न्यायासाठी बोलणारा आवाज

शनिवार, १० मे, २०२५

आर्वीभीम महोत्सव चे 2025 अंतर्गत चक्रवर्ती अशोक सम्राट यांच्या जयंती निमित्य 05.04.025 ला छत्रपती शिवाजी महाराज चौक आर्वी येथे अभिवादन समारोह सम्पन्न झाला

अर्पित वाहाणे 
वर्धा जिल्हा प्रतिनिधी 
मो 8956647004

अभिवादन समारोह मध्ये भंते संजू महाथेरो .एड.सुनील डोंगरे, डॉ.प्रा. प्रवीन काले डॉ प्रा  अनिल दहाट अनिल खैरकर प्रा पंकज वाघमारे रूपेश शिंगाड़े गौतम कुंभारे प्रवीन मनवर भूमी डोंगरे यांनी आपले विचार व्यक्त करून सम्राट अशोक यांचे जीवन चरित्रावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे संचालन आयोजक भीम महोत्सव समितिचे महासचिव मेघराज डोंगरे व प्रास्ताविक भीमराव धनगर यानी केले तर आभारप्रदर्शक प्रा.बंडू पाचोडे यांनी केले
कार्यक्रम यशस्वी करन्या करीता समिति चे अध्यक्ष राजाराम डोंगरे ,मनोज माहुरे,गुणवंत   बन्सोड,संदीप सरोदे,सूरज मेहरे,नाना हेरोडे,राजूमामा डोंगरे,मानव वाघमारे,सुमित वाघमारे यानी परिश्रम घेतले.

ब्राह्मण हा क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या सर्वांचा बाप आहे.

आर्वी आजच्या काळात मनुस्मृती कोणी मान्य करत नाही तर मग राजस्थानच्या हायकोर्टासमोर मनू चा पुतळा उभा आहे? 

क्षत्रियांनो ! मला सांगा, दहा वर्षाचा ब्राह्मण तुमच्या शंभर वर्ष वयाच्या बापाचा बाप होऊ शकतो का ?

मनुस्मृति,अध्याय 2 ,श्लोक क्रमांक 135 मध्ये स्पष्ट लिहिलेले आहे की-

"दस वर्ष का ब्राह्मण और सौ वर्ष का क्षत्रिय दोनो को पिता पुत्र समजना चाहिये, दोनों में ब्राह्मण पिता के समान है."

क्षत्रियांनो तुम्हाला वरील श्लोक म्हणणे समजले आहे का? एक राजपूत समाजाचा व्यक्ती मला म्हणाला की आता कोणी मनुस्मृतीला या आधुनिक काळात मानत नाही आणि त्याचे आचरण सुद्धा कोणी करत नाही. 

मी त्याला म्हटले जर आजच्या या आधुनिक काळामध्ये मनुस्मृती कोणी मानत नाही तर मग राजस्थानच्या हायकोर्टासमोर मनूचा पुतळा अद्यापही जसाच्या तसा का उभा आहे ? यावर तो काही बोलला नाही.

तुमच्या खात्रीसाठी मनुस्मृतीची फोटोकॉपी दिलेली आहे खात्री करून घेण्यासाठी फोटोकॉपी क्रमांक 1 पहा. राजस्थानच्या हायकोर्टासमोरील मनुच्या पुतळ्याची फोटोकॉपी खाली दिलेली आहे .खात्री करून घेण्यासाठी फोटोकॉपी प्रमाणे 2 पहा.

आता ब्राह्मण स्वतःला सर्वांचा बाप का समजतो ? याचे उत्तर गीताप्रेस गोरखपुर ने प्रकाशित केलेल्या महाभारता मधील आदीपर्वामध्ये सापडते ते खालील प्रमाणे-

" पूर्वकालमें जमदग्नीनंदन परशुरामने इक्कीस बार पृथ्वी को क्षत्रियरहित करके उत्तम पर्वत महेंद्रपर तपस्या कि थी. उस समय जब भृगुनंदनने इस लोकको छत्रियशून्य कर दिया था, क्षत्रिय-नारीयोंने पुत्रकी अभिलाषासे ब्राह्मणोकी शरण ग्रहण कि थी."

" राजन ! ऊस सहस्त्रों छत्राणीयोंने ब्राह्मणोसे गर्भधारण किया और पून: क्षत्रियकुलकी वृद्धीके लिये अत्यंत बलशाली क्षत्रिय कुमारों तथा कुमारीयोंको जन्म दिया. इस प्रकार तपस्वी ब्राह्मणोद्वारा छत्राणीयोंके गर्भसे धर्मपुर्वक क्षत्रिय संतान की उत्पत्ती और वृद्धी हुई. वे सब संताने दीर्घायु होती ती. तदनंतर जगत मे पुन: ब्राह्मण प्रधान चारो वर्ण प्रतिष्ठित हुए " आता तुम्हाला समजलं असेल ब्राह्मण स्वतःला क्षत्रियाचा बाप का समजतो.

तुमच्या खात्रीसाठी महाभारताची फोटोकॉपी क्रमांक 3 आणि 4 तुमच्या खात्रीसाठी खाली दिलेली आहे.

"गोलवलकर की हम यार हमारी राष्ट्रीयता की परिभाषा"या पुस्तकामध्ये स्वतः गोलवलकर गुरुजी म्हणतात-

"क्रॉस ब्रीडिंग द्वारा बेहतर बनाने के लिए उत्तर के नंबूदरी ब्राह्मण को केरल में बसाया गया और एक नियम बनाया गया की नंबूदरी परिवार का सबसे बडा लडका केरळ की वैश्य, क्षत्रिय या शूद्र लडकी से शादी कर सकता है. एक और हिससे भी अधिक सहासी नियम यह था कि किसी भी जाती की विवाहित महिला की पहिली संतान नंबूदरी ब्राह्मण सेही होनी चाहिये और उसके बाद ही वह अपने पती से संतानोत्पात्ती कर सकती है. आज इस प्रयोग को व्यभीचार कहा जायेगा, पर ऐसा नही है, (ऑर्गनायझर, 2 जनवरी 1961)

इस प्रकार गोलवलकर,  दरअसल, इस आरोप को पुष्ट कर रहे थे की पुराने समय के पुरुष प्रधान उच्च जाती के समाजों में दुसरी जाती की नवविवाहित महिलाओ को अपनी पहिली रातें 'श्रेष्ठ' जाती के पुरुषो के साथ बीताने पर मजबूर किया जाता था."

मी वरील हा हिंदी चा परिच्छेद "गोलवलकर हम या हमारी राष्ट्रीयता की परिभाषा, एक आलोचनात्मक समीक्षा, शमशुल  इस्लाम, यांनी केलेल्या हिंदी अनुवाद, पुस्तकांमधून घेतलेला आहे. पृ.क्र.40 ,41

गीताप्रेस गोरखपुर चे मत्स्यपुराण अध्याय क्रमांक 70 वाचा यामध्ये सुद्धा तुम्हाला हेच सापडेल.

आहे ना ब्राह्मण सर्वांचा बाप !

सनातन बुद्धिस्ट प्रा. गंगाधर नाखले 
08/5/2025,7972722081

महाराष्ट्राच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये 3000 वर्षापूर्वीचे गाव सापडले आहे.

अर्पित वाहणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004

 3000 वर्षांपूर्वीचे उत्खननात सापडले पूर्व  बुद्धकालीन संस्कृतीचे पुरावे मिळाले आहे.

 यवतमाळ जिल्ह्यातील वनी जवळ एक गाव आहे त्या गावाचे नाव कायर तेथे अडीच हजार वर्षांपूर्वी चे उत्खननामध्ये पुरावे सापडलेले आहे अशी ही बातमी सांगते. 

अडीच हजार वर्षांपूर्वी तर बुद्ध होते ना ! मग हे बुद्धकालीन पुरावे आहे. या बातमीमध्ये सातवाहन राजाचे नाव आहे. सातवाहन राजे बुद्धिस्ट होते.

या बातमीमध्ये उत्खननात शिवलिंग सुद्धा सापडले असे म्हटलेले आहे. शिवलिंगाच्या आकाराचा कोणताही दगड सापडला तर हे लोक त्याला शिवलिंग म्हणतात. ते शिवलिंग आहे हे त्या दगडावर लिहिलेले आहे काय ? याचे उत्तर नाही असेच आहे. ते शिवलिंग नसून मनोती स्तूप असायला पाहिजे. हे छोटेस तू शिवलिंगासारखे दिसतात. म्हणून हे याला आज शिवलिंग म्हणतात. बुद्ध काळामध्ये शिवलिंग अस्तित्वात नव्हते स्तूप अस्तित्वात होते. 

उत्खननामध्ये ज्या काही वस्तू सापडतात तेव्हा हे भ्रमवादी त्यामध्ये आपले शब्द घुसवतात आणि त्यावेळेस ब्राह्मणवादाचे अस्तित्व होते हे सांगण्याचा प्रयत्न करतात. 

अडीच हजार वर्षांपूर्वी ब्राह्मणांची अस्तित्व नव्हते हिंदू धर्माचे ही अस्तित्व होते केवळ या देशातील लोक त्यावेळेस सर्व बुद्धिस्ट होते. (दैनिक भास्कर, दिनांक:07/05/2025, महाराष्ट्र पृष. क्र. 3)

सनातनी बुद्धिस्ट प्रा. गंगाधर नाखले
07/05/2025,7972722081

सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी येथे प्रबोधन कार्यक्रम सपन्न झालाअर्पित वाहाणे

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8956647004


*इंजिनियर आकाश हनुमंत चवरे व नेहा आकाश चवरे यांच्या तर्फे* *सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वी व राष्ट्रपिता जोतिबा फुले* *अभ्यासिकेला आर्थिक दान देण्यात आले*
*याप्रसंगी नेहा आकाश चवरे यांचा वाचनालयाच्या वतीने पुष्प शाल व मानवतेचे प्रचारक हा कविता संग्रह देऊन सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला



आर्वी सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी येथे पालि भाषा परिक्षा प्रमाणपत्र वितरण सोहळा व नायझेरिया येथे ज्युनियर इंजिनियर म्हणून कार्यरत असणारे *आयु आकाश हनुमंतराव चवरे* 
*नेहा आकाश चवरे*
*सिंधू हनुमंत चवरे* ( आई )
या परिवाराच्या वतीने
*राष्ट्रपिता जोतिबा फुले अभ्यासिका* आर्वी व *सिध्दार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वीला* आर्थिक 
दान दिले . त्यानिमित्ताने *दिनांक 30 एप्रिल 2025 रोज बुधवारला संध्याकाळी 6.00 वाजता* 
*सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी* येथे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला
प्रमुख अतिथी 
प्रा डॉ प्रविण काळे अध्यक्ष सिद्धार्थ सार्वजनिक आर्वी.
मान. इंजी. अजय बनसोड आर्वी 
मान रहुपाल नाखले सामाजिक कार्यकर्ते 
आयु. सुनंदा संतोष तागडे तळेगांव शा. पं.
सुशीला दहाट 
नेहा आकाश चवरे 
संघमित्रा अजय बनसोड 
ग्रंथपाल सुरेश भिवगडे 
आदी उपस्थित होते.
सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वीला मिळालेल्या दानातून खुर्च्या खरेदी करण्यात आल्या तर राष्ट्रपिता जोतिबा फुले अभ्यासिकेला आर्थिक दान देण्यात आले.
याप्रसंगी नेहा आकाश चवरे यांचा वाचनालयाच्या वतीने पुष्प शाल व मानवतेचे प्रचारक हा कविता संग्रह देऊन सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 
विद्यार्थ्यांना 
विद्युत वितरण कंपनी महाराष्ट्र राज्य अमरावती येथे कार्यरत असणारे अभियंता अजय बनसोड यांनी जीवनात विद्यार्थ्यांना यशस्वी कसे यावर मार्गदर्शन केले. 
तसेच प्रा.डॉ. प्रवीण काळे यांनी सुद्धा जिद्द चिकाटी आणि सातत्यपूर्ण अभ्यास माणसाला यशस्वी करतो असे प्रतिपादन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी केले.
बुद्ध विहार समन्वय समिती नागपूर द्वारा पाली भाषा प्रचार परीक्षा प्रमाणपत्र वितरण करण्यात आले 
यात 
सचिन राजू मनवरे 
सुरज घनश्याम मेहरे 
प्रीती प्रवीण अधव
प्रज्ञा गिरीश नाखले 
इंदिराताई सुखदेवराव निकाळजे 
नम्रता दिगंबर बनकर 
विजयता अरविंद नाखले 
बबीता रोशन तायवाडे 
किरण राजेश पाटील 
रिषी प्रवीण अधव 
सिद्धांत जीवनराव ढाणके 
शुभांगी विनोद बनसोड 
सुहानी प्रमोद चौरपगार
दिपाली बंडू काळे 
चंदाताई अनिल खैरकार 
रोहित श्रीधर मेश्राम 
नीलिमाताई अरविंद काळबांडे. प्रमाणपत्र प्राप्त झाले. 
या कार्यक्रमाला अभ्यासिकेतील विद्यार्थी वर्ग उपस्थित होता

भद्रावती येथे १२ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विशेष मार्गदर्शन वर्गाचे आयोजन

विवेकानंद महाविद्यालयाचा उपक्रम 

राजेश येसेकर : तालुका प्रतिनिधी भद्रावती  7756963512


भद्रावती : बारावीच्या परीक्षांचा नुकताच निकाल लागलेला आहे.अथक प्रयत्न करूनही ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेत अपयश आले आहे. अशा अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी येत्या जुन, जुलै महिन्यात नागपूर बोर्ड पुन्हा परीक्षेचे आयोजन करणार आहे. विद्यार्थी हित व सामाजिक बांधिलकी लक्षात घेत स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात १२वी परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सर्वच विषयांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी निःशुल्क मार्गदर्शनपर शिकवणी वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १५ मे पासून स्थानिक विवेकानंद महाविद्यालयाच्या प्रांगणात होणाऱ्या निःशुल्क  मार्गदर्शनपर  वर्गाचा भद्रावती शहर व परिसरातील १२ वी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा ग्रंथपाल डॉ. सुधीर आस्टुनकर यांनी केले आहे. संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम स्वान, सचिव अमन टेमुर्डे  तथा सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात आयोजित या विशेष मार्गदर्शनपर शिकवणी वर्गात मार्गदर्शन घेऊन यशस्वी होता येईल. अपरिहार्य कारणामुळे यशस्वी होता आले नाही. त्यांनी निराश होऊ नये. पुन्हा नव्याने तयारी करून यशस्वी होण्याची संधी त्यांना लाभणार आहे.  सामाजिक बांधिलकी व विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत महाविद्यालयाने या उपक्रमाचे आयोजन केले. इच्छुक विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील ग्रंथालयात आधी नोंदणी करून घ्यावी व या वर्गांचा निःशुल्क  लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

बुधवार, ७ मे, २०२५

आदर्श एकता सामाजिक संघटना महा.राज्य तर्फे वर्धा लोकसभा खासदार मा.अमर भाऊ काळे यांना बोद्ध गया BT ACT1949 कायदा रद्द करण्या बाबत दिले निवेदन.

अर्पित वाहणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8956647004

आर्वी आज दिनांक 01-05-2025 रोज गुरुवार ला वर्धा लोकसभा क्षेत्र खासदार मा. अमर भाऊ काळे  यांच्या निवस्थानी जाऊन BT act 1949 कायदा रद्द करून महाबोधी बुद्ध विहर बोद्ध गया बिहार चे संपूर्ण वेवस्थापन बोधिस्ट अनुयाई कडे देण्यात यावे करिता  निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्ष्या पासून बिहार मधील महाबोधी बुद्ध विहार हे बोद्ध अनुयाई याच्या ताब्यात देण्यात यावे तथागत भगवान बुद्ध यांना महाबोधी बुद्ध विहार या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले होते. संपूर्ण जगातील बुद्ध अनुयाई या ठिकाणी येतात. या बुद्ध विहाराचे संपूर्ण वेवस्थापन बोद्ध अनुयाई यांच्या कडे देण्यात यावे गेल्या तीन महिन्या पासून हजारो भंतेजी व बुद्ध अनुयाई बोद्ध गया महाबोधी बुद्ध विहार या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे. येत्या बुद्ध पौर्णिमेला बारा लाख पेक्ष्या जास्त बोद्ध अनुयाई महाबोधी बुद्ध विहार बोद्ध गया बिहार या ठिकाणी  पोहचणार आहे. त्या ठिकाणचे आंदोलन हे संपूर्ण देशातच नव्हे तर जगात यांचे परिणाम दिसणार आहे. यांची दक्षता सरकार ने घ्यावे. करिता आपल्या माध्यमातून सरकार कडे मागणी करून महाबोधी बुद्ध विहार बोद्धच्या ताब्यात देण्यात यावे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आले आहे. निवेदन देते वेळीस गौतम अशोकराव कुंभारे, गजानन गायकवाड, मंगेश सरोदे, शोभीत कुंभारे व आदर्श एकता सामाजिक संघटना महा. राज्य कार्यकारणी सदस्य उपस्थित होते

ज्ञानाची लालसा काय असू शकते याचं जीवंत उदाहरण म्हणजे ग्रंथप्रेमी डॉ बाबासाहेब आंबेडकर. खासदार अमरभाऊ काळे

अर्पित वाहणे.
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004

आर्वी सिध्दार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वीचे ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांच्या अभिनव उपक्रमाची सर्व स्तरातून होत आहे चर्चा
दिनांक 14 एप्रिल 2025
स्थळ:- सिद्धार्थ बुद्ध विहार डॉ बाबासाहेब आंबेडकर नगर आर्वी.
ग्रंथ प्रदर्शनीच्या स्थळाला भेटी प्रसंगी व्यक्त केलेले विचार.

पुस्तकासाठी बाबासाहेबांनी मुंबई येथील राजगृह हे घर बांधले होते. यावरून ज्ञानाची लालसा काय असू शकते याचं जीवंत उदाहरण म्हणजे ग्रंथप्रेमी डॉ बाबासाहेब आंबेडकर 
असे प्रतिपादन मान. खासदार अमर भाऊ काळे यांनी व्यक्त केले. 
तर डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवनप्रवास आणि त्यांनी दिलेल्या मूल्यांची जाणीव नव्या पिढीला करून देणे, ही काळाची गरज आहे. विशेषतः विद्यार्थ्यांनी आणि युवकांनी बाबासाहेबांच्या संघर्षमय जीवनाकडे फक्त इतिहास म्हणून न पाहता एक प्रेरणास्रोत म्हणून पाहायला हवे.
असे विचार आमदार दादारावजी केचे यांनी व्यक्त केले.
क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले व विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वीच्या वतीने एक वाचनीय पुस्तक एक पेन एक वही  या अभिनव उपक्रमाचे व ग्रंथ प्रदर्शनीचे आयोजन सिद्धार्थ बुद्ध विहार डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसर आर्वी येथे करण्यात आले होते.
ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांच्या वतीने आयोजित सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाच्या या उपक्रमाची प्रशंसा शहरातील अनेक मान्यवर व्यक्तींनी केली व वाचन संस्कृती च्या विकासासाठी व महापुरुषांचे विचार जनसामान्यात पेरण्यासाठी अशा अभिनव उपक्रमाची आवश्यकता असल्याचे उपस्थित सर्व मान्यवरांनी सांगितले. 
एक पुस्तक वाचनालयासाठी एक पेन एक वही देऊन अनोखे अभिवादन करावे व वाचनालयाचे वाचक सभासद व्हावे असे आव्हान ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी केले होते या आव्हानाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. 
या उपक्रमांतर्गत प्राप्त पुस्तके वाचकांना उपलब्ध करून देण्यात येतील व विद्यार्थ्यांना वही व पेन देण्यात येतील.
ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या यशोदाताई व्यंकटेश आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले.
लेखिका व कवयित्री, शिक्षिका आशाताई चौधरी यांच्या वतीने ग्रंथालयात उपस्थित विद्यार्थ्यांना पेन वही व पुस्तक भेट म्हणून देण्यात आले.
या अभिनव उपक्रमा प्रसंगी 
माननीय खासदार अमर काळे, आमदार सुमित वानखेडे, विधान परिषद सदस्य आमदार दादारावजी केचे, बाळाभाऊ जगताप शैलेशजी अग्रवाल,  दिलीप दादा पोटफोडे, डॉ. राजपाल भगत पत्रकार दशरथजी जाधव, प्रा. मनोज आगरकर, रवी परणकर, राणी गजभिये, प्रा. डॉ अनिल भगत, 
वनिता गजभिये, सिताराम भोजने, डॉ.विजया मुळे, पायल पाटील, पंकज काळबांडे, आकाश चवरे, मनोहर भिवगडे, अवनी गजानन सवाई, राहुल हिरेखन, धम्म प्रचारक अंकुश गडलिंग,  सुधांशू निलेश मून, अजय चिंचोळे, संदीप सरोदे, अरविंद वावरे, मानव वाघमारे, राजारामजी डोंगरे, मनोज माहोरे, विजय घोडवे, दिनेश सवाई, योगेश बोरकर, अभिलाष तागडे, भास्कर सुरवाडे, आनंद वंजारी,  किरण पाटील, करुणा दाभणे, रवी लढे, सहदेव भगत,पद्माताई सवाई, सौरभ डोंगरे, अनुजा बनसोड, सोनाली सचिन कांबळे, अबरार खान, शायर. फारुख जिया, वसीम अहमद, नोमान शेख, 
सुरज मेहरे, सचिन मनवरे, रवी सोनटक्के, सुजित भिवगडे, जयंती समितीचे अध्यक्ष प्रदीप मेंढे, भीमोत्सव समितीचे अध्यक्ष राजारामजी डोंगरे, 
इत्यादी मान्यवरांनी या सहभाग घेतला.