महामहीम राष्ट्रपती महोदय भारत सरकार कार्यालय राष्ट्रपती भवनदिल्ली
आष्टी वीर भगतसिंग हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान क्रांतिकारक होते. त्यांनी अल्पवयातच देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण अर्पण केले. त्यांच्या देशभक्ती, त्याग, निर्भयता आणि क्रांतिकारी विचारांनी तरुण पिढीला प्रेरणा दिली आहे.
आजतागायत अनेक नामवंत स्वातंत्र्यसैनिकांना भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' देण्यात आला आहे. मात्र, देशासाठी हसत-हसत फासावर चढलेल्या वीर भगतसिंग यांना अद्याप हा सन्मान मिळालेला नाही, ही बाब अनेकांना खटकणारी आहे.
वीर भगतसिंग यांचे योगदान केवळ सशस्त्र क्रांतीपुरते मर्यादित नव्हते, तर त्यांनी सामाजिक अन्याय, गुलामगिरी व शोषणाविरोधात वैचारिक लढा दिला. त्यांचे लेखन, विचार आणि बलिदान आजही तितकेच प्रेरणादायी आहेत.म्हणूनच, वीर भगतसिंग यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देणे हा त्यांच्या बलिदानाचा योग्य सन्मान ठरेल, तसेच भावी पिढ्यांना देशप्रेम त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे महत्त्व पटवून देणारा ठरेल यासाठी वीर भगतसिंग यांना भारतरत्न पुरस्कार देवून गौरव करावा अशी विंनती
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा