उमरी तालुका प्रतिनिधी सुरेश वाघमारे हो.9623976894
नांदेड - उमरी दिनांक 05/08/2025 रोजी उमरी तालुका प्रतिनिधी सुरेश वाघमारे प्राथमिक आरोग्य केंद्र सिंधी येथे डी एच ओ डॉक्टर संगीता देशमुख मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थित उमरी गटविकास अधिकारी व्ही आर आरबडवार साहेब, टी एच ओ आरोग्य अधिकारी एम एम देवराये साहेब, विस्तार अधिकारी राजेश्वर भुरे साहेब ,यांच्या हस्ते स्तनपान सप्ताह कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, कार्यक्रमास स्थानी उमरी तालुक्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची काळजी सर्व कर्मचाऱ्यांनी घेतली पाहिजे, हे या कार्यक्रमाच्या उद्देश आहे, व्ही आर आरबडवार साहेबांनी उमरी तालुक्यातील आरोग्य विभागाचे काम चांगल्या प्रकारे आहे असे त्यांनी सांगितले, हा सप्ताह चांगल्या प्रकारे यशस्वी करावा तालुक्यातील एकही बालक वंचित राहणार नाही त्याची काळजी घ्यावी हा स्तनपान सप्ताह १ ऑगस्ट ते 07 ऑगस्टपर्यंत राहणार आहे, अशा सूचना टी एच ओ देवराये साहेब यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिल्या, हा कार्यक्रम सिंधी येथील उपसरपंच प्रभू पाटील यांच्या उपस्थित संपन्न झाला, तसेच कार्यक्रमासस्थानी उपस्थित एम एम देवराये यांनी कार्यक्रम प्रस्तावित केले, पुढे बोलताना देवराये साहेब म्हणाले की गावातील स्तनदा माता, बालक, गरोदर माता, तसेच बालकाचे पूर्ण लसीकरण गरोदर मातेचे लसीकरण बाबत घ्यावयाची काळजी ह्या बाबीवर सखोल असं मार्गदर्शन केले, तसेच पंचायत समिती विस्तार अधिकारी राजेश्वर भुरे, यांनी या कार्यक्रमात जमलेल्या लाभार्थ्यांना स्तनपान विषयी मार्गदर्शन केले, कार्यक्रमात उपस्थितीत BDO आरबडवार, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोहेल शेख सिंधी, विस्तार अधिकारी राजेश्वर भुरे, ग्रामविकास अधिकारी जय वंनसागरे, समुदाय आरोग्य अधिकारी भरत भूषण गजबे, उमेश मुळे, डॉक्टर मोनिका गजभारे, डॉक्टर कल्पना जाधव, डॉक्टर स्नेहलता पाटील ,आरोग्य सहाय्यक बी एन गाडे सिंधी, अजय गुंटूरवार शिंधी, आरोग्य सहायिका जयश्री गोवंदे शिंधी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा स्वयंसेविका संगीता गायकवाड, कविता चौधरी, लक्ष्मी कवडेकर, आदी पी एस सी सिंधी येथील सर्वच कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आभार बालाजी ढगे यांनी केले आहे...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा