भद्रावती (प्रतिनिधी) : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा लवकरच सुरू होत आहे. त्या सुरळीत पार पडाव्यात या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवरील सोयी सुविधांचे परीक्षण करण्याकरिता व अभ्यास केंद्र अवलोकनार्थ यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक अंतर्गत येणाऱ्या नागपूर येथील विभागीय केंद्राचे वरिष्ठ संचालक डॉ. धनंजय वेळूकर यांनी स्थानिक विवेकानंद महाविद्यालयातील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यास केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांनी विवेकानंद महाविद्यालयातील (4227A) अभ्यास केंद्रावरील सर्व सोयीसुविधांची पाहणी केली. निरीक्षण करून उपलब्ध सोयीसुविधांबाबत समाधान व्यक्त केले. विशेषतः महाविद्यालयातील स्वच्छता व अभ्यास केंद्राचे कामकाज बघून शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी अभ्यास केंद्रावरील कर्मचाऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. या भेटीदरम्यान त्यांच्या सोबत नागपूर विद्यापीठाचे मॅनेजमेंट कौन्सेलर डॉ.पांडुरंग डांगे उपस्थित होते. यावेळी विवेकानंद महाविद्यालयाचे प्राचार्य तथा केंद्रप्रमुख डॉ. नामदेव उमाटे, उपप्राचार्य तथा ग्रंथपाल डॉ. सुधीर आस्टुनकर, केंद्र संयोजक डॉ यशवंत घुमे, सहसंयोजक आशिष दुपारे, या अभ्यास केंद्राच्या माजी केंद्र संयोजक प्रा. संगीता बांबोडे व सेवक संजय तामगाडगे यांची उपस्थिती होती.
रविवार, ४ मे, २०२५
मुक्त विद्यापीठाचे विभागीय संचालक डॉ. धनंजय वेळूकर यांची भद्रावती अभ्यास केंद्रास भेट
राजेश येसेकर : तालुका प्रतिनिधी भद्रावती. 7756963512
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
-
विशेष प्रतिनिधी आवाज जनतेचा न्यूज.25 मोहन साहेबराव जगजेकर यांच्या लाडक्या कन्या दुर्गेश्वरी मोहन जगजेकर हिचा प्रथम व...
-
सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर मो.8888117975 नांदेड -: विधानसभा निवडणुकीत भोकर मतदारसंघातून भाजपाच्या श्रीजया चव्हाण यां...
-
अर्पित वाहाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो 8956647004 वर्धा : वर्धा शहरातील सामाजिक कार्यकर्ते व “वीर अशोक समाज” या संस्थेचे संस्...
-
वर्धा अर्पित वाहाणे वर्धा – मुस्लिम सोशल फोरम तर्फे ईद ए मिलादुन्नबीच्या निमित्ताने भव्य शुभेच्छा मंडप बाजार चौक, वर्धा येथे उभा...
-
अर्पित वाहाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो 8956647004 आर्वी कार्यकारणी गठीत करण्यात आली. बहुजन समाज पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक...
-
प्रतिनिधी प्रताप देवरे मुखेड नांदेड मुखडे - दिनांक 13 ऑगस्ट 2025 रोजी पांडुरंग गोविंदराव उमाटे पाटील यांच्या मालकी ...
-
अर्पित वाहाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो 8956647004 सायन मुंबई, १९ जानेवारी २०२६: मुंबईतील गुरुनानक कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड क...
-
न्युज रिपोर्टर प्रताप देवरे मुखेड नांदेड मुखेड -: दिनांक 15 ऑगस्ट 2025 रोजी बाराहाळी येते सरस्वती देवी शाळेत स्वातंत्र्यदिनी रंगबे...
-
जिल्हाधिकारी यांना दिले भारतीय कम्युनिस्ट पक्षाने निवेदन राजेश येसेकर तालुका प्रतिनिधी भद्रावती भद्रावती : तालुक्यातील रेती घा...
-
अर्पित वाहाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी भीमा कोरेगाव आजच्या काळात जिथे अनेक जण सामाजिक जबाबदाऱ्यांपासून दूर जात आहेत, तिथे अर्पित व...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा