न्यायासाठी बोलणारा आवाज

शुक्रवार, १० एप्रिल, २०२६

आपण सर्व सुखरूप आणि आनंदात असाल अशी आशा आहे.

अर्पित वाहाणे 
वर्धा जिल्हा प्रतिनिधी 
मो 8956647004

नागपूर आम्ही आंबेडकर एज्युकेशन मिशन अंतर्गत एक नाईट स्कूल चालवत आहोत, जिथे आम्ही वंचित मुलांना शिक्षण देतो. आमचे वर्ग रामगिरी झोपडपट्टी, सिव्हिल लाईन्स, नागपूर, महाराष्ट्र येथे घेतले जातात.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने आम्ही मुलांसोबत एक छोटेखानी कार्यक्रम आयोजित करत आहोत, ज्यामध्ये शिक्षण, समता आणि त्यांच्या विचारांचा प्रसार केला जाईल.

या कार्यक्रमासाठी आम्ही शैक्षणिक सत्रे, मुलांसाठी अल्पोपहार आणि लहान भेटवस्तू यांची व्यवस्था करत आहोत. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी आम्हाला आर्थिक मदत किंवा पुस्तके, वह्या, पेन इत्यादी साहित्याची आवश्यकता आहे.

आपली मदत, जरी ती लहान असली तरी, या मुलांसाठी एक प्रेरणादायी आणि अर्थपूर्ण अनुभव निर्माण करण्यास मदत करेल. आम्ही निधीच्या वापरात पूर्ण पारदर्शकता राखू.

कृपया या उपक्रमासाठी आम्हाला सहकार्य करा.

आपला वेळ आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
 
समीक्षा गावंडे 
निघत स्कूल 
टीचर अँड कूरदिनाटर 
संपर्क:- 7796251987

आंबेडकर वॉर्ड, बुद्ध विहार येथून भव्य महिला बाईक रॅलीआयोजन आर्वी

अर्पित वाहाणे 
वर्धा जिल्हा प्रतिनिधी 
मो 8956647004

आर्वी प्रज्ञा शिल करुणा ग्रुप आयोजित
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त
भव्य महिला बाईक रॅली
प्रिय बहिणींनो आणि सुविद्य मुलींनो,
*आंबेडकर वॉर्ड, बुद्ध विहार येथून निघणारी*
विशेष महिला बाईक रॅली तुम्हाला सर्वांना हार्दिक आमंत्रण देत आहे!
दिनांक : सोमवार, १३ एप्रिल २०२६
वेळ : *सायंकाळी ठिक ५:०० वाजता*
ठिकाण आंबेडकर वॉर्ड, बुद्ध विहार (सुरुवात)
विशेष आकर्षण :
वेगवेगळ्या आकर्षक वेशभूषा (ड्रेस कोड) मध्ये सहभागी होण्याची संधी

*बाबासाहेबांच्या विचारांचा प्रचार करत एकतेची मिरवणूक*
 बाईक रॅलीत सहभागी व्हा
आपली सौंदर्य, शक्ती आणि एकता दाखवा
 बाबासाहेबांच्या विचारांचा जयघोष करा
सर्व महिला आणि मुलींना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन!
जास्तीत जास्त बहिणी एकत्र येऊन ही रॅली भव्य आणि लक्षात राहील अशी बनवूया!
प्रज्ञा शिल करुणा ग्रुप
"*महिलाशक्ती*, बाबासाहेबांच्या विचारांसह" माहितीसाठी संपर्क साधा आपल्या ग्रुपमधील आयोजकांशी)
जय भीम! जय महिला शक्ती

सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी तर्फे आयोजित

अर्पित वाहाणे 
वर्धा जिल्हा 
Mo 895647004

आर्वी धम्मनायक प्रियदर्शी चक्रवर्ती राजा सम्राट अशोक , क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले, विश्वभूषण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती निमित्त आयोजित
 साहित्य संवाद व प्रबोधन कार्यक्रम व पालीभाषा परीक्षा प्रमाणपत्र वितरण. 

दिनांक शनिवार ११ एप्रिल २०२६

वेळ :- दुपारी १२.३० ते ४.०० 

स्थळ :- सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी 
जिल्हा- वर्धा  

उद्घाटक :- माननीय पुरुषोत्तम डोंगरे (समता साहित्य मंच आर्वी आष्टी कारंजा) 
कार्यक्रमाचे अध्यक्ष :- 
प्रा.प्रवीण कांबळे निळाई सामाजिक सांस्कृतिक परिवार नागपूर

स्वागताध्यक्ष :- 
प्रा. राजेश सवाई 

विशेष अतिथी माननीय शारदा मेश्राम,मून वन विभाग आर्वी. माननीय अर्चना पराते मॅडम. प्रमुख अतिथी 
कवी सुरेश वंजारी, प्रा. डॉ. अनिल भगत प्रा.अजय मेश्राम प्रा. डॉ. प्रवीण काळे प्रा. डॉ.अनिल दहाट मधुकररावजी सोमकुवर, सहदेवरावजी भगत भानूदासजी फुसाटे, रामदासजी नाखले 
गणेशराव पाटील, सामाजिक कार्यकर्ते साजिद पटेल आर्वी. मधुकर सवाळे ( तालुकाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा आर्वी) 


साहित्य संवाद व प्रबोधनविजय आशेचा काव्यसंग्रह कवयित्री आशा विजय चौधरी 
वक्ते :- डॉ. प्रसन्नकुमार बंबलेखक व कवी आर्वी. निनाद काव्यसंग्रह कवी कृष्णा हरले साहुरकर वक्ते :- कवी सुरेश भिवगडेया झोपडीत सुद्धा ' माणूस ' राहतो... गझल संग्रह गझलकार प्रकाश बनसोड आर्वी.वक्ते :- प्रा. डॉ.अरविंद पाटील वर्धा.
वादळातील निखारे ( लेखसंग्रह 
लेखक राजकुमार सोनटक्के आर्वी. 
वक्ते :- आर. एस. तायडे 
 कवी समीक्षक व पत्रकार अमरावती. 

 द मिरर अँड द पोर्ट्रेटस (स्वकथन )
लेखक प्रा. विजयेंद्र निरंजन सुरवाडे 
वक्ते :- प्रा. प्रदीप लोहकरे हिंगणघाट. समीक्षक 

मंगळवार, ७ एप्रिल, २०२६

जलदेवता कुवारा भिमालपेन यांचा चैत्र पौर्णिमा जन्मोत्सव आर्वी येथे साजरा करण्यात आला

अर्पित वाहाणे 
वर्धा जिल्हा प्रतिनिधी 

 आर्वी दि. ०७ एप्रिल २०२६ रोजी भिमाल पेन मडावी यांचा जन्मोत्सव आर्वी, येथील कुवारा भिवसन बाबा पेन ठाणा आर्वी येथे साजरा करण्यात आला, या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित पाहुणे व कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. तिरु. दिनेश भाऊ शेराम, सिनेट सदस्य तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर, मा. तिरु. राजूभाऊ मडावी अध्यक्ष नागपूर विभाग ट्रायबल फोरम व मा. तिरु. नीताताई गजाम समाज कल्याण माजी सभापती जिल्हा परिषद वर्धा, मा. तिरु.स्वातीताई गुल्हाणे नगराध्यक्ष नगर परिषद आर्वी. मा. तिरु. गौरव भाऊ जाजू उपाध्यक्ष नगरपरिषद आर्वी, मा. तिरु. शंकर भाऊ जिल्हाध्यक्ष भाजपा आघाडी.मा. तिरु. राहुल भाऊ गोडबोले शहर अध्यक्ष भाजपा आर्वी, मा. तिरु. यादवराव मडावी जिल्हा उपाध्यक्ष भाजपा आघाडी, मा. तिरु. संतोष भाऊ कुंभरे अध्यक्ष कारंजा भाजपा आघाडी, मा. तिरु. भारतजी कंगाले माजी अध्यक्ष कुवारा भिवसन बाबा पेणठाणा आर्वी, मा.तिरू. ज्ञानदेवभाऊ साठे, मा. तिरु. प्रकाशभाऊ गुल्हाने, तिरू. विनोद भाऊ आत्राम तिरू. गजू मडावी, तिरू. मोरेश्वर भलावी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तिरू. संजय कुसराम यांनी केले, संचालन तिरू. प्रतिभा कोवे, तिरू. संगिता धुर्वे यांनी केले तर या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन तिरु. रंजना नरेश उईके कोयापुनेम प्रचारक आर्वी यांनी केले. 
या कार्यक्रमाचे आयोजक कुवारा भिवसन बाबा पेन ठाणा आर्वी, अखिल गोंडवाना कोयापुनेम भूमक सेवा संस्था वर्धा, शंभू महादेव आदिवासी बहुउद्देशीय संस्था आर्वी, दाई कली कंकाली महिला बचत गट आर्वी, गोंडवाना महिला बचत गट आर्वी, मोरकी महिला बचत गट आर्वी, जंगोदाई महिला बचत आर्वी, मानकोदाई महिला बचत गट आर्वी, राणी दुर्गावती महिला बचत गट आर्वी, महाराणी हिराई महिला बचत गट आर्वी, महाराणी दुर्गावती महिला बचत गट आर्वी, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन आर्वी, क्रांतिवीर बापूराव शडमाके युवा समिती खुबगाव,बिरसा मुंडा आदिवासी समिती आर्वी, यांनी केले.