ही लढाई शेतकऱ्यांची आमच्या सर्वाच्या हक्काची सम्राटअशोक सेनेचा तीव्र अंदोलनाच्या इशारा
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
आजचा शेतकरी कर्ज बाजारी ना पिकी,ओला दुष्काळ पिकाला भाव नाही मुलांच्या लग्नाची जबाबदारी कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी,दवाखान्याची जबाबदारी हीया शेतकऱ्यांनी जगावं कसं
*मुख्यमंत्री साहेब आपण दिलेलं आश्वासन पूर्ण करा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा
अकोला मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस आपण सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु आज पर्यंत शेतक-यांचा सात बारा कोरा केला नाही तरी आपला शब्द आज पर्यंत पाळलेला नाही तरी त्यांनी शेतक-यांचा सात बारा कोरा करावा व शेतकरी कर्ज मुक्त करावा करिता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दि. 14/11/2024 रोजी यांनी जाहीरसभे मध्ये असे आश्वासन दिले की आमचे सरकार आले तर आम्ही शेतक-यांचा 7/12 कोरा करून व शेतकरी कर्ज मुक्त करू असे आश्वासन दिले होते.परंतु फडणवीस चा सरकार आहे तरीही आज पर्यंत शेतक-यांचा सात बारा कोरा झाला नाही व शेतक-यांची कर्ज मुक्ती सुध्दा झाली नाही.विदर्भातील शेतक-यांना शारिरीक व मानसिक त्रास देत आहेत बँकेच्या त्रासामुळे पश्चिम विदर्भामध्ये 80 शेतक-यांची आत्महत्या आज रोजी पर्यंत झालेली आहे.तरी वरील मुख्यमंत्री यांनी शेतक-यांकडे त्यांचे सरकार आल्यानंतर लक्ष दिले नाही.तरी दिवसेंदिवस शेतक-यांची वाढती आत्महत्या रोखण्यासाठी त्वरित मुख्यमंत्रीनी शेतक-यांचा 7/12 कोरा करावा व शेतकरी कर्ज मुक्त करावे आणि शेतक-यांच्या पिकाला योग्य भाव द्यावे असे या माध्यमातून आम्ही मागणी करतो.
*सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य*
आकाश दादा शिरसाट
बळीराजा तू जीव नको फाशी
जग राहील तुझ्या बिना उपाशी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा