सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर 8888117975
पुणे - सीईओ पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड,श्री विद्याधर पवार IDES. यांनी नवीन पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच हॉस्पिटल ला भेट दिली.डॉ उषा तपासे, निवासी वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका श्रीमती एमिलिया मरियन आणि सहायक अधिपरिचारिका श्रीमती रूथ यांनी सीईओ यांना हॉस्पिटल चे सर्व विभाग आणि त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती दिली. सदर भेटीदरम्यान सीईओ यांनी डायलिसिस, हृदयरोग चिकित्सा विभाग, अति दक्षता विभाग, आपत्कालीन विभाग, एक्स-रे, फिजियोथेरपी, शस्त्रक्रिया कक्ष, दंत चिकित्सा विभाग, प्रसुती कक्ष विभाग आदी विभागांना भेटी दिल्या.
हॉस्पिटल ला गेल्या पाच वर्षांमध्ये चार वेळा रक्षामंत्री उत्कृष्टता पुरस्काराने सन्मानित केल्याचे देखील श्री पवार यांना सांगितले. तसेच हॉस्पिटल मधील बऱ्याच गोष्टी सीएसआर द्वारे स्थापित केल्याचे सांगितले. रुग्णालयात दाखल असलेल्या सर्व रुग्णांना तिन्ही वेळचे जेवण गुरुद्वारा व इस्कॉन यांच्याद्वारे मोफत देण्यात येते. डायलिसिस, अँजिओप्लास्टी, विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया या रुग्णालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व रेशन कार्डधारकांना मोफत पुरविण्यात येतात. येणाऱ्या काळामध्ये सिटीस्कॅन, तसेच कॅन्सर संदर्भातले उपचार पुरवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे श्रीमती उषा तपसे यांनी सांगितले. भेटी दरम्यान सीईओ श्री पवार यांनी हॉस्पिटल ने केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक केले तसेच असेच काम यापुढे चालू ठेवावे अशा सदिच्छा व्यक्त केल्या