न्यायासाठी बोलणारा आवाज

मंगळवार, २९ एप्रिल, २०२५

विदर्भातील युवकांनी भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चाच्या शाखा उघडून अन्याय अत्याचाराच्या विरोधात लढा द्यावा मनोज ढवळे

अर्पित वाहाणे वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो 8956647004

 अमरावती अन्याय,अत्याचार,शोषण, अंधश्रद्धा, जातिवाद आणि भ्रष्टाचारा विरुद्ध लोकशाही मार्गाने लढण्यासाठी तसेच भगवान गौतम बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या विचार लढ्याला गतिमान करण्याचे ध्येय आणि उद्दिष्ट घेऊन भारतीय रिपब्लिकन पॅंथर मोर्चा संपूर्ण देशामध्ये कार्य करीत आहे. भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष संघर्ष नायक श्री.दादासाहेब पी.बी. खडसे यांच्या कुशल नेतृत्वात महाराष्ट्रासह संपूर्ण देशातील आंबेडकरी युवाकांनी सहभागी व्हावे असे आवाहन भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चाचे राष्ट्रीय सचिव श्री. मनोज ढवळे यांनी केले आहे भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चाच्या आंबेडकरी आंदोलनाला अधिक मजबुती संपूर्ण विदर्भामध्ये निर्माण करण्याचा संकल्प घेऊन विदर्भ प्रदेशात गाव तिथे पॅंथर, अभियान राबविण्याची घोषणा भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चाचे राष्ट्रीय सचिव श्री. मनोज ढवळे यांनी नुकतीच केली आहे. विदर्भामध्ये गाव तेथे पॅंथरची शाखा निर्माण करण्यासाठी भारतीय रिपब्लिकन पँथर मोर्चाच्या युवक आणि महिला शाखा उघडण्यासाठी मोबाईल क्र.8390282059 वर संपर्क साधण्याचे आवाहन भारतीय रिपब्लिकन पॅंथर मोर्चाचे राष्ट्रीय सचिव श्री. मनोज ढवळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकातून केले आहे.

 प्रेषक 
 श्री. मनोज ढवळे
 राष्ट्रीय सचिव -भारतीय रिपब्लिकन पॅंथर मोर्चा,
 
रा. व्यकैय्यापुरा, विद्यापीठ कॅम्प अमरावती,महाराष्ट्र
mob. 8390282059
ई-मेल. irp.morcha@gmail.com

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा