वर्धा: लोकसेवा काँग्रेस पक्षाच्या वर्धा जिल्हा उपाध्यक्षपदी अर्पित उत्तम वाहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. नरेंद्र यांनी ही निवड जाहीर केली. अर्पित वाहाणे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असून, त्यांची जनसेवेची तळमळ आणि पक्षनिष्ठा पाहता त्यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पक्षाच्या विकासासाठी नवीन जबाबदारी
लोकसेवा काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरावरील संघटनेस अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने ही निवड महत्त्वाची मानली जात आहे. अर्पित वाहाणे यांनी यापूर्वीही विविध सामाजिक उपक्रम आणि जनहिताच्या चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची ध्येयधोरणे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील, असा विश्वास पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
अभिनंदनाचा वर्षाव
अर्पित वाहाणे यांच्या निवडीची माहिती मिळताच पक्षाच्या जेष्ठ पदाधिकाऱ्यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला आहे. पक्षातील कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास व्यक्त केला असून, वर्धा जिल्ह्यात लोकसेवा काँग्रेसचा अधिक विस्तार करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरेल, असे मत व्यक्त करण्यात येत आहे.
अर्पित वाहाणे म्हणाले...
निवडीनंतर प्रतिक्रिया देताना अर्पित वाहाणे म्हणाले, "माझ्यावर टाकलेली जबाबदारी मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडेल. लोकसेवा काँग्रेसच्या विचारधारेनुसार कार्य करत, जिल्ह्यातील प्रत्येक घटकांपर्यंत पक्षाची ध्येयधोरणे पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे."
पक्षातील जेष्ठांचा पाठिंबा
या निवडीमुळे वर्धा जिल्ह्यात पक्षाच्या कार्यात अधिक ऊर्जा निर्माण होईल, असा विश्वास वरिष्ठ नेतृत्वाने व्यक्त केला आहे. पक्षाच्या धोरणांना चालना देण्यासाठी अर्पित वाहाणे यांच्या अनुभवाचा मोठा फायदा होणार आहे.
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. 8956647004
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा