चक्रवर्ती सम्राट अशोकांची जयंती ५ एप्रिललाआहे. कित्येक बुद्ध गया स येऊन बुद्ध अनुयायी ही जयंती गया येथे साजरी करतात
अर्पित वाहाणे
वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो 8956647004
बुद्ध गया करीत आहेत. मग डॉ. बाबासाहेब बुद्ध गया येथेआंबेडकर जयंती १४ एप्रिल बुद्ध गया येथे साजरी करण्यास काय हरकत आहे? पण नाही कारण माहित आहे.घरात पाहिजे,आम्हाला नाचायचे आहे, डी जे वर …..
कुणाची घरात सोय नाही. सर्व उपाशी रहातील, आठ दिवस हा प्रश्न महिलांचा, कुणाचे कुत्रे मांजरे घरात आहेत त्यांची सोय नाही. अहो मरू द्या ना...! बाबासाहेबांची चार अपत्य गेली,तब्बेतीकडे वारंवार दुर्लक्ष करी रमाई,माझ्या १०० कोटी लेकरांना शहाणं करण्यासाठी,दरिद्रीच्या खाईतून बाहेर काढण्यासाठी, साहेब शिक्षण घेत आहेत. त्यांच्या शिक्षणांत व्यत्यय येता कामा नये. गवत गोवर्या विकून बॅरिस्टरची पत्नी मुले व कुटुंब सांभाळत होती. व साहेबांना ही पैसे पाठवत होती.कारण त्यांच शिक्षणात दुर्लक्ष होऊ नये,हे फक्त पुस्तकात वाचण्यासाठी व भाषणे करण्यासाठीच का? त्या माऊलीचा त्याग आठवा ना जरा…* सम्राट असून त्याने आपली दोन मुले संघ मित्रा व महेंद्र यांना बौद्ध धम्माच्या प्रचार व प्रसारार्थ भारताबाहेर पाठवले,स्वतः हा. ८४००० स्तुप बांधले.यातील एक सांची चा स्तुप,भिख्खूंस राजाश्रय दिला व स्वतः बौद्ध धम्म स्विकारला म्हणून पुर्णपणे लयास गेलेला बौद्ध धम्म उर्जितावस्थेत आला. *ही प्रियदर्शीनस. अशोकाने दिलेली धरोहर सांभाळायचे कुणी?* हातातून गेल्यावर आपले डोळे उघडतील का? आज बौद्ध विहारांचे मंदिरीकरण करणं म्हणजे उद्या सांचीचा अशोक स्तंभ व स्तुप ही आमचाच म्हणतील...! तेंव्हा काय कराल? … काही नाही आम्ही बसू ना जयंती साजरी करीत… वा रे बुद्धिष्टानो?
जिथे भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली … सम्यक संबोधी प्राप्त झाली,अशा ठिकाणी दहावा तेराव्याच्या पुजा केल्या जात आहेत.मुक्ती मिळण्यासाठी,स्वर्ग मिळण्यासाठी … जे धम्मात बुद्धांनी सर्व नाकारले आहे. व पंचशिल दिले आहे. त्यातील खोटे बोलणार नाही. हे शिल आज खुप महत्वाचं आहे. धम्मम्हणजे अनुसरणं नुसती पोपटपंची नाही हे लक्षात घ्या....? ही मुल्यवान धरोहरीची वाताहत आम्ही, आज गेली पंचाहत्तर वर्ष उघड्या डोळ्याने पहात आहोत. कुठेतरी आम्ही षंढासारखे वागत आहोत असे नाही का वाटत...? उतर काय तर आम्ही भगवान बुद्धांच्या शांतीचा मार्गाने चालत आहोत. होय ना ? उद्या भावकीतला बांधवाने आपली एक एकर जमीन नांगरली तर आपण गप्प बसू का ?
हे लिहीण्याचा उद्देश कित्येक जणांना मी मेसेज टाकले,चला बुद्धगया चला बुद्धगया.... पण काही ना काही कारण …. रात्रभर झोपलागली नाही. पहाटे सर्व मेसेज चेक केले.कुणी तर म्हणतात गावी चाललो,अरे हे कारण आहे का...? का प्रत्येकाची तारीख आहे? हां तब्येतीचे कारण एक ठीक आहे . समजू शकतो काहींची दुखणी तर न सांगता येतील अशी ओठात एक व पोटात एक ….! जे येत आहेत त्यांचे मनोमन धन्यवाद ! कारण आता नाही तर कधीच नाही … *अहो सोडा आपले घरदार, अडचणी काही दिवस एकदा यांन* *आठवा एकदा ती रमाई, बाबासाहेब, सिद्धार्थ गौतम बुद्ध , सम्राट
अशोक*
यांनी जतन केलेली,गमवून ठेवलेली आपली विरासत लुटून नेण्याच्या मार्गावर आहे,नव्हे नेली आहे म्हणा ना … आज ३५-३६ दिवस झाले तिकडून पाय बाहेर काढत नाहीत ते भट का? तर सर्व राजकारणी दलालांचा त्यांना सपोर्ट आहे. याला सुनामी सारखा जनरेटा हा एकच मार्ग यावर आहे.याचा अर्थ समजतो का...? त्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी रुढी परंपरा,असमानता अस्पृश्यता यांना झुगारून १४ आक्टोबर १९५६ हा सुवर्णदिन पूर्ण गावावरून ओवाळून टाकलेला,
‘ आपण ‘ दलितांचना धम्मदिक्षा दिली. आता पुन्हा बाबासाहेब होणे नाही. *शंभर वर्ष शेळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ बनून जगा* म्हणून बाबासाहेब जागतीक इतिहासांत अमर आहेत. आपण त्यांच्या चरणाची धुळ आहोत फक्त...! किमान जीवाचे रान करून ही आपली संपत्ती … बुद्धगया विहार / बुद्ध मठ या नावाने तिथे प्रचलित आहे. तो वाचवू ही मनाशी खुणगाठ बांधूया ! ….
आज जगातील विविध देश मदतीचा हात देत आहेत पर्ंतू आपण दाराची कडी लावून बसलो आहोत,अशी अवस्था आहे. भले भले रति महारथी , राजकारणी झाले हा मुद्दा कुणीही उचलला नाही. एक परदेशी पाहुणा भगवान बुद्धाच्या पवित्र भूमीवर येतो व पहातो तर काय तिथे पिंडदान सुरू आहे. हे सर्व आमच्या धम्मात नाही , काय चाल्लेय हा प्रश्न त्यांना पडला व हे आंदोलन त्यांनी उभे केले ही वस्तुस्थिती आहे. आपण हे मोठ्या प्रमाणात पुढे नेले तरच बुद्धगया विहारातील देव देवता बाहेर जावून ते स्वच्छ व क्लीन होईल.
रंजना कांबळे ( समाज सेविका ) विमाननगर जि.पुणे
भ्रमणध्वनी-९०२८५२७५६०/
संकलन-कुणाल भोईर-
सफाळे जि.पालघर_
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा