अर्पित वाहणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
8956647004
आर्वी आज दिनांक 01-05-2025 रोज गुरुवार ला वर्धा लोकसभा क्षेत्र खासदार मा. अमर भाऊ काळे यांच्या निवस्थानी जाऊन BT act 1949 कायदा रद्द करून महाबोधी बुद्ध विहर बोद्ध गया बिहार चे संपूर्ण वेवस्थापन बोधिस्ट अनुयाई कडे देण्यात यावे करिता निवेदन देण्यात आले. गेल्या अनेक वर्ष्या पासून बिहार मधील महाबोधी बुद्ध विहार हे बोद्ध अनुयाई याच्या ताब्यात देण्यात यावे तथागत भगवान बुद्ध यांना महाबोधी बुद्ध विहार या ठिकाणी ज्ञान प्राप्त झाले होते. संपूर्ण जगातील बुद्ध अनुयाई या ठिकाणी येतात. या बुद्ध विहाराचे संपूर्ण वेवस्थापन बोद्ध अनुयाई यांच्या कडे देण्यात यावे गेल्या तीन महिन्या पासून हजारो भंतेजी व बुद्ध अनुयाई बोद्ध गया महाबोधी बुद्ध विहार या ठिकाणी उपोषणाला बसलेली आहे. येत्या बुद्ध पौर्णिमेला बारा लाख पेक्ष्या जास्त बोद्ध अनुयाई महाबोधी बुद्ध विहार बोद्ध गया बिहार या ठिकाणी पोहचणार आहे. त्या ठिकाणचे आंदोलन हे संपूर्ण देशातच नव्हे तर जगात यांचे परिणाम दिसणार आहे. यांची दक्षता सरकार ने घ्यावे. करिता आपल्या माध्यमातून सरकार कडे मागणी करून महाबोधी बुद्ध विहार बोद्धच्या ताब्यात देण्यात यावे. अशी मागणी निवेदनातून करण्यात आले आहे. निवेदन देते वेळीस गौतम अशोकराव कुंभारे, गजानन गायकवाड, मंगेश सरोदे, शोभीत कुंभारे व आदर्श एकता सामाजिक संघटना महा. राज्य कार्यकारणी सदस्य उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा