प्रतिनिधी सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर 8888117975
दिनांक १५ फरवरी २०२५ ला नागपूर महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत महाआरोग्य अभीयान राबविण्यात आले.यामध्ये महात्मे आय बॅक ,नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र हुडकेश्वर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ ,ऊदय फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम गणेश मंदिर अष्टविनायक काॅलनी येथे आयोजित करण्यात आला होता.मंचावर डॉ.दिपक सेलोकर वैद्यकीय अधिकारी म.न.पा.नागपूर, डॉ जयश्री चन्ने झोनल वैद्यकीय अधिकारी म.न.पा.नागपुर, डॉ प्राजक्ता दमडू वैद्यकीय अधिकारी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र हुडकेश्वर नागपूर, डॉ संदिप बरगे वैद्यकीय अधिकारी प्रा.आ.कें.नाग.वंदना विनोद बरडे अधीसेवीका ऊप जिल्हा रूग्णालय वरोरा जिल्हा चंद्रपूर व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महीला मंडळ अध्यक्ष,शशीकला चौधरी गणेश मंडळ ट्रस्टी उपस्थित होते.गणेश मुर्तीची पूजा करून आरोग्य अभीयानाला सुरूवात करण्यात आली.मंचा वरील सर्व पाहुण्याचे तुळशीचे रोपटे देऊन स्वागत करण्यात आले.वंदना विनोद बरडे अधीसेवीका व सामाजिक कार्यकर्त्या यांनी आरोग्य अभियानाच्या शूभेच्छा दिल्या आरोग्याविषयी मार्गदर्शन केले व आरोग्य अभियानाचे बाॅनर पोस्टर प्रदर्शनी लावली व सर्वांची माहिती दिली.सर्वांना आरोग्य तपासणी करण्याचें आव्हान केले.पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती नीमीत्य वर्षभर जनजागृतीचे उपक्रम चालणार आहे त्यापैकी हा उपक्रम वंदना विनोद बरडे अधीसेवीका यांनी राबविला.रक्तदान देहदान,अवयव दान करण्याचें आव्हान केले व प्रसार व प्रचार व जनजागृती करण्याचे आवाहन केले.डाॅ.प्राजक्ता दमडू यांनी अभीयानाची माहीती दिली.सूत्रसंचालन पल्लवी पडोळे व आभारप्रदर्शन श्रध्दा दरेकर यांनी केले.कार्यक्रमासाठी अर्चना कोल्हे,ममता नंदा गवंडी, शैलेश ढोकने,शुषमा रंधयी, अपर्णा गजभीये,साक्षी फले राजेश्वर येर्रेवार मेहनत घेतली.कुष्ठरोग विभाग,रूपाली सूरकर टिबी विभाग, अमोल बुरडे ,क्ष किरण विभाग, आयुष्यमान भारत कार्ड काढण्यात आले शुन्य ते १६ वर्षांपर्यंत च्या मुलांचे लशीकरण करण्यात आले.डोळ्यांची तपासणी,रक्त तपासणी,बिपि, तपासणी, औषधोपचार करण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा