न्यायासाठी बोलणारा आवाज

बुधवार, २० ऑगस्ट, २०२५

समाज भूषण पुरस्कार प्राप्त तथा विशेष कार्यकारी अधिकारी वर्धा याच्या हस्ते कु संबोधी शंकर गोडघाटे सत्कार

वर्धा अर्पित वाहाणे

वर्धा - कु संबोधी शंकर गोडघाटे मु शिवनगर वर्धा या विद्यार्थिनीचा आय आय आय टी कॉलेज कर्नाटक धारवड येथेJEE मधून BTec करिता नंबर लागलेला आहे. प्रवेशाची अंतिम तारीख 23 ऑगस्ट ही आहे. तिची घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्यामुळे तिला प्रवेशाकरिता पैशाची अत्यंत गरज होती ही बाब समाज भूषण पुरस्कार प्राप्त राजू थूल यांना समजली त्यांनी लगेच सुरेश वैद्य या सामाजिक कार्यकर्त्याला सोबत घेऊन संबोधी यांच्या घरी भेट दिली आणि तिची संपूर्ण चौकशी केली आणि आपली सामाजिक बांधिलकी समजून त्यांनी व्हाट्सअप च्या माध्यमातून सर्व दानदात्यांना मदतीचे आवाहन केले असता तीन दिवसांमध्ये 57003₹(सत्तावन हजार तीन रुपये )जमा झाले व संबोधीच्या शिक्षणाचा मार्ग सुकर झाला आज दिनांक 20 ऑगस्ट 2025 ला सायंकाळी सहा वाजता संबोधीच्या घरी जाऊन तिची प्रत्यक्ष भेट घेऊन तिचा सत्कार करण्यात आला व गोळा निधी तिला देण्यात आला त्यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेश वैद्य, सुनील ढाले, गौतम पाटील सुभाष गायकवाड,के बी थूल,महेंद्र बनसोड व तिच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते राजू थुल

जिल्हयात संत रामपालजी महाराजांच्या अनुयायांनी केला अध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार

 
वर्धा अर्पित वाहाणे


वर्धा - महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात दिनांक 10 ऑगस्ट रोजी संत रामपालजी महाराज यांच्या अनुयायांनी विशाल पुस्तक सेवेचे आयोजन केले होते. या उपक्रमादरम्यान अनुयायांनी ज्ञान गंगा आणि जगण्याचा मार्ग ह्या पुस्तकानं द्वारे अध्यात्मिक ज्ञानाचा प्रचार केला. यावेळी जिल्ह्यात ठीक ठिकाणी शेकडोच्या संख्येने रामपालजी महाराजांचे समर्थक उपस्थित होते, व घर घरात जाऊन, रस्त्यावर लोकांना भेटून पुस्तके वितरीत करत होती. ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग ह्या पुस्तकांचे वितरण ते मात्र २० रुपये धर्मार्थ मूल्य म्हणून करत होते. ह्या पुस्तकात श्रीमद् भागवत गीता, वेद, पुराण, कुराण आणि बायबल. गुरु ग्रंथ साहेब सारख्या धर्म ग्रंथांची संपूर्ण माहितीय ह्या शास्त्रांन नुसार पूर्ण परमात्मा कोण आहे याची माहिती दिली

आहे असे अनुयायांनी सांगितले. ज्ञान गंगा ह्या पुस्तकात पूर्ण परमात्मा कबीर साहेब असल्याचे सांगितले आहे. ह्या बरोबरच सत भक्ती करून मोक्ष कसा प्राप्त करता येईल व त्या सनातन परमधाम ज्या बद्दल श्रीमद् भगवत गीते मध्ये वर्णित केले आहे त्याला कसे प्राप्त करता येईल या बद्दल माहिती दिली आहे. जगण्याचा मार्ग ह्या पुस्तकात समाजात वाढलेल्या वाईट चाली रीती व त्यावरचा उपाय काय ह्या बद्दल सखोल माहिती दिली आहे. ह्या सेवे मागचा उद्देश हा लोकांना शास्त्र नुसार भक्तीचा खरा मार्ग दाखवणे असल्याचे अनुयायाने सांगितले. जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात ह्या सेवेचे आयोजन करण्यात आले होते, ज्या मध्ये शेकडोच्या संख्येने पुस्तकांचे वितरण करण्यात आले.वर्धा