शनिवार, २२ फेब्रुवारी, २०२५
शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५
गुरुवार, २० फेब्रुवारी, २०२५
१३ वर्षाच्या मुलाची जन्माची नोंद नाही;जिल्हाधिकाऱ्यांसमोर बिलीचापडा येथील आदिवासींचे गाऱ्हाणे
सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर मो.8888117975
आदिवासींची जन्म मृत्यूची नोंद होतच नाही;बिरसा फायटर्सच्या २ वर्षाच्या पाठपुराव्याने जिल्हाधिकारी यांची बिलीचापडाला भेट
नंदूरबार तळोदा:दिनांक १९ फेब्रुवारी २०२५ रोजी बिलीचापडा येथील आदिवासी बांधवांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तळोदा तालुक्यातील अधिकाऱ्यांसोबत नंदूरबार जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी डाॅ.मित्ताली सेठी यांनी
भेट दिली.बिलिचापडा येथील आदिवासी बांधवांच्या मुलभूत समस्यांवर बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून गेल्या २ वर्षापासून सुरू ठेवलेला पाठपुरावा व दिनांक १५ फेब्रुवारी २०२५ रोजी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे जिल्हाधिकारी यांच्यासोबत झालेल्या आदिवासी संघटनांच्या सभेत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी बिलीचापडा येथील प्रलंबित मागण्या रोखठोक मांडल्यानंतर अखेर जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनी बिलीचापडा येथे भेट दिली.
या भेटीत जिल्हाधिकारी मित्ताली सेठी सोबत तळोदा तालुक्याचे तहसीलदार, गटविकास अधिकारी पंचायत समिती तळोदा,वनविभागाचे अधिकारी,बांधकाम विभागाचे अधिकारी,ग्रामसेवक, आशा वर्कर इत्यादी प्रशासकीय अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.त्याचबरोबर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा, बिलीचापडा गाव अध्यक्ष वनसिंग पटले व संपूर्ण बिलीचापडा बिरसा फायटर्स टिम व गांवकरी माता भगिनी मोठ्या संख्येत उपस्थित होते.जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांचा पुष्प गुच्छ देऊन आदिवासी भगिनींनी स्वागत केले.तहसीलदार यांचे स्वागत गाव अध्यक्ष वनसिंग पटले यांनी केले तर गटविकास अधिकाऱ्यांचे स्वागत तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा यांनी केले.त्यानंतर जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनी भारतीय बैठकीनूसार स्वतःच जमीनीवर बसत सर्वांना जमीनीवर बसवत आदिवासी बांधवांशी हितगुज साधत समस्या जाणून घेतल्या.व संबंधित अधिकाऱ्यांना समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले. जन्म मृत्यू व विवाहाची नोंद करा.१३ वर्षाच्या मुलाची जन्म नोंद नाही,गेल्या अनेक वर्षांपासून होत नसलेल्या जन्म मृत्यूची नव्याने नोंद करा.जन्म मृत्यू नोंद न केल्याची तक्रार पुन्हा आल्यास ग्रामसेवक व सरपंच ला अपात्र करण्याची सक्त सूचना दिल्या.बिलीचापडा येथील मंजूर वनदाव्यांचे वनपट्टे प्रमाणपत्र द्या.बिलीचापडा येथे ५० बालकांसाठी अंगणवाडी सुरू करा.बिलीचापडा येथे शाळा सुरू करा.विजेची सोय करा. पाण्याची सोय करा. रहिवाशी दाखला व घरपट्टी द्या.रस्ता डांबरीकरण व खडीकरण करा.इत्यादी मागण्या गांवक-यांकडून करण्यात आल्या.
जिल्ह्य़ात शिवजयंतीची सुट्टी शासकीय असतांना जिल्हाधिकारी मित्ताली सेठी यांनी वेळ काढून बिलीचापडा येथे भेट दिल्याबद्दल जिल्हाधिकारी यांचे गांवक-यांनी आभार मानले.बिरसा फायटर्सच्या २ वर्षाच्या पाठपुराव्याने आज स्वतःच जिल्हाधिकारी आपल्या दारी बिलीचापडा येथेच आल्यावर गांवकरी खुश झाले व आदिवासी संघटनेचे आभार मानले.
भोकर मतदारसंघातील रोजगार मेळाव्यातून अशोक चव्हाणांचा पकड मजबूत करण्याचा प्रयत्न
सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर मो.8888117975
नांदेड -: विधानसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघातून भाजपाच्या श्रीजया चव्हाण यांची दणदणीत विजय मिळवला. गेल्या अनेक वर्षापासून हा मतदारसंघ काँग्रेसचा पंरपरागत मतदारसंघ म्हणून ओळखला जात होता. श्रीजया चव्हाण यांच्या विजयाने चव्हाण कुटुंबातील तिसरी पिढी राजकारणात उतरली आहे. अशोक चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर भोकरमध्ये पहिल्यांदाच कमळ उमलले आहे
अर्थात काँग्रेस सोडल्याचा राग आणि मतदरासंघात असलेले विरोधी वातावरण पाहता अशोक चव्हाण यांनी योग्य काळजी घेत श्रीजया चव्हाण यांना निवडून आणलेच. आता भोकर मतदारसंघात श्रीजया चव्हाण यांचे पाय घट्ट रोवण्यासाठी अशोक चव्हाण यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. पक्ष बदलला तरी भोकरवर असलेले आपले वर्चस्व कदापी कमी होणार नाही याची दक्षता अशोक चव्हाण यांच्याकडून घेतली जात आहे. यासाठीच विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर चव्हाण यांनी बेरोजगारीच्या प्रश्नाला हात घातला...
उमेद अंतर्गत येत्या शनिवारी ता.22 भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्याच्या तयारीत अशोक चव्हाण आणि आमदार श्रीजया चव्हाण या दोघांनी सुरूवातीपासून लक्ष घातले. BJP विधानसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान, श्रीजया चव्हाण यांनी भोकर मतदारसंघ व नांदेड जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न प्राधान्याने सोडण्याचे वचन दिले होते. या वचनाच्या पूर्ततेच्या दिशेने या रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून श्रीजया चव्हाण या पहिले पाऊल टाकत आहेत
22 फेब्रुवारी रोजी अर्धापूर येथे आयोजित भव्य रोजगार मेळाव्यासंदर्भात जिल्ह्यात बैठका, नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात राबवण्यात येत आहे. सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींना मोठ्या संख्येने या मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे. सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे सकाळी 9 वाजता हा रोजगार मेळावा होणार आहे..
या मेळाव्यात महाराष्ट्रासह इतर राज्यांतील सुमारे 120 नामांकित कंपन्या विविध पदांसाठी भरती करणार आहेत. आमदार श्रीजया चव्हाण यांनी निवडणूक प्रचारादरम्यान सुशिक्षित तरुण-तरुणींसाठी विविध उपक्रम राबविण्याचे आश्वासन दिले होते. त्याअंतर्गत या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी अशोक चव्हाण यांच्यासह त्यांचे जिल्ह्यातील सगळे समर्थक कामाला लागले आहेत.
बुधवार, १९ फेब्रुवारी, २०२५
अपघात प्रवणठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवा- बिरसा फायटर्सची मागणी.
अपघात प्रवणठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवा- बिरसा फायटर्सची मागणी
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे मायलेकाचा मृत्यू- सुशिलकुमार पावरा
सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु मो.8888117975
नंदूरबार: शहादा येथील अपघात होणा-या रस्त्याच्या ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवा,या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.या निवेदनावर बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्याध्यक्ष गोपाल भंडारी, राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा उपाध्यक्ष करन सुळे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा यांच्या सह्या आहेत.
दिनांक १७ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास शहादा शहरातील पटेल रेसिडेन्सी ते भाऊ तात्या पेट्रोल पंप या डोंगरगाव रस्त्यावर एका भरधाव वेगात असलेल्या फाॅर्चूनर कारने रस्त्याने चाललेल्या एका माय लेकाला चिरडले आहे.या अपघातात सौ. कल्पना वाघ व आकाश वाघ या माय लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या ठिकाणी गतिरोधक बसविले असते तर हा अपघात टळला असता.या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भरधाव वेगात मोटारसायकल व चार चाकी वाहने ये- जा करतात. सकाळ, संध्याकाळ व रात्री या रस्त्यावर पायी फिरणा-या लोकांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी गतिरोधक बसविणे अत्यावश्यक आहे.
ज्या ठिकाणी लोकांची रस्त्यावर जास्त वर्दळ असते,जिथे अपघात होतात व अपघात होण्याची दाट शक्यता अहे,अशा ठिकाणी तातडीने गतिरोधक बसवावे. पटेल रेसिडेन्सी ते भाऊ तात्या पेट्रोल पंप डोंगरगाव रोड , पूज्य साने गुरूजी विद्या प्रसारक मंडळ कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय शहादा- लोणखेडा काॅलेज रोडवर ( काॅलेज समोरील रस्त्यावर),शहादा खेतिया रोडवरील सुतगिरणी फाटा,अन्य अपघात प्रवण ठिकाणी तात्काळ गतिरोधक बसवा,अशी बिरसा फायटर्स संघटनेकडून मागणी करण्यात आली आहे.
शिवजन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्त निवळी येथील उत्सवात साजरा...!
मुखेड -: तालुक्यातील निवळी शिवजन्मोत्सव साजरा रयतेच्या मनात स्वाभिमान जागृत करणारे, रयतेच्या स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारे लोककल्याणकारी शासनकर्ते अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत, बहुजनप्रतिपालक कुळवाडीभूषण, शस्त्रास्त्रपारंगत, न्यायनीतीधुरंदर, हिंदु धर्मरक्षक, हिंदवी स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा तमाम जनतेस शिवजन्मोत्सव सोहळा साजरा वग्रामपंचायत कार्यालय निवळी येथील शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला आहे उपस्थिती सरपंच शिवसाब आपा मठपती ,उपसरपंच संभाजी पाटील माळेगावे , सोसायटी चेअरमन भास्कर पाटील निवळे, राजू पाटील सुर्यवंशी,सोसायटी सदस्य संदीप पाटील निवळे, सरपंच मनोज आप्पा मठपती श्री गणेश शिक्षण संस्था निवळी चे सचीव गणेश पाटील मादलापूरे सर,सर्व गावकरी मंडळी उपस्थित होते
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
-
विशेष प्रतिनिधी आवाज जनतेचा न्यूज.25 मोहन साहेबराव जगजेकर यांच्या लाडक्या कन्या दुर्गेश्वरी मोहन जगजेकर हिचा प्रथम व...
-
सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर मो.8888117975 नांदेड -: विधानसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघातून भाजपाच्या श्रीजया चव्हाण यां...
-
अर्पित वाहाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो 8956647004 वर्धा : वर्धा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व “वीर अशोक समाज” या संस्थेचे संस्...
-
वर्धा अर्पित वाहाणे वर्धा – मुस्लिम सोशल फोरम तर्फे ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने भव्य शुभेच्छा मंडप बाजार चौक, वर्धा येथे उभा...
-
अर्पित वाहाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो 8956647004 आर्वी कार्यकारणी गठीत करण्यात आली. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक...
-
प्रतिनिधी प्रताप देवरे मुखेड नांदेड मुखडे - दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी पांडुरंग गोविंदराव उमाटे पाटील यांच्या मालकी ...
-
अर्पित वाहाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो 8956647004 सायन मुंबई, १९ जानेवारी २०२६: मुंबईतील गुरुनानक कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड क...
-
न्युज रिपोर्टर प्रताप देवरे मुखेड नांदेड मुखेड -: दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी बाराहाळी येते सरस्वती देवी शाळेत स्वातंत्र्यदिनी रंगबे...
-
जिल्हाधिकारी यांना दिले भारतीय कम्युनिस्ट पक्षाने निवेदन राजेश येसेकर तालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती : तालुक्यातील रेती घा...
-
अर्पित वाहाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी भीमा कोरेगाव आजच्या काळात जिथे अनेक जण सामाजिक जबाबदाऱ्यांपासून दूर जात आहेत, तिथे अर्पित व...