न्यायासाठी बोलणारा आवाज

शुक्रवार, १५ ऑगस्ट, २०२५

सरस्वती देवी प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला

न्युज रिपोर्टर प्रताप देवरे मुखेड नांदेड

मुखेड -: दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी  बाराहाळी येते सरस्वती देवी शाळेत स्वातंत्र्यदिनी  रंगबेरंगी फराळे लावून तिरंग्याच्या रंगात तिरंगा रांगोळी काढून शाळा सजवण्यात आली होती,
 15 ऑगस्ट 1947 ला अंग्रेजीच्या गुलामीतून आपला देश मुक्त झाला असून मातृभूमीच्या रक्षणासाठी आपल्या देशातील अनेक वीर  देश स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले असल्यामुळे ते आठवण  प्रत्येकाच्या मनामध्ये असायला हवी यासाठी स्वातंत्र्य दिन म्हणून 15 ऑगस्ट ला तिरंगा ध्वज मोठ्या आनंदाने फडकला जातो ,
तसेच बाराळीतील सरस्वती देवी शाळेमध्ये यावेळी विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची रुची व सर्वांगीण गुण आणण्यासाठी देशभक्तीच्या गाण्यावर विद्यार्थ्यांचे नृत्य कार्यक्रम घेण्यात आले ,
 ए वतन मेरे वतन ,भारत की बेटी,  देश मेरा, अशा अनेक विविध देशभक्तीच्या गाण्यावर लहान चिमुकल्या  विद्यार्थिनी खूप छान डान्स केला असून खेळातील व भाषणातील प्रथम , द्वितीय, तृतीय, आलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवर मुख्याध्यापक व पालकांच्या हस्ते पारितोषिक व वह्या पेना वाटप करण्यात आले,
यावेळी शाळेचे कोषाध्यक्ष  मनीष अर्जुने सर ,यांच्या हस्ते तिरंगी ध्वज फडकवण्यात आला, व तसेच शाळेचे मुख्याध्यापक ओम पाटील सर यांनी, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधीजी यांच्या फोटोला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले , यावेळी   डीएम इंगोले सर , रेडी सर, रमेश बोरले सर, शिंदे सर, पाटील सर,  दीपक पाटील सर, विद्यार्थी पालक सर्व शिक्षक गावातील महिला पुरुष मोठ्या संख्येने या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित होते,
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा