न्यायासाठी बोलणारा आवाज

सोमवार, २६ जानेवारी, २०२६

सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय आर्वी येथे प्रजासत्ताक दिन साजरा

अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004

आर्वी दिनांक 26 जानेवारी 2026 रोज सोमवारला 
सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालय कन्नमवार नगर आर्वी येथे 
प्रजासत्ताक दिनानिमित्त मान्यवर अतिथींच्या हस्ते ध्वजारोहण व राष्ट्रीय ध्वजाला मानवंदना देण्यात आली.
याप्रसंगी माजी सैनिक सहदेवरावजी भगत व प्रा. राजेश सवाई हे प्रमुख अतिथी म्हणून यावेळी उपस्थित होते.
सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष प्रा डॉ प्रवीण काळे, प्रा. डॉ. अनिल भगत, ज्येष्ठ नागरिक रामदासजी नाखले भास्कर खंडारे रेवंत उरकुडे 
देवांशू पुणेकर 
उषा तायवाडे मॅडम 
शशिकला दहाट, सुजाता पायले, ज्योती दिवाकर पाटील 
सौरभ मेघराज डोंगरे, सिद्धांत ढाणके, प्रशिक सुरेश जवंजाळ अक्षय गजानन राऊत अनिकेत भस्मे यश दहाट, इत्यादी उपस्थित होते. 
राष्ट्रध्वजाला मानवंदना राष्ट्रगीत, संविधान प्रस्ताविका वाचन, राज्य गीत प्रजासत्ताक दिनानिमित्ताने पार पडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार ग्रंथपाल सुरेश भिवगडे यांनी केले.