आर्वी येथील सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल व धम्म प्रचारक लेखक व कवी सुरेश भिवगडे
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
आर्वी मानवतेचे प्रचारक या बहुचर्चित कविता संग्रहाचे कवी सुरेश भिवगडे यांना त्यांच्या आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्य व योगदानाबद्दल समाजरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.
यासाठी सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
दिनांक 30 मार्च 2025 रोजी पारेगाव तालुका जिल्हा जालना येथे भीमगर्जना मित्र मंडळ पारेगाव येथील भंते कश्यप ली
यांच्यावतीने समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे.
सुरेश भिवगडे हे सातत्याने बुद्ध धम्म प्रचाराचे कार्य करत असतात.
तसेच साहित्यिक चळवळ व ग्रंथालयीन चळवळीत त्यांचे महत्त्वपूर्ण सहभाग असतो.
मानवतेचे प्रचारक हा बहुचर्चित कविता संग्रह प्रकाशित झाला असून
येणाऱ्या काळात आदिवासी नायक व्यंकटेश आत्राम जीवनचरित्र व आर्वी तालुक्यातील आंबेडकरी चळवळ सामाजिक कार्यकर्त्यांची योगदान व साहित्यिकांचे साहित्य हा शोध प्रबंध,
तसेच आदिवासी कवींच्या कवितांचे संपादन ते करत आहेत.
अंत:करणातील मनीषा हे पुस्तक प्रकाशनाच्या वाटेवर आहे.
सामाजिक कार्य व धम्मकार्य तसेच उत्कृष्ट प्रवचनकार म्हणून ते सुपरीत आहेत.
त्यांचे या कार्याची दखल घेऊन त्यांना समाज रत्न हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे.
सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.