न्यायासाठी बोलणारा आवाज

गुरुवार, २७ मार्च, २०२५

आर.के.हायस्कुलनवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले अर्पित वाहाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो 8956647004

आर.के.हायस्कुलनवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेत चार विद्यार्थी उत्तीर्ण झाले 

अर्पित वाहाणे 
वर्धा जिल्हा प्रतिनिधी 
मो 8956647004
पुलगाव  नवोदय विद्यालय वर्ग 6वी प्रवेश परीक्षा दि. 19 जानेवारी ला घेण्यात आली. शहरी तथा ग्रामीण होतकरू, हुशार, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक नवोदय विद्यालय आहे, या विद्यालयात प्रवेश मिळावा यासाठी पालक व विद्यार्थी धडपडत असतात. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर झाला त्यात पुलगाव च्या विहान भस्मे आर.के.हायस्कुल. राजलक्ष्मी शिरभाते, आल्हाद मेश्राम, अभिनव जगताप, प्रशंस मते(आर्मी प्रायमरी,स्कूल, कैंप, पुलगाव. या विद्यार्थ्यांनी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण होऊन नवोदय विद्यालय सेलु कांटे, येथे प्रवेश मिळवला, या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शक शिक्षक मा.फुसाटे सर व आई- वडिलांना दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा