न्यायासाठी बोलणारा आवाज

शुक्रवार, २ मे, २०२५

आर्वी येथे भव्य धम्म रॅली संपन्न५० बाल श्रामणेरांना दीक्षा, शेकडो उपासक-उपासिकांचा सहभाग

आर्वी, ता. 2 मे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, आर्वी येथील सिद्धार्थ बुद्ध विहारात महा सुदर्शन बहुउद्देशीय संस्था, यवतमाळच्या वतीने दहा दिवसीय श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 27 एप्रिल ते 6 मे 2025 या कालावधीत होणाऱ्या या शिबिरात पूज्य भंते एस. संजीव थेरो व भंते एस. आनंद यांच्या हस्ते ५० बाल श्रामणेरांना पब्बज्जा (दीक्षा) देण्यात आली.

शिबिरात ध्यानसाधना, धम्मप्रवचन, पाली भाषा, व्यसनमुक्ती, धम्म संस्कार यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिबिराच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये धम्मसुसंस्कार रुजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

दिनांक 2 मे रोजी सकाळी 7 वाजता भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅली सिद्धार्थ बुद्ध विहार येथून सुरू होऊन गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आठवडी बाजार मार्गे पुन्हा बुद्ध विहार येथे पोहोचली. या रॅलीत भंतेगणांसह बाल श्रामणेर, उपासक-उपासिका आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रॅलीच्या सुरक्षिततेसाठी ऑल इंडिया समता सैनिक दल, आर्वी यांनी सेवा दिली. धम्मसेवक, उपासक-उपासिका व दानदात्यांच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वीपणे पार पडत आहे.

प्रतिनिधी: अर्पित वाहाणे 
वर्धा जिल्हा संपर्क: 8956647004

फुले "चित्रपट टॅक्स फ्री करून संपूर्ण भारतातील सिनेमा गृहात दाखवावा– आदर्श एकता सामाजिक संघटना महा. राज्य यांनी तहसीलदार आर्वी तर्फे मुख्यमंत्री महा.राज्य यांना दिले निवेदन

अर्पित वाहाणे 
जिल्हा प्रतिनिधी 
मो 8955647004

आर्वी आज दिनांक 02-05-2025 रोज शुक्रवार ला मा.हरीश काळे साहेब तहसीलदार आर्वी यांच्या मार्फत मा.देवेंद्र फडवणीस साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले. महात्मा फुले यांच्या जीवनावर "फुले " चित्रपट प्रदर्शित झाला आहे. परंतु आर्वीतील व देश्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये अद्यापही लावल्या गेला नाही आहे. ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित चित्रपट"छावा " काही राज्यात टॅक्स फ्री करून संपूर्ण देशातील सिनेमागृहात दाखवल्या गेला होता परंतु महात्मा फुले जी यांच्या जीवनावर आधारित चित्रपट "फुले " त्या पद्धतीने प्रत्येक सिनेमागृहात दाखवल्या जात नाही हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे.महाराष्ट्रतील व भारत देशातील नागरिकांना दोन्ही महापुरुषांची कार्य व इतिहास माहिती झाला पाहिजे, पण असे दिसून येते की, महापुरुष वाटून देत आहे की काय, असे न होता सर्वच महापुरुष यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे सशक्त मात्र म्हणून चित्रपट करमुक्त करून त्यांचा इतिहास हा प्रामुख्याने लोकांना माहित झाला पाहिजे. म्हणून छावा चित्रपत काही राज्यात टॅक्स फ्री करून भारतातील नागरिकांनी पाहिला त्याच पद्धतीने फुले चित्रपट टॅक्स फ्री करून संपूर्ण देशवासीयांना पाहता आला पाहिजे. करिता निवेदन सादर केले आहे.निवेदन करते गौतम अशोकराव कुंभारे, गजानन गायकवाड, सुनील खोरगडे, अनिल तायडे, मंगेश सरोदे, तेजस मनोहरे, शोभीत कुंभारे व आदर्श एकता सामाजिक संघटनेचे कार्यकारणी सदस्य उपस्थित होते.

संत झुलेलाल जयंती निमित्त वृक्ष संगोपन उपक्रम संपन्न

अर्पित वाहाणे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
 (मो. 8956647004)

आर्वी, 21 जुलै 2024: संत झुलेलाल जयंतीच्या निमित्ताने आदर्श एकटा सामाजिक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने भव्य वृक्ष संगोपन उपक्रम राबवण्यात आला. ज्या झाडांची लागवड मागील वर्षी 21 जुलै रोजी करण्यात आली होती, त्या 500 झाडांचे सातत्यपूर्ण संगोपन आणि देखभाल करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

संत झुलेलाल यांच्या स्मरणार्थ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रशासनातील अधिकारी, पत्रकार बंधू, सामाजिक कार्यकर्ते, संघटनेचे सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या वेळी गौतम अशोकराव कुंभारे, शोभित कुंभारे, लुक्की गोंडणे, अश्विन टेकाम, पूर्वेश गोंडणे यांच्यासह संघटनेचे कार्यकारिणी सदस्य आणि लहान चिमुकलेही उपस्थित होते. परिसरातील नागरिकांनी मुलांच्या सहभागाचे विशेष कौतुक केले.

संघटनेच्या वतीने झाडांना नियमित पाणी देणे, त्यांचे रक्षण करणे आणि पर्यावरण संतुलन राखण्यासाठी प्रयत्न सुरूच राहतील, असे यावेळी सांगण्यात आले.

गुरुवार, १ मे, २०२५

महाराष्ट्र व कामगार दिनानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

कामगाराची आर्थिक लूट थांबून त्यांना शासनाच्या योजनेचा लाभ देण्यात यावा छोटूभाई 

देशाच्या प्रगतीमध्ये कामगारांची मोठे योगदान

राजेश यैसेकर : प्रतिनिधी वरोरा /भद्रावती 


वरोरा : आज दिनांक १ मे महाराष्ट्र व कामगार दिन निमित्त वरोरा येथील कामगार चौकातील फलकावर पुष्पमाला अर्पित व कामगारांना पुष्पगुच्छ व मिठाई वितरित करून महाराष्ट्र व कामगार दिन साजरा करण्यात आला.
 यावेळी कामगारांना मिठाई व पुष्पगुच्छ देताना
शेख जैरुदीन छोटूभाई माजी सभापती वरोरा तथा प्रदेश उपाध्यक्ष काँग्रेस कामगार कर्मचारी विभाग माजी नगराध्यक्ष गजाननराव मेश्राम ज्येष्ठ नागरिक संघाचे मारोतराव मगरे कांबळे सर दशरथ भाऊ शेंडे यावेळी मोठ्या संख्येने कामगार चौक येथे पुरुष व महिला  कामगार उपस्थित होते 
काही वर्षांपूर्वी चौकाला मान्यता देऊन चौकामध्ये फलक लावून कार्यक्रम करत असल्याने व कामगारांचे अनेक प्रश्नांसाठी नेहमी सहकार्य करत असल्याने कामगारांनी छोटू भाई यांचे आभार व्यक्त केले कामगारांना न्याय मिळण्याकरिता नेहमी सतत लढा देत राहणार केंद्र व राज्य शासनाच्या योजनेचा लाभ कामगारांना मिळण्याकरिता अधिकृत कामगारांची नोंदणी करून देण्याचे काम प्रशासनाने करावा बोगस नोंदणीवर कारवाई करण्यात यावा नियमनुसार कामगारांना वेतन व मानधन व मजुरी देण्यात यावा असे मत छोटूभाई यांनी व्यक्त केले या कार्यक्रमाला
शेषराव भोयर शब्बीर शेख 
अनिकेत ठेंगणे शंकर आत्राम श्री बावणे जी यांनी सहकार्य केले.