.मा. खासदार साहेब तुमच्या जनसेवेच्या या कार्याला सलाम
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
आर्वी काल दिनांक 24/03/2025 रोजी मी आणि बोरगाव चे बोरगाव चे घरकूल लाभार्थी त्यांचे घरकुल अडचणी संदर्भात वर्धेला जात असताना, घरून आम्ही उशिरा निघाल्याने आर्वी येथे खासदार साहेबांच्या निवास्थानी त्यांची भेट झाली नाही, ते हिंगणघाट कार्यक्रमाला गेले असे कळले....... पण त्यांना आम्ही आर्वी ला त्यांच्या निवास्थानी आलेलो आहे आणि घरकुलचा अत्यंत महत्वाचा विषय असल्याने त्यांनी आम्हला संपर्क करून वर्धेला पोहचा मी हिंगणघाट कार्यक्रम करून परत येतांना तुम्हाला तिथे भेटतो म्हणून सांगितले.... त्या प्रमाणे आमची वर्धेला बाहेरील आर्वी रोडवरील बायपास वर मा. खासदार साहेबांची भेट झाली... त्यांनी प्रकरण नीट समजून घेतले आणि प्रकल्प संचलकांना प्रकरण समजावून आम्हाला जाण्यास सांगितलं.... त्यानंतर आम्ही प्र. सं. जी. ग्रा. वी. यंत्रणा वर्धा यांना परस्पर भेटून विषय त्यांना ही त्यातले ग्रंभीर्य सांगितल......आणि त्यांनी सदर विषय सोडावू असे आश्वासन ही दिले......
पण एवढ्या व्यस्थ कार्यक्रमात आज नागपूर येथून दिल्लीला जाण्या करिता वेळ कमी असतांना घरी भेट न झाल्याने वर्धेला भर रस्त्यात आमची भेट घेऊन विषय समजून घेऊन संबंधिताना विषय समजून सांगून विषय निकाली काढण्याचे आदेश रस्त्यावरच देणारा हा मी पहिला खासदार पहिला..... मा. खासदार साहेब सलाम तुमच्या या जनसेवेला
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा