न्युज रिपोर्टर प्रताप देवरे मुखेड नांदेड
मुखेड - दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी बाराळी येथील नवीन ग्रामपंचायत इमारतीचे व अभ्यासिका केंद्राचे उद्घाटन खासदार रवींद्र चव्हाण, यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले असून पुढे भाऊसाहेब देशपांडे मंगल कार्यालयामध्ये खासदार रवींद्र चव्हाण यांनी बोलताना पुढे म्हणाले की माझे खासदार निधी मधून मी बाराहाळी साठी वीस लक्ष रुपये विकास कामाकरिता देणार आहे बाराहळीचा विकास करण्यासाठी मी निधी कमी पडू देणार नाही .
पुढील स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद, पंचायत समिती, इलेक्शन लवकरच होतील त्यासाठी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते कामाला लागायचा आहे,
राहुल गांधी आपल्या पाठीशी आहेत काँग्रेस पक्ष हा सर्व जाती धर्माला घेऊन चालणारा पक्ष आहे काँग्रेस नेते राजन देशपांडे हे बाराळी व बाराळी परिसरातील जनतेचा विकास करतील त्यांना रस्ते नाल्या अनेक कामे करायचे आहे,
बाराहाळीच्या जनतेने नेहमी त्यांच्या पाठीशी राहावे , मी सुद्धा त्यांच्या पाठीशी आहे तसेच लेंडी धरणातील गेलेल्या शेतकऱ्यांचा पुनर्वसनाचा प्रश्न राहिलेला लवकरच मार्गी लावणार आहे, व तसेच नांदेड बिदर हायवे रस्ते चा काम रखडलेला आहे ते नितीन गडकरी शी बोलून लवकरच रस्त्याचे काम करणार आहे , असेही बोलण्यात आले
यावेळी उपस्थित काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर, माजी आमदार मुखेड श्रावण रेपनवाड, अब्दुल सत्तार, नांदेड माधवराव पाटील उंदरीकर, हनुमंत नारनाळीकर , आकाश वडजे पाटील, गंगाधर पाटील इंगळे घोडके पाटील, सुभाष पाटील, पाळेकर, सुरेश पाटील बेळीकर, विलास पाटील सोशल मीडिया अध्यक्ष, रंजीत पाटील दापके कर, पत्रे ताई राजन देशपांडे अनेक दिग्गज काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते यावेळी मंचावर उपस्थित होते, तसेच
ग्रामपंचायत मधील सरपंच अंजलीताई राजन देशपांडे उपसरपंच वळगे पाटील, ग्रामसेवक जाधव पाटील, सोसायटीचे चेअरमन व्यंकट पाटील उमाटे ,बजरंग उमाटे ग्रामपंचायत सदस्य माधव राजे वाड प्रकाश भंगे शाहीर मारुती वाघमारे पांडू रंग पाटील उमाटे सचिन वाघमारे ,प्रकाश वाघमारे, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी गावकरी व तसेच ग्रामीण भागातील 35 खेडे 52 तांड्यातील महिला, पुरुष, कार्यकर्ते, हजारोच्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा