न्यायासाठी बोलणारा आवाज

शुक्रवार, २ मे, २०२५

आर्वी येथे भव्य धम्म रॅली संपन्न५० बाल श्रामणेरांना दीक्षा, शेकडो उपासक-उपासिकांचा सहभाग

आर्वी, ता. 2 मे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, आर्वी येथील सिद्धार्थ बुद्ध विहारात महा सुदर्शन बहुउद्देशीय संस्था, यवतमाळच्या वतीने दहा दिवसीय श्रामणेर शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक 27 एप्रिल ते 6 मे 2025 या कालावधीत होणाऱ्या या शिबिरात पूज्य भंते एस. संजीव थेरो व भंते एस. आनंद यांच्या हस्ते ५० बाल श्रामणेरांना पब्बज्जा (दीक्षा) देण्यात आली.

शिबिरात ध्यानसाधना, धम्मप्रवचन, पाली भाषा, व्यसनमुक्ती, धम्म संस्कार यांसारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. शिबिराच्या माध्यमातून तरुण पिढीमध्ये धम्मसुसंस्कार रुजवण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.

दिनांक 2 मे रोजी सकाळी 7 वाजता भव्य धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅली सिद्धार्थ बुद्ध विहार येथून सुरू होऊन गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, आठवडी बाजार मार्गे पुन्हा बुद्ध विहार येथे पोहोचली. या रॅलीत भंतेगणांसह बाल श्रामणेर, उपासक-उपासिका आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

रॅलीच्या सुरक्षिततेसाठी ऑल इंडिया समता सैनिक दल, आर्वी यांनी सेवा दिली. धम्मसेवक, उपासक-उपासिका व दानदात्यांच्या सहकार्यामुळे हे शिबिर यशस्वीपणे पार पडत आहे.

प्रतिनिधी: अर्पित वाहाणे 
वर्धा जिल्हा संपर्क: 8956647004

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा