सहसंपादक चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर
संपर्क -8888117975
नांदेड -: देगलूर तालुक्यातील शेतकरी हा कष्टकरी व प्रगतशील शेतकरी- खा.रविंद्र वसंतराव चव्हाणआज सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा 2025 देगलूर आयोजित शेतकऱ्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रगतशील शेतकऱ्याचा शिवरत्न सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नांदेड जिल्ह्याचे खासदार रविंद्र चव्हाण व प्रमुख पाहुणे म्हणून देगलूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार जितेश अंतःपुरकर उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या निमित्ताने समितीने एक आगळावेगळा उपक्रम या ठिकाणी राबवला देगलूर तालुक्यातील उत्कृष्ट शेतकऱ्यांना त्यांच्या कार्याबद्दल शेतकरी शिवरत्न सन्मान सोहळ्याने गौरव करून सन्मानित करण्यात आले यावेळी खासदार रविंद्र वचव्हाण साहेब बोलताना म्हणले देगलूर तालुक्यातील शेतकरी कष्टकरी व प्रगतशील शेतकरी आहेत येणाऱ्या काळात अजून चांगल्या आधुनिक पद्धतीच्या वापर करून उत्पादन वाढवावे अशी विनंती येथील शेतकऱ्यांना केली उपस्थित सर्व संयोजन समितीचे आभार मानून विविध शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.याकार्यक्रमाला मोगलाजी सिरसेटवाड ,निवृत्ती कांबळे ,दिलीपराव बंदखडके, महेश पाटील, लक्ष्मीकांत पदमवार, विठ्ठल गीते, विकास नारनाळीकर, तानाजी चव्हाण ,शेखर देशमुख, बालाजी पाटील थडके, बसवराज पाटील, ताराकांत पाटील अंकुश देसाई देगावकर अमोल देसाई शिळवणीकर, बालाजीराव टेकाळे, शरीफ मामा, कैलास एसके , सिकंदर देसाई,जेजेराव पाटील, राजू पाटील, निलेश पाटील, गंगाधर पाटील वडजे, गंगाधर पाटील नागराळकर नरेंद्र पाटील पाळेकर, शंकरराव अवलवाड ,डॉ. शिकारे साहेब यासह अनेक शेतकरी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा