार्गदर्शक*
मा. अरविंद कांबळे (प्रदेश महासचिव, महाराष्ट्र राज्य)
मा. सत्यजित साळवे (प्रदेश उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य)
मा. किशोर म्हस्के (प्रदेश महासचिव, महाराष्ट्र राज्य)
*प्रमुख उपस्थिती*
जिल्हा युनिट, शहर युनिट, तालुका युनिट, विद्यार्थी आघाडी, महिला आघाडी, कामगार आघाडी (ASP)
*दिनांक : 14/04/2026*
*वेळ : सकाळी 11:00 वाजता*
स्थळ : शक्ती नगर, अंबर हॉटेल समोर, वाळूज, ता. गंगापूर, जि. छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद)
ASP च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, ही नम्र विनंती.
आयोजक -
शिवाजी वीर (मराठवाडा अध्यक्ष)
विजय शिनगारे (जिल्हाध्यक्ष, छ. संभाजीनगर ( ASP)
रविवार, १२ एप्रिल, २०२६
क्रांतीसुर्य सत्यशोधक महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती प्रत्येकाने मोठ्या उत्साहात साजरी केली पाहिजे अँड पवन निकम आज
अर्पित वाहाणे वर्धा
जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
आर्वी गौरक्षक सेना वीर वारकरी सेवा संघ परभणी राष्ट्रजन फाउंडेशन परभणी च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधून सर्वात पहिली शिवजयंती साजरी करणारे थोर योगपुरुष शिक्षणाचे जनक सत्यशोधक क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा राव फुले जयंतीनिमित्त अभिवादन पूजन सोहळा दिनांक 11 एप्रिल 2026रोजी सात वाजता महात्मा फुले व सावित्रीबाई फुले पूर्णकृती पुतळ्यास अभिवादन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टीचे अँड पवन भाऊ निकम, प्रमुखपाहुणे समाजसेवक शिवलिंग आप्पा खापरे योगेश जोशी सोनपेठकर दत्ता लाड साहेब जितेंद्र चव्हाण बंडू म्हात्रे आयोजक राष्ट्रजन फाउंडेशन अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर आधी जणांच्या उपस्थित अभिवादन करण्यात आले महात्मा फुले यांचा विचार घरापर्यंत पोहोचला पाहिजे व महात्मा फुले यांची जयंती ही प्रत्येक कॉलनी प्रत्येक कॉलनी प्रत्येकाने घरोघरी साजरी केली पाहिजे महात्मा फुले की जय सावित्रीबाई फुले की जय घोषणा देऊन कार्यक्रम संपन्न
अशी माहिती गौरक्षक सेना मराठवाड्याचे अध्यक्ष गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर त्यांना पत्रकार द्वारे माहिती दिली
शुक्रवार, १० एप्रिल, २०२६
आपण सर्व सुखरूप आणि आनंदात असाल अशी आशा आहे.
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
नागपूर आम्ही आंबेडकर एज्युकेशन मिशन अंतर्गत एक नाईट स्कूल चालवत आहोत, जिथे आम्ही वंचित मुलांना शिक्षण देतो. आमचे वर्ग रामगिरी झोपडपट्टी, सिव्हिल लाईन्स, नागपूर, महाराष्ट्र येथे घेतले जातात.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आम्ही मुलांसोबत एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करत आहोत, ज्यामध्ये शिक्षण, समता आणि त्यांच्या विचारांचा प्रसार केला जाईल.
या कार्यक्रमासाठी आम्ही शैक्षणिक सत्रे, मुलांसाठी अल्पोपहार आणि लहान भेटवस्तू यांची व्यवस्था करत आहोत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला आर्थिक मदत किंवा पुस्तके, वह्या, पेन इत्यादी साहित्याची आवश्यकता आहे.
आपली मदत, जरी ती लहान असली तरी, या मुलांसाठी एक प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण अनुभव निर्माण करण्यास मदत करेल. आम्ही निधीच्या वापरात पूर्ण पारदर्शकता राखू.
कृपया या उपक्रमासाठी आम्हाला सहकार्य करा.
आपला वेळ आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
समीक्षा गावंडे
निघत स्कूल
टीचर अँड कूरदिनाटर
संपर्क:- 7796251987
आंबेडकर वॉर्ड, बुद्ध विहार येथून भव्य महिला बाईक रॅलीआयोजन आर्वी
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
आर्वी प्रज्ञा शिल करुणा ग्रुप आयोजित
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
भव्य महिला बाईक रॅली
प्रिय बहिणींनो आणि सुविद्य मुलींनो,
*आंबेडकर वॉर्ड, बुद्ध विहार येथून निघणारी*
विशेष महिला बाईक रॅली तुम्हाला सर्वांना हार्दिक आमंत्रण देत आहे!
दिनांक : सोमवार, १३ एप्रिल २०२६
वेळ : *सायंकाळी ठिक ५:०० वाजता*
ठिकाण आंबेडकर वॉर्ड, बुद्ध विहार (सुरुवात)
विशेष आकर्षण :
वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा (ड्रेस कोड) मध्ये सहभागी होण्याची संधी
*बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार करत एकतेची मिरवणूक*
बाईक रॅलीत सहभागी व्हा
आपली सौंदर्य, शक्ती आणि एकता दाखवा
बाबासाहेबांच्या विचारांचा जयघोष करा
सर्व महिला आणि मुलींना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन!
जास्तीत जास्त बहिणी एकत्र येऊन ही रॅली भव्य आणि लक्षात राहील अशी बनवूया!
प्रज्ञा शिल करुणा ग्रुप
"*महिलाशक्ती*, बाबासाहेबांच्या विचारांसह" माहितीसाठी संपर्क साधा आपल्या ग्रुपमधील आयोजकांशी)
जय भीम! जय महिला शक्ती
सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी तर्फे आयोजित
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा
Mo 895647004
आर्वी धम्मनायक प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक , क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित
साहित्य संवाद व प्रबोधन कार्यक्रम व पालीभाषा परीक्षा प्रमाणपत्र वितरण.
दिनांक शनिवार ११ एप्रिल २०२६
वेळ :- दुपारी १२.३० ते ४.००
स्थळ :- सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी
जिल्हा- वर्धा
उद्घाटक :- माननीय पुरुषोत्तम डोंगरे (समता साहित्य मंच आर्वी आष्टी कारंजा)
कार्यक्रमाचे अध्यक्ष :-
प्रा.प्रवीण कांबळे निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवार नागपूर
स्वागताध्यक्ष :-
प्रा. राजेश सवाई
विशेष अतिथी माननीय शारदा मेश्राम,मून वन विभाग आर्वी. माननीय अर्चना पराते मॅडम. प्रमुख अतिथी
कवी सुरेश वंजारी, प्रा. डॉ. अनिल भगत प्रा.अजय मेश्राम प्रा. डॉ. प्रवीण काळे प्रा. डॉ.अनिल दहाट मधुकररावजी सोमकुवर, सहदेवरावजी भगत भानूदासजी फुसाटे, रामदासजी नाखले
गणेशराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते साजिद पटेल आर्वी. मधुकर सवाळे ( तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा आर्वी)
साहित्य संवाद व प्रबोधनविजय आशेचा काव्यसंग्रह कवयित्री आशा विजय चौधरी
वक्ते :- डॉ. प्रसन्नकुमार बंबलेखक व कवी आर्वी. निनाद काव्यसंग्रह कवी कृष्णा हरले साहुरकर वक्ते :- कवी सुरेश भिवगडेया झोपडीत सुद्धा ' माणूस ' राहतो... गझल संग्रह गझलकार प्रकाश बनसोड आर्वी.वक्ते :- प्रा. डॉ.अरविंद पाटील वर्धा.
वादळातील निखारे ( लेखसंग्रह
लेखक राजकुमार सोनटक्के आर्वी.
वक्ते :- आर. एस. तायडे
कवी समीक्षक व पत्रकार अमरावती.
द मिरर अँड द पोर्ट्रेटस (स्वकथन )
लेखक प्रा. विजयेंद्र निरंजन सुरवाडे
वक्ते :- प्रा. प्रदीप लोहकरे हिंगणघाट. समीक्षक
मंगळवार, ७ एप्रिल, २०२६
जलदेवता कुवारा भिमालपेन यांचा चैत्र पौर्णिमा जन्मोत्सव आर्वी येथे साजरा करण्यात आला
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
आर्वी दि. ०७ एप्रिल २०२६ रोजी भिमाल पेन मडावी यांचा जन्मोत्सव आर्वी, येथील कुवारा भिवसन बाबा पेन ठाणा आर्वी येथे साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. तिरु. दिनेश भाऊ शेराम, सिनेट सदस्य तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, मा. तिरु. राजूभाऊ मडावी अध्यक्ष नागपूर विभाग ट्रायबल फोरम व मा. तिरु. नीताताई गजाम समाज कल्याण माजी सभापती जिल्हा परिषद वर्धा, मा. तिरु.स्वातीताई गुल्हाणे नगराध्यक्ष नगर परिषद आर्वी. मा. तिरु. गौरव भाऊ जाजू उपाध्यक्ष नगरपरिषद आर्वी, मा. तिरु. शंकर भाऊ जिल्हाध्यक्ष भाजपा आघाडी.मा. तिरु. राहुल भाऊ गोडबोले शहर अध्यक्ष भाजपा आर्वी, मा. तिरु. यादवराव मडावी जिल्हा उपाध्यक्ष भाजपा आघाडी, मा. तिरु. संतोष भाऊ कुंभरे अध्यक्ष कारंजा भाजपा आघाडी, मा. तिरु. भारतजी कंगाले माजी अध्यक्ष कुवारा भिवसन बाबा पेणठाणा आर्वी, मा.तिरू. ज्ञानदेवभाऊ साठे, मा. तिरु. प्रकाशभाऊ गुल्हाने, तिरू. विनोद भाऊ आत्राम तिरू. गजू मडावी, तिरू. मोरेश्वर भलावी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तिरू. संजय कुसराम यांनी केले, संचालन तिरू. प्रतिभा कोवे, तिरू. संगिता धुर्वे यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तिरु. रंजना नरेश उईके कोयापुनेम प्रचारक आर्वी यांनी केले.
या कार्यक्रमाचे आयोजक कुवारा भिवसन बाबा पेन ठाणा आर्वी, अखिल गोंडवाना कोयापुनेम भूमक सेवा संस्था वर्धा, शंभू महादेव आदिवासी बहुउद्देशीय संस्था आर्वी, दाई कली कंकाली महिला बचत गट आर्वी, गोंडवाना महिला बचत गट आर्वी, मोरकी महिला बचत गट आर्वी, जंगोदाई महिला बचत आर्वी, मानकोदाई महिला बचत गट आर्वी, राणी दुर्गावती महिला बचत गट आर्वी, महाराणी हिराई महिला बचत गट आर्वी, महाराणी दुर्गावती महिला बचत गट आर्वी, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन आर्वी, क्रांतिवीर बापूराव शडमाके युवा समिती खुबगाव,बिरसा मुंडा आदिवासी समिती आर्वी, यांनी केले.
गुरुवार, १२ फेब्रुवारी, २०२६
जि.प. उच्च प्राथमिक शाळा पाचोड (ठा) येथे दि.4.2.2026 रोजी शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले.
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 89956647004
पाचोड ठा कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. कार्यक्रमात वर्ग 1 ते 7 च्या बालकलाकारांनी भाग घेऊन आपल्यातील विविध कलागुणांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले केले. अंधश्रद्धा, शिक्षणाचे महत्त्व, बुवाबाजी यावर विद्यार्थ्यांनी आपल्या गीतांच्या व नाटकाच्या माध्यमातून प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शा.व्य.समितीचे अध्यक्ष मा. श्री विनोद राठोड, तसेच उद्घाटक म्हणून प्रा.डॉ प्रवीण काळे होते. प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ नीलिमाताई राठोड, माजी प्राचार्य प्रेमसिंगजी राठोड, ग्रामसेवक श्री उमेश दहिवाडे, पोलीस पाटील श्री चंदूभाऊ पवार होते. माजी प्राचार्य प्रेमसिंगजी राठोड यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले. याप्रसंगी उपसरपंच श्री किशोर राठोड व गावातील माजी विद्यार्थी श्री गेमसिंग राठोड हे देखील कार्यक्रमात उपस्थित होते. याप्रसंगी माजी विद्यार्थ्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे या शाळेतून बदलून गेलेले उच्च श्रेणी मु.अ.श्री बोरवार सर, स.अ. श्री लोखंडे सर व स.अ.कु. उंबरकर मॅडम यांचा देखील शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.पं.स. स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त लेझीम कवायतने उपस्थित सर्वांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक श्री सा.न. पासरे सर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सुशिल चव्हाण (स. अ.) यांनी अतिशय चांगले केले. याप्रसंगी ग्रामपंचायत तर्फे उत्कृष्ट कामगिरीबद्दल शाळेतील सर्व शिक्षकांचे व गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री बुट्टे सर, जुनघरे सर, पोटे सर ,कु. पोकळे मॅडम, उपाध्यक्ष श्री दिलीप राठोड व शा. व्य.समिती सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक श्री चंदूभाऊ जाधव व सुधाकर राठोड यांनी मोलाचे सहकार्य केले. कार्यक्रमाची सांगता रात्री 8 वाजता झाली.
सामाजिक धार्मिक राजकीय रक्त दान या कार्यात उल्लेखनीय योगदान बदल सिद्धार्थ दामोधरे सत्कार करण्यात आला
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो895647004
अमरावती दिनांक ११ रोजी सायंकाळी
सात वाजता रमाई मित्र मंडळ कळमगाव तालुका चांदुर रेल्वे जी.अमरावती तर्फे आयोजित त्यागमूर्ती मातोश्री रमाबाई आंबेडकर जयंती महोत्सव२०२६
बुद्ध भीम गीतांचा कार्यक्रम विकास राजा आणि संच या कार्यक्रमा मध्ये हजारो
उपासक उपासिका यांची उपस्थिती होती या कार्यक्रमा मध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष कॉम्रेड सागर नामदेव दुर्योधन यांनी सामाजिक राजकीय धार्मिक व रक्तदान चळवळी उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल पुष्प गुच्छ देऊन सिद्धार्थ दामोधरे यांच्या सत्कार करण्यात आला यावेळी गावकरी मंडळी मान्यवर मंडळी उपासक उपासिका यांची उपस्थिती होती
सोमवार, २६ जानेवारी, २०२६
सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वी येथे प्रजासत्ताक दिन साजरा
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
आर्वी दिनांक 26 जानेवारी 2026 रोज सोमवारला
सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी येथे
प्रजासत्ताक दिनानिमित्त मान्यवर अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण व राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी माजी सैनिक सहदेवरावजी भगत व प्रा. राजेश सवाई हे प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते.
सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा डॉ प्रवीण काळे, प्रा. डॉ. अनिल भगत, ज्येष्ठ नागरिक रामदासजी नाखले भास्कर खंडारे रेवंत उरकुडे
देवांशू पुणेकर
उषा तायवाडे मॅडम
शशिकला दहाट, सुजाता पायले, ज्योती दिवाकर पाटील
सौरभ मेघराज डोंगरे, सिद्धांत ढाणके, प्रशिक सुरेश जवंजाळ अक्षय गजानन राऊत अनिकेत भस्मे यश दहाट, इत्यादी उपस्थित होते.
राष्ट्रध्वजाला मानवंदना राष्ट्रगीत, संविधान प्रस्ताविका वाचन, राज्य गीत प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी केले.
शुक्रवार, २३ जानेवारी, २०२६
EVM विरोधातले बाळराजे पाटील यांचे आंदोलन पेटले धुळे सोलापूर महामार्गावर टायर जाळून निषेध
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
सोलापूर धर्मवीर छत्रपती संभाजीराजे शौर्य प्रतिष्ठा, महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष-श्री बाळराजे आवारे पाटील यांनी धाराशिव जिल्ह्यात EVM मशीनचा विरोधात दिनांक १६ जानेवारी पासून आमरण उपोषण पुकारले आहे.
आमरण उपोषणकरते बाळराजे आवारे पाटील यांनी शासनाकडे मागणी केलेली आहे. की पूर्णपणे EVM मशीन बंद करण्यात यावी तसेच मतपत्रिकेवर निवडणूक घेण्यात यावी. EVM हटवा लोकशाही वाचवा असा संदेश देखील त्यांनी उपोषण स्थळी दिला आहे. EVM मशीन मुळे देशाची मान खाली जात असल्याचा देखील त्यांनी आरोप केला आहे.
आमरण उपोषणाचे ५ दिवस उलटून गेल्यावर देखील शासनाकडून कुठलीच दखल घेण्यात आली नसल्यामुळे आज
रोजी संतप्त झालेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी धुळे सोलापूर महामार्गावर टायर जाळून निवडणूक आयोगाचा निषेध करण्यात आला.
आपलं गाव आपलं विहार आपली जबाबदारीविनोद भाऊ भालेराव यांच्या विशेष पुढाकाराने व सातत्यपूर्ण प्रयत्नातून आज दिनांक २० जानेवारी २०२६ रोजी धम्म बुद्ध विहार, कठोरा बु येथे बोर बांधण्याचे कार्य यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले.
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
या प्रसंगी उद्घाटनासाठी विनोदभाऊ भालेराव (मा.संचालक कृ.उ.बा.स.अम.,मा.सरपंच ग्रामपंचायत कठोरा बु तथा हल्ली सदस्य) व गावातील नागरिक उपस्थित होते.
वर्धा विहाराच्या संरक्षण, स्वच्छता व संवर्धनाच्या दृष्टीने करण्यात आलेले हे कार्य सामाजिक जबाबदारी व धम्म मूल्यांची जपणूक करणारे असून विनोद भाऊ भालेराव हे समाज हितासाठी करण्यात आलेल्या कार्यास सदैव अग्रेसर असतात
विनोद भाऊ भालेराव यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा.
मुंबईच्या गुरुनानक कॉलेजच्या विद्यार्थ्यांची शिवनेरी किल्ल्याला भेट
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
सायन मुंबई, १९ जानेवारी २०२६: मुंबईतील गुरुनानक कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स (स्वायत्त), सायन येथील राज्यशास्त्र विभाग आणि संविधान क्लबतर्फे SYBA, TYBA राज्यशास्त्र तसेच MA लोक प्रशासनच्या विद्यार्थ्यांसाठी पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील ऐतिहासिक शिवनेरी किल्ल्याचे शैक्षणिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले. या दौऱ्याचे मुख्य उद्दिष्ट विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या अभूतपूर्व प्रशासकीय कौशल्य आणि स्वराज्य स्थापनेच्या तत्त्वांशी परिचित करणे होते. प्राध्यापक सुमीत खरात, राजकारण शास्त्र विभाग प्रमुख यांनी ही संकल्पना मांडली, तर संविधान क्लब समन्वयक प्राध्यापक अनिकेत उबाळे यांनी आयोजनासाठी सर्व मेहनत घेतली. दौऱ्यादरम्यान प्राध्यापक अनिकेत उबाळे यांनी विद्यार्थ्यांनी किल्ल्याची रचना, सामरिक महत्त्व आणि शिवाजी महाराजांनी विकसित केलेली प्रशासकीय व्यवस्था जसे अष्टप्रधान मंडळ, महसूल प्रणाली आणि न्याय व्यवस्था यांची विद्यार्थ्यांना सखोल माहिती दिली.
या दौऱ्याचे प्रमुख उद्दिष्टे:
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रशासकीय मॉडेलचे प्रत्यक्ष अनुभवातून आकलन करणे, जे आधुनिक लोक प्रशासनासाठी प्रासंगिक आहे.
ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन राजकीय इतिहास आणि लोकशाही मूल्यांची समज वाढवणे.
विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक जागरूकता आणि संवैधानिक मूल्यांबाबत जागृती निर्माण करणे.
सैद्धांतिक ज्ञानाला व्यावहारिक दृष्टिकोनाशी जोडून शैक्षणिक उत्कृष्टतेला चालना देणे.
हा दौरा विद्यार्थ्यांसाठी केवळ ज्ञानवर्धकच नव्हता, तर राष्ट्रीय अभिमानाची भावना जागृत करणारा ठरला. कॉलेजच्या प्राचार्या डॉ. पुष्पिंदर कौर भाटिया आणि विभागाने विद्यार्थ्यांच्या उत्साहाचे कौतुक केले आणि भविष्यात असे आणखी कार्यक्रम घेण्याची घोषणा केली.
मंगळवार, २० जानेवारी, २०२६
३२ वा विद्यापीठ नामविस्तार सोहळा साजरा भारतीय दलित पॅंथर चे आयोजन
अर्पित वाहाणेवर्धा
जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
अमरावती( दि. १४ जानेवारी २०२६) डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा तब्बल १७ वर्षाचा संघर्ष १४ जाने. १९९४ रोजी झालेल्या नामविस्ताराने संपुष्टात आला. या लढ्याच्या आठवणीला उजाळा देण्यासाठी बुधवारी भारतीय दलित पॅंथर अमरावती जिल्ह्याच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (इर्विन )चौक येथे या लढ्यात जे लढवे शहीद झाले त्यांना आदरांजली तथा नामांतर चळवळीत सहभागी होऊन आपल्या आयुष्याचे मोलाचे बलिदान केलेल्या नेते आणि कार्यकर्त्यांचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर योद्धा म्हणून सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी विधीतज्ञ डॉ. पी.एस . खडसे, प्रमुख अतिथी खासदार बळवंत वानखडे, पूज्य भन्ते बुद्धप्रिय, पॅंथर नेते प्रभाकर घोडेस्वार,लक्ष्मण मेश्राम, सुधाकर पाटील, दादासाहेब क्षीरसागर, विनोद भालेराव, जयंत गवई, काशिनाथ बनसोड साहेबराव गुडसुंदरे आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व दीप प्रज्वलन करून, नामविस्ताराच्या आंदोलनात ज्यांनी प्राणाची आहुती दिली.त्या अमरावती जिल्ह्यातील दिवंगत झालेल्या पँथर कार्यकर्ते पँथर गंगाधर गाळे,पँथर धनराज सोनोने,पँथर अनिल गोंडाणे,पँथर ध्रुवकुमार बनसोड, पँथर बाळासाहेब मेश्राम,पँथर सतेस्वर मोरे,पँथर कृष्णा गणविर,पँथर ललित कुमार मेश्राम, पँथर रमेश खोब्रागडे,पँथर आनंद धवणे, पँथर सुनिल धवणे, पँथर रमेश वासणिक पँथर पद्माकर गजभिये, पँथर धनराज पांडुरंग डोंगरे, पँथर विजय धांड, पँथर तुळशिराम वानखडे, पँथर मधुकर सेलारे,पँथर अजाबराव घोडेस्वार, पँथर प्रभुदास खांडेकर,पँथर दामोदर गजभिये, पँथर किसनाबाई मेश्राम,पँथर उद्धव खांडेकर,पँथर वासुदेव भोवते, यांना आदरांजली वाहण्यात आली. त्यानंतर या अस्तित्व,अस्मितेच्या लढा सहभागी झाले. त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर योद्धा म्हणून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. ज्यामध्ये मानकरी सर्वश्री राजेंद्र शेंडे , शिवदास गायकवाड , विजय बनसोड , जानराव उगले , रामदास कटकतलावरे , राजु धवणे , पंडितराव मेश्राम, राजु भोयर , शेख नवाब कुरेशी , शाह कय्युम शाह, संजय वाघुळे , दिलीप बनसोड , विजयघरडे , उत्तमराव मेश्राम, रामेश्वर जवंजाळ , संघमित्रा उगले , नानाभाऊ रामटेके , प्रल्हादराव मेश्राम आदीसह दोनशे पन्नास नामांतर योध्यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूज्य भदंत बुद्धप्रिय यांनी केले.सूत्रसंचालन भारतीय दलित पँथर चे सचिव अजय रामटेके तर आभार पँथर चे जिल्हा अध्यक्ष प्रवीण पाटील यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भारतीय दलित पँथरचे पँथर प्रविण पाटील जिल्हा प्रमुख, पँथर लक्ष्मण भाऊ मेश्राम, पँथर मनोज धुळेकर, पँथर नंदु भाऊ खडसे, पँथर पंकज रंगारी, पँथर सचिन मेश्राम, पँथर मंगेश ससाने, पँथर राजपाल इंगळे, पँथर धर्मेंद्र बागळे, पँथर रवि भाऊ शेंडे, पँथर शिवदास गायकवाड, पँथर नागेश पाटील, पँथर प्रशांत रामटेके, पँथर मनोज कांबळे, पँथर आदित्य रंगारी पँथर , पँथर अभय रामटेके अरुण चव्हाण, पँथर अरुण वासनिक, पँथर विजय बनसोड, पँथर शिवसागर पानतावणे, पँथर अंकित मेश्राम, पँथर सुधाकर पाटील, पँथर राजु शेंडे, पँथर सुनिल कापशेकर यांनी परिश्रम केले.
पर्यवेक्षक पदाची मान्यता व नियमित वेतनासाठी सौ. रत्नमाला मेढे यांचे धरणे आंदोलनभीम आर्मी भारत एकता मिशन चा जाहीर पाठिंबा
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
वर्धा सौ. रत्नमाला मेढे यांना पर्यवेक्षक पदाची मान्यता देऊन नियमित वेतन मंजूर करण्यात यावे, या मागणीसाठी त्यांनी दिनांक 8/11/2026 पासून जिल्हा परिषद कार्यालयासमोर विविध पुरोगामी संघटनांच्या सहकार्याने धरणे आंदोलन सुरू केले आहे. सदर प्रश्न गेल्या एक वर्षांहून अधिक काळापासून प्रलंबित असून संबंधित प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही.
या प्रकरणाची माहिती भीम आर्मी (भारत एकता मिशन) संघटनेने घेतली असता, सदर विषय मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या स्तरावर प्रलंबित असल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे, मा. अनुसूचित जाती-जमाती आयोग तसेच शिक्षण उपसंचालक, नागपूर यांनी याबाबत निर्णय देऊन न्याय देण्याचे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही, अद्याप त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.
अनुसूचित जाती-जमाती आयोगाने संबंधित शिक्षणाधिकाऱ्यांना तात्काळ निर्णय घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असताना, प्रशासनाकडून होत असलेला विलंब हा अन्यायकारक असल्याचा आरोप आंदोलक व संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे सौ. रत्नमाला मेढे यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे.
या अन्यायाविरोधात भीम आर्मी (भारत एकता मिशन) ने जाहीर पाठिंबा दर्शवून, संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशाराही दिला आहे. प्रशासनाने वेळकाढूपणा न करता न्याय द्यावा, अशी जोरदार मागणी भीम आर्मी संघटनेच्या माध्यमातून करण्यात आली यावेळी भीम आर्मी जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे(रावण) ,जिल्हा संघटक आशिष सलोडकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख तुषार पाटील, जिल्हा महासचिव अलकेश पाणबुडे, बबलू भाऊ राऊत,शुभम डुबडूबे,अनुराग डोंगरे, रोशन झामरे, सनी खैरे इत्यादी कार्यकते उपस्थित होते.
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हारअर्पण करण्यात येणार रक्त दान ग्रुप अमरावती सिद्धार्थ दामोधरे यांनी केलेरक्त दान
अर्पित वाहाणे
आर्वी महानगर पालिका निवडणुक २०२६
आज दिनांक १४ रोजी सकाळी दहा वाजता रक्तदान करणार आहे
सर्वात प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक अमरावती येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हारअर्पण करण्यात येणार आहे
त्यानंतर जिल्हा रुग्णालय ब्लड बँक अमरावती येथे
आझाद समाज पार्टी अमरावती* जिल्हा पदअधिकारी शहरातील कार्यकर्ते तसेच
आंबेडकरी चळवळीत कार्यकर्त यांनी उपस्थिती राहवे ही विनंती आपला सिद्धार्थ दामोधरे मी माझे २६ रक्त दान
मतदार राज व मायबाप जनता
यांना समर्पण करतो रक्त दान श्रेष्ठ दान
रक्त दान ग्रुप अमरावती सिद्धार्थ दामोधरे
एस सी एस टी आरक्षणात ‘क्रिमी लेअर’चा ब्राह्मणी अजेंडा, आरक्षण मोडीत काढण्याचा न्यायालयीन कट उघड!
अर्पित वाहाणे आर्वी
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
नवी दिल्ली भाजप नेते अश्विनी उपाध्याय याची याचिका आणि त्यावर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकार ह्यांना दिलेली नोटीस हा कायदेशीर प्रश्न किंवा संविधानिक सुधारणेचा प्रयत्न नाही तर हा SC/ST आरक्षण संपवण्याचा उघड डाव आहे.
या कटाचा केंद्रबिंदू आहे न्यायमूर्ती बी.आर. गवई यांचा तो ऐतिहासिकदृष्ट्या घातक निकाल, ज्याने SC/ST आरक्षणात ‘क्रिमी लेअर’चा ब्राह्मणी अजेंडा घुसवला. तेवढ्या साठीच गवई यांना सरन्यायाधीश म्हणून प्रमोट करण्यात आले होते.
प्रश्न आहे की संविधानाला धुडकावून लावण्याचा अधिकार न्यायालयाला कोणी दिला आहे? कारण कलम १५(४) मध्ये आर्थिक निकषांचा एक शब्दही नाही तसेच कलम १६(४) पुरेसे प्रतिनिधित्व म्हणजे सत्ता, पदे, निर्णयक्षम ठिकाणी वाटा दिला जाणे आवश्यक आहे.मग प्रतिनिधित्वाचा प्रश्न बाजूला सारून गरिबीचा बनाव का? ‘क्रिमी लेअर’चा फसवा मुद्दा कसा पुढे आला?
कारण आहे अनुसूचित जाती जमाती मधील विविध समाज सत्तेत आले आहेत, निर्णय घेऊ लागले आहेत.त्यामुळे प्रस्थापित व्यवस्थेची झोप उडाली आहे. त्याकाळीच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सावध केलं होतं की “राजकीय सत्ता ही सर्व समस्यांची गुरुकिल्ली आहे.” आज ती गुरुकिल्ली बहुजनांच्या हातात जाऊ नये म्हणून न्यायालयाचा वापर करून संविधानाचा विपर्यास सुरू आहे.म्हणून ‘क्रिमी लेअर’सारखे हत्यार न्यायालयाने वापरले आहे.
खरे तर न्यायमूर्ती गवई यांचा निकाल बहुजनविरोधी, घटनाविरोधी आणि सवर्ण वर्चस्व टिकवणारा आहे. आरक्षणाचे उपवर्गीकरण निकालात गवईने हे हत्यार सरकार आणि न्यायालयाचे हातात दिले आहे.त्यामुळे आज ‘क्रिमी लेअर’,
उद्या आरक्षणाची टक्केवारी,
परवा आरक्षणच रद्द करण्याचा हा टप्प्याटप्प्याने चाललेला आरक्षण संहार कार्यक्रम आहे.
ह्यावर अनुसूचित जाती जमाती गप्प बसणार नाही. संविधानाची मोडतोड आम्ही कदापी मान्य करणार नाही.आरक्षणावर हात टाकणाऱ्यांना रस्त्यावर उतरून उत्तर दिलं जाईल. कारण आरक्षण भीक नाही, दया नाही. आरक्षण हा आमचा घटनात्मक अधिकार आहे.
स्कस्तरेसेर्व्हशनसावेरेसेर्व्हशनकॉन्स्टिटयूशनअंडरथ्रीटसोसिअलजास्तीचेआंबेडकरितेबाबासाहेबांबेडकररेसेर्व्हशनीसरिघात
कॉन्स्टिटयूशनलरीघट्सक्रीमयलायेरडेबाते
नॉक्रीमयलायेरीन्सकस्टजुडिसिएलोवेरा्रेच
सुपरमेकोर्टींडियारेसेर्व्हशनपॉलिसिय
कास्टसनसूस
गुरुवार, ८ जानेवारी, २०२६
संविधान दिनानिमित्त संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम यशस्वी
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
आर्वी संविधान दिनानिमित्त त्रिशरण बुध्द विहार, भिमसैनिक अशोक कुंभारे परिसर, स्टेशन वार्ड, देऊरवाडा रोड, आर्वी येथे संगीतमय प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला.आदर्श एकता सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य व त्रिशरण बुध्द विहार आर्वी यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम सायंकाळी ४ ते रात्री १० वाजेपर्यंत पार पडला.
कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय दिलीप पखाले (शासकीय विद्युत कत्राटदार) यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी मा. उमेश म्हैसकर तर स्वागताध्यक्षपदी मा. ओमप्रकाश पाटील यांनी आपले महत्वाचे विचार मांडले. दीप प्रज्वलन मा.कमलेश कामडी आणि सुजित भिवगडे (सामाजिक कार्यकर्ते) व उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांनी केले. संविधान प्रास्ताविक वाचन मा. भीमरावजी मनवर आणि मा. प्रविण सातपुते यांनी केले.
कार्यक्रमाला सन्माननीय विशेष निमंत्रित पाहुणे म्हणून उपस्थित होते मा. चंद्रकांत ढोले (पोलीस उपअधीक्षक आर्वी), मा. सतिश डेहनकर (ठाणेदार पोलीस स्टेशन आर्वी), मा. अमित गायकी (उपकार्यकारी अभियंता आर्वी), मा. डॉ. राजपाल भगत (प्रदेशाध्यक्ष स्वराज्य आघाडी महाराष्ट्र राज्य), आणि
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भन्ते धम्मज्योती (वर्धा), मा. ॲड. अरविंद काळे, मा. प्रा. डॉ. अनिल दहाट, मा. प्रा. पंकज वाघमारे, मा. प्रा. डॉ. प्रविण काळे, मा. प्रफुल्ल कांबळे, मा. बाबाराव सोमकुवर, मा. एम. के. चतुर साहेब, मा. प्रा. डॉ. विजयाताई मुळे, मा. मधुभाऊ सोमकुंवर, मा. प्रविण तंबाके, सौ. भारती बनसोड, मा. सचिन पाटील व प्रा.स्नेहल सोनोने यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाचा गौरव वाढवला.
या कार्यक्रमात विशेष सत्कारमुर्ती म्हणून आयुष्यमती उषाबाई हरिदासजी रंगारी (बुद्धमूर्ती दानदात्या) व संजय कळणे यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्या भव्य पुतडा उभारला त्या साठी यांचा सन्मान करण्यात आला. तसेच पार्वताबाई दहाट यांचा सततच्या प्रोत्साहन व धम्मदानाबद्दल गौरव करण्यात आला सुनील कांबळे यांनी संविधान वाटप केले.
कार्यक्रमात निशाताई धोंगडे (फुले शाहू आंबेडकर चळवळीच्या राष्ट्रीय प्रबोधनकार, सुप्रसिद्ध गायिका, सिनेमा अभिनेत्री व नाट्यकलावंत) यांनी भीमगीत आणि संविधान जागराचे सुंदर सादरीकरण केले, ज्याने उपस्थितांच्या मनाला स्पर्श केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श एकता सामाजिक संघटना संस्थापक अध्यक्ष गौतम अशोकराव कुंभारे यांनी केले, तर कार्यक्रमाचे यशस्वी संचालन प्रा. अमर काशिनाथ भोगे (उपाध्यक्ष आदर्श एकता सामाजिक संघटना) यांनी केले. आणि आभार मा. विनोद कांबळे (सचिव आदर्श एकता सामाजिक संघटना) यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक समाज बांधवांनी परिश्रम घेतले, ज्यामध्ये महिंद्र घोडे, आकाश मुन, प्रमोद घोडीले, मंगेश सरोदे, विजय गजभिये, राजू डोंगरे, तेजस डोंगरे,अविनाश थोरात, भूषण इमाने, शुभांगी कुंभारे, सुलोचना कुंभारे, चंदा सरोदे, सीमा गोंडणे,मेघा सरोदे,चंदा डोंगरे, छकुली माहुरे, विजय कुंभारे, विनोद कांबळे, स्वाती थुल, राकेश वरठी, प्रदीप बनसोड, सोमेश्वर भगत, विलास बनसोड,दिनेश सिंगणापुरे,विनोद सरोदे,मंगेश सरोदे, हंसपाल भगत, सुरेंद्र पाखले यांचा सहभाग उल्लेखनीय होता.
हा कार्यक्रम संविधानाचे महत्त्व व सामाजिक एकतेचा संदेश प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मोलाचा ठरला. यावेळी आर्वी तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील लोकसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.
मंगळवार, ६ जानेवारी, २०२६
समता सैनिक दल (SSD) शताब्दी वर्षजय भीम! नमो बुद्धाय
बाबू हरदास एल.एन. यांच्या जयंती व स्मृति
दिनानिमित्त दिनांक 11/1/2026 ते 15/1/2026 पर्यंतच्या वार्षिक प्रशिक्षण शिबिर बाबू .हरदास.एल परिसर ड्रॅगन पॅलेस टेंपल रोड कामठी ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आला
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
आर्वी साथींनो, आमच्यासाठी हे अत्यंत अभिमान आणि आनंदाचे आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेले 'समता सैनिक दल' आपले गौरवशाली १०० वर्षे (शताब्दी वर्ष) पूर्ण करित आहे......
मित्रांनो समता सैनिक दल ही एक स्वाभिमानाचे संघटन, स्वाभिमानाची मदतसमता हे बाबासाहेबांचे ते प्रामाणिक आणि शिस्तबद्ध संघटन आहे, ज्याने कधीही कोणत्याही राजकीय पक्ष किंवा मोठ्या पूंजीपतींकडे हात पसरला नाही. हे संघटन आजही बाबासाहेबांच्या तत्त्वांवर अढळ राहून फक्त आपल्या गरीब जनतेने आणि स्वाभिमानी समाजाने घामाच्या कमाईतून दिलेल्या सहकार्यावर उभे आहे.बाबासाहेबांनी या संघटनेची काळजी घेण्यासाठी आपला रक्त-पास धुडगाळलेला होता. आता वेळ आली आहे की आपण त्यांच्या या वारशाला आणखी मजबूत करू.'Pay Back to Society' पासून 'Show Back Society' पर्यंतबाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला 'Pay Back to Society' (समाजाला परत देणे) हे मंत्र दिले. या साखळीत आपण एक पाऊल पुढे टाकून 'Show Back Society' या तत्त्वावर विश्वास ठेवतो. याचा अर्थ स्पष्ट आहे:दानही देऊ: समाजाप्रती आपली जबाबदारी निभावत आर्थिक सहकार्य करणे.हिशोबही हक्काने मागू: संघटनेची पूर्ण पारदर्शकता ठेवणे जेणेकरून समाजाचे पैसे समाजाच्या उत्थानातच खर्च होतील.आमची आपणास विनम्र विनंती आहे या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तुमच्या योगदानाची अत्यंत गरज आहे. जर आपण स्वतःला बाबासाहेबांचे खरे अनुयायी मानतो, तर या वैचारिक लढाई आणि उत्सवात आपले तन, मन आणि विशेषतः 'धन' (आर्थिक मदत) समर्पित करावे लागेल.तुमचे छोटेसे योगदान या संघटनेच्या पायाभूताला आणखी मजबूत करेल.हे दान नाही, तर समाजाप्रती तुमचे कर्तव्य आणि गुंतवणूक आहे.आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि बाबासाहेबांच्या स्वप्नातील भारतासाठी मन खुला करून मदत करा.चला, या गौरवशाली कार्यक्रमाला यशस्वी करू आणि जगाला दाखवू की समता सैनिक दल आजही बाबासाहेबांच्या विचारांची मशाल ज्वलत ठेवत आहे.आपण ह्या कॅम्पमध्ये येणाऱ्या कॅडेट करिता जेवणाची सोय म्हणून तांदूळ गहू तेल व इतर काही खाद्यपदार्थ कॅम्प परिसरात पाठवून किंवा आर्थिक सहकार्य धम्मदान निलेश मेश्राम ह्या नावाने बारकोडवर सुद्धा पाठवू शकता आपण दिलेल्या धम्मदानाची पोच पावती मोबाईल वरती शेअर करा हीच विनंती खऱ्या अनुयायी व्हा, लढ्यात साथी व्हा शेवटी निळा भडक..जय भीमच मार्शल निलेश मनोहर मेश्राम तालुका संघटक स. सै. द युनिट कामठी जि. नागपूर
मो नंबर:-9823095280
रविवार, ४ जानेवारी, २०२६
तब्बल 15 वर्षांनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या घड्याळा ची आर्वी नगर पालिकेत दमदार एन्ट्री
काल झालेल्या नगराध्यक्षा व
नगरसेवक पदग्रहण सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौं भारती दिलीप पोटफोडे यांचा सत्कार
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
आर्वी नप निवडणुकीत अजितदादा पवार च्या राष्ट्रवादी ने 1 नगराध्यक्ष व 5 प्रभागात 6 उमेदवार उभे करून. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे यांनी अतिशय नियोजन बद्ध व शांत संयमी पद्धतीने खेळी करत -
1 जागा जिंकली - 1 जागेवर 2 रया क्रमांकांची मते मिळवली,
तर सर्वात कमी खर्च करून देखील परिश्रमच्या आणि कार्यकर्त्याच्या जोरावर नगराध्यक्षा यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळवली,
आर्वी : - नुकतीच आर्वी नगर परिषद ची निवडणूक आटोपली आणि काल नगर परिषद आर्वी चे मुख्याधिकारी मा. डॉ श्री.किरणजी सुक्कलवाड यांनी नगराध्यक्षा व नगरसेवक यांचा दिमाखदार पदग्रहण व सत्कार सोहळा निमंत्रित केला होता
या पदग्रहण सोहळ्याला प्रामुख्याने आर्वी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. श्री सुमितजी वानखेडे, आर्वी शहराचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व व माजी नगराध्यक्ष मा. श्री. डॉक्टर वसंतरावजी गुल्हाने, नवनियुक नगराध्यक्षा सौं स्वाती प्रकाश गुल्हाने, भाजपा गटनेते संजय थोरात, विरोधी पक्ष नेता प्रा. पंकज वाघमारे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे नेते आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे, ऍड क्षितिजा वानखेडे, भाजपा शहर अध्यक्ष राहुल गोडबोले, यांची उपस्थिती होती.
आर्वी नगर पालिकेत 15 वर्षा आधी बंद झालेली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घड्याळाची टिक टिक, आता पुन्हा प्रभाग क्रमांक 3 मधून निवडून आलेल्या सौं भारती दिलीप पोटफोडे यांच्या दमदार एंट्री मुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चा आवाज आर्वी नगर पालिकेत धडाडणार, अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे,
पदग्रहण कार्यक्रमात मुख्याधिकारी डॉ किरणजी सुक्कलवाड यांनी नगराध्यक्षा व सर्व 25 नगरसेवक यांना निमंत्रित करून संविधान उद्देशीका देऊन पुष्प गुच्छ व शुभेच्छा देत सत्कार केला यावेळी मोठया संख्येने आर्वीकर नागरिक सर्व पक्षाचे पदाधिकारी व नप अधिकारी कर्मचारी उपस्थित होते
राज्य पोलीस महासंचालक, पदाचा पदभार स्वीकारला
भा.पो.से. अधिकारी सदानंद दाते, यांनी महाराष्ट्र
अर्पित वाहणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
आर्वी महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक
रश्मी शुक्ला यांचा आज कार्यकाळ पूर्ण झाला. त्यांच्या पश्चात १९९० तुकडीचे भा.पो.से. अधिकारी सदानंद दाते, यांनी महाराष्ट्र राज्य पोलीस महासंचालक, पदाचा पदभार स्वीकारला आहे. महाराष्ट्र पोलीस दल त्यांचे नेतृत्व आणि अनुभवाने अधिक सक्षम होईल.
शनिवार, ३ जानेवारी, २०२६
समता सैनिक दल शौर्य दिनाच्या निमित्य समाजासाठी प्रेरणादायी रक्तदान मार्शल अर्पित वाहाणे यांचा मानवतावादी उपक्रम भीमा कोरेगाव येथे
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
भीमा कोरेगाव आजच्या काळात जिथे अनेक जण सामाजिक जबाबदाऱ्यांपासून दूर जात आहेत, तिथे अर्पित वाहाणे यांनी केलेले रक्तदान हे समाजासाठी अत्यंत प्रेरणादायी ठरत आहे. रक्तदानासारख्या पवित्र कार्यातून त्यांनी मानवतेचा खरा संदेश दिला आहे.
रक्ताची गरज ही कोणत्याही क्षणी, कोणत्याही व्यक्तीस भासू शकते. अपघात, गंभीर आजार, शस्त्रक्रिया किंवा आपत्कालीन परिस्थितीत रक्त हे जीवन वाचविण्याचे महत्त्वाचे साधन असते. हे ओळखून अर्पित वाहाणे यांनी स्वतःहून पुढाकार घेत रक्तदान करून सामाजिक भान आणि जबाबदारीचे उत्तम उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.
त्यांचे हे रक्तदान केवळ एक वैयक्तिक कृती नसून, तर समाजातील युवकांना, नागरिकांना आणि सर्वसामान्य जनतेला रक्तदानाबाबत जागरूक करणारा एक सकारात्मक संदेश आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हे त्यांनी कृतीतून सिद्ध केले आहे.
अशा मानवतावादी उपक्रमांमुळे समाजात माणुसकी, संवेदनशीलता आणि परस्पर सहकार्याची भावना अधिक बळकट होते. अर्पित वाहाणे यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्यांच्या या उपक्रमामुळे अनेकांना रक्तदानासाठी प्रेरणा मिळेल, अशी अपेक्षा आहे.
समाजासाठी, मानवतेसाठी आणि जीवनरक्षणासाठी केलेले हे रक्तदान निश्चितच गौरवास्पद आहे.
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
विशेष प्रतिनिधी आवाज जनतेचा न्यूज.25 मोहन साहेबराव जगजेकर यांच्या लाडक्या कन्या दुर्गेश्वरी मोहन जगजेकर हिचा प्रथम व...
-
सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर मो.8888117975 नांदेड -: विधानसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघातून भाजपाच्या श्रीजया चव्हाण यां...
-
अर्पित वाहाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो 8956647004 वर्धा : वर्धा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व “वीर अशोक समाज” या संस्थेचे संस्...
-
वर्धा अर्पित वाहाणे वर्धा – मुस्लिम सोशल फोरम तर्फे ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने भव्य शुभेच्छा मंडप बाजार चौक, वर्धा येथे उभा...
-
अर्पित वाहाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो 8956647004 आर्वी कार्यकारणी गठीत करण्यात आली. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक...
-
प्रतिनिधी प्रताप देवरे मुखेड नांदेड मुखडे - दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी पांडुरंग गोविंदराव उमाटे पाटील यांच्या मालकी ...
-
अर्पित वाहाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो 8956647004 सायन मुंबई, १९ जानेवारी २०२६: मुंबईतील गुरुनानक कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड क...
-
न्युज रिपोर्टर प्रताप देवरे मुखेड नांदेड मुखेड -: दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी बाराहाळी येते सरस्वती देवी शाळेत स्वातंत्र्यदिनी रंगबे...
-
जिल्हाधिकारी यांना दिले भारतीय कम्युनिस्ट पक्षाने निवेदन राजेश येसेकर तालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती : तालुक्यातील रेती घा...
-
अर्पित वाहाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी भीमा कोरेगाव आजच्या काळात जिथे अनेक जण सामाजिक जबाबदाऱ्यांपासून दूर जात आहेत, तिथे अर्पित व...